Friday, December 21, 2018

गल्ले बोरगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शालेय समिती अध्यक्षपदी धनंजय भागवत तर उपाध्यक्षपदी प्रतिभा सुभाष चव्हाण यांची निवड.
 
                                         
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क
खुलताबाद प्रतिनिधी / तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली असून शुक्रवारी घेण्यात आलेल्या पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी धनंजय भागवत तर उपाध्यक्षपदी प्रतिभा सुभाष चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.



शुक्रवार दि.२१ रोजी गल्ले बोरगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समित्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्या मुळे  नवीन शाळा व्यवस्थापन समित्या निवडची प्रक्रिया राबवण्यात आली.
या वेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. एस.पवार यांनी नवीन समितीच्या निवडिसाठी पालक सभेचे आयोजन केले होते.
सकाळी ११ वाजता पालक सभेला सुरवात झाली होती, या वेळी निवडिसंदर्भात शासकीय निकष वाचून दाखवण्यात आले व शासनाने ठरवून दिलेल्या निकशाप्रमाणे प्रत्येक वर्गातून समिती सदस्यांची निवड करण्यात आली या मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी धनंजय भागवत तर उपाध्यक्षपदी प्रतिभा सुभाष चव्हाण यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी निलेश जयस्वाल, शेख सय्यद, पोपट भगत, मच्छिंद्र दुधारे, योगेश मोठे, बाळू शिरसाट, कावेरी खोसरे, सुनीता साळुंके, सुनील तळेकर, विजय चंद्रटिके यांची निवड झाली.
निवडी प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पारपाडण्यासाठी मुख्याध्यापक ए. एस.पवार, यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक एस. एस.महाजन, एन. बी. दळवी, एस. एफ.लहाने, ए. बी.इंगळे, ए. एम.बोडखे, श्रीमती के.डी. गोरे, एम.एस. हिवर्डे यांनी परिश्रम घेतले.
या निवडी बद्दल ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बढे, ग्रामपंचायत सदस्य विशाल खोसरे, मुकेश परदेशी, पोलीस पाटील सिंधुताई बढे,खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दीपक खोसरे, ज्ञानेश्वर खोसरे, शाम उगले, ,बाबासाहेब चंद्रटिके,ज्ञानेश्वर भगत,एकनाथ खोसरे,रावसाहेब सुरतकर, प्रकाश भागवत, रमेश राजपूत,लक्ष्मण अमृते,राजू शर्मा,मानसिंग राजपूत, कल्याण खोसरे, आण्णा जाधव, दिलीप मिसाळ,राजू उगले, विठ्ठल तळेकर, बंडू फुलारे, साजिद शेख, अमोल भोजने, विठ्ठल दंगोडे, गुलाब भागवत यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क फोटो - गल्ले बोरगाव अध्यक्ष धनंजय भागवत व उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची निवड,

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...