Saturday, December 22, 2018

-शेतकऱ्याने जिद्दीने दुष्काळाशी दोन हात करत डाळींब नेली सातासमुद्रापारच्या बाजारपेठेत.

युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क- औरंगाबाद
किसान दिन विशेष-गणेश कदम या यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा.
औरंगाबाद-
शेतकरी म्हणजे अवघ्या जगाचा पोशिंदा असं म्हणतात.मात्र हे मराठवाड्यात दुष्काळ असतानाही हे वाक्य खरं करून दाखवल औरंगाबादमधील लंडगावसांगवी येथील शेतकरी गणेश रामदास कदम यांनी आपल्या शेतातील डाळींब दुष्काळ जन्य परिस्थिती असतानाही वाचवलीच मात्र ती सात समुद्रापार पोहचवली.
 म्हणूनच आजच्या किसान दिन विशेष दिवशी त्याच्या यशस्वी वाटचाली विषयी जाणून घेऊ त्यांच्या शब्दात...
मराठवाड्यात दुष्काळ मात्र आपल्या औरंगाबाद सारख्या शहरात पिन्याचे पाणी मिळण्याचे हाल या परीस्थितीत तुम्ही डाळींब बाग कशी वाचवलीत? या माझ्या प्रश्नावर गणेश कदम मिश्किल हसून धीर -गंभीर स्वरात सांगतात    माणसानं परस्थितीशी दोन हात करणं शिकावं.म्हणजे मी दुष्काळ पडलाय पाणी नाही म्हणून रडत नाही बसायचं,तर बागेतील झाडांना जे पाणी दिल जायचं त्याच योग्य पाणी व्यवस्थापन ,नियोजन करून पाणी देण्याच्या वेळ ठरवून घेतल्या तसेच दिलेलं पाणी जमिनीतच मुरून झाडांना च पोहचावे उन्हापासून वाचवावे या साठी झाडावर कपडा लावला.याने मोठया प्रमाणात पाणी बचत झाली जास्त काळ जमीन ओली राहिली. परंतु गणेश कदम आवर्जून सांगतात 2012 मध्ये पडलेल्या दुष्काळाने आम्हला पाणी कसं वाचवायचा हे शिकवलं.त्या तुन आम्ही उभे राहिलो.
तसेच झाडांची चांगली वाढ व्हावी  ती डेरेदार होऊन चांगल्या प्रकारे फळे मिळावी या साठी फक्त
न्नैसर्गिक खते,जैविक यांचाच वापर केला आणि आवर्जून रासायनिक खते,कीटकनाशके याचा वापर टाळला.कारण डाळींब हे अतिषश नाजूक असे फळ आहे त्यात लवकर कीड लागते.युरोप मध्ये रासायनिक कीटकनाशके वापरलेली फळे स्वीकारली जात नाहीत. माझ्या तीन एकर मध्ये चार वर्षे पूर्वी 1 हजार झाडांची लागवड केली यात सगळी झाडे जगली त्या पासून मला आता पाच लाख
ऐशि हजार रुपये एवढे उत्त्पन्न पहिल्याच लॉट मध्ये मिळाले.
परंतु डाळींब युरोपला पाठवण्या अगोधर अहमदनगरच्या केबी एक्सपोर्ट कंपनीच्या मदतीने
मुंबई ला डाळींबाची तपासणी केली या साठी दहा हजार खर्च आला,डाळीबावर पडणाऱ्या तेल्या रोगा पासून फळांना वाचवलं अश्या कठोर नियोजन बद्ध पद्धतीने जर योग्य अंबाबजावणी केली तर यश आपल्या पुढे झुकतेच.
  दुष्काळ पडलाय सरकार आपल्यला बी-बियाणे देईल मदत करते या आशेवर जगण्यापेक्षा आपण आहे त्या परिस्थिवर मत करत पुढं जायचं आपल्या हिमतीवर असं गणेश कदम म्हणतात.
----------
चौकट
किसान दिन का साजरा करतात.
भारताचे पाचवे प्रधानमंत्री चौधरी चरण सिह यांना सन्मान देण्यासाठी .23 डिसेंबर त्यांचा जन्मदिवस ते शेतकरी कुटूंबातले होते,किसान नेते म्हणून त्याची ओळख शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचा सन्मान म्हणूनकीसान दिवस साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...