Friday, December 21, 2018

शासकीय पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरने मोटारसायकल ला दिलेल्या धडकेत दोन जागीच ठार

गंगापूर(प्रतिनिधी)शासकीय पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरने मोटारसायकल ला दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहे.
 गंगापूर - लासुर रोडवरील सिध्दनाथ वाडगांव शिवारात संध्याकाळी सात वाजेदरम्यान शासकीय पाणी पुरवठा करणाऱ्या ट्रँकर क्रमांक एम.एच.१५जी.२९२९ ने ओव्हरटेक करण्याच्या नादात गंगापूर कडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.१७ सी.डी.११०१ ला जोरात धडक दिली होती. धडक ऐवढी जबरदस्त होती की त्यामध्ये राजेंद्र दशरथ धिरडे (५५)या गोधेगांव व नामदेव भाऊसाहेब ठोंबरे(३५) रा गोधेगांव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हे दोघेही जागीच ठार झाले होते. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी,पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमींना लासुरस्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले  परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून म्रुत घोषित केले . घटनास्थळी वाहतुक कोंडी झाली होती शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे पो.हे.काँ.विनोद बिघोत, पोलीस नाईक राठोड, दांडगे यांनी वाहतुक सुरळीत चालू केली .

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...