Sunday, October 4, 2020

जेष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांना युवा गौरव पुरस्कार प्रदान
औरंगाबाद, 4 ऑक्टोबर(प्रतिनिधी) मागील 23 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत व बेधडक आणि निष्पक्ष निर्भिडपणे काम करणारे जेष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांना युवा गौरव पुरस्कार-2020 मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. आज सुभेदारी विश्रामगृहात छोटेखानी कार्यक्रम घेवून सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आठ व्यक्तिंना पण हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर, पत्रकारिता विद्या क्षेत्रातील प्राध्यापक डॉ. शाहीद शेख, जेष्ठ पत्रकार रफीयोद्दोन रफीक, यूवा शक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक अब्दुल कय्यूम, कॉग्रेसचे जेष्ठ मोहसीन अहेमद, वाय.के.बिल्डर, शेख साबेर, समाजसेवक सुमीत पंडीत उपस्थित होते. सध्या आरेफ देशमुख डि-24 न्यूजची धुरा सांभाळत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Sunday, September 13, 2020

 शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॕकेज जाहीर करा; अन्यथा सरकारच्या विरोधात  आंदोलन - अरुण निटुरे 


औरंगाबाद - केंद्र शासनाने उद्योगपतींना आर्थिक पॕकेज जाहीर केले. तसेच आर्थिक पॕकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करावे, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारु,  असा इशारा राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी  सुभेदारी विक्ष्रामगृह येथे दि. 13 रोजी आयोजित पञकार परिषदेत दिला. 

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेक्ष्राम, प्रदेश अध्यक्ष अर्जुनराव गालफाडे, प्रदेश  सरचिटणीस मारुती गायकवाड, जालना जिल्हाध्यक्ष कैलास सरकटे, कॕप्टन अरविंद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना निटुरे म्हणाले, शासनाने उद्योगपतींना मदत केली. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॕकेज जाहीर करावे.  तसेच कोरोना आजाराने डॉक्टर,  पोलिस,  पञकार यांना 50 लाख केंद्र शासनाने तर 25 लाख राज्य शासनाने आर्थिक मदत म्हणून द्यावे. तसेच कोरोनामुळे  शेतकरी आणि सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.त्यांनाही शासनाने मदत करावी. तसेच नवीन सरकार सत्तेवर येताच सत्ताधारी विद्युत कंपनी तयार करतात आणि सामान्यांना नागरिक, शेतकऱ्यांची लुट करतात.नवीन मीटर  लावतात. यामुळे मोठा भ्रष्टाचार होत आहे. या प्रश्नांवर शासनाने योग्य विचार करावा आणि पिडितांना मदत करावी अन्यथा भविष्यात केंद्र सरकार विरोधात जंतरमंतरवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निटुरे यांनी दिला. 

आगामी महानगरपालिका निवडणूक पक्ष सर्व  जागा स्वतंत्र लढणार आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आम्ही रस्ते, पाणी, कचरा, नागरी समस्या आदी प्रश्नावर लढणार आहोत. पुढील  निवडणुकीत आमच्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे असतील आणि निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव गालफाडे यांनी पञकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्योगपतींना 1 लाख 72 हजार कोटींचे पॕकेज जाहीर केले. माञ शेतकऱ्यांना वेगळा न्याय असा सवालही त्यांनी केला. कोरोनाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे, हे थांबले पाहिजे अन्यथा येत्या काळात सरकार विरोधात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी  सोमनाथ गालफाडे, स्वप्निल गालफाडे,  रंगनाथ भालेराव, शिरधूर गंगावणे, विलास सरकटे, माणिकराव गालफाडे, चंद्रकांत तारतोडे, पवन कुमार, दीपक साळवे, संग्राम घाटे आदींची उपस्थिती होती.

Friday, September 11, 2020

 सिव्हिल कोर्स करा,आत्मनिर्भर बना......


(औरंगाबाद )-MET इन्स्टिट्यूट  व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या वतीने शासन मान्य कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केले जाते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात नवीन काही करण्याची ज्यांच्यात धमक असते तेच विद्यार्थी इंटिरियर डेकोरेटर कोर्स करण्यासाठी धडपड करत असतात. हा कोर्स एक वर्षाच्या कालावधीचा आहे. कोर्स मध्ये इंटिरियर डेकोरेटर व डिझाईन्स कोर्स सोबत AUTO CAD सॉफ्टवेअर्स हि शिकविले जाते. विद्यार्थ्यांने स्वतः आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी व्हावे त्याकरिता बांधकाम क्षेत्रातील कोर्स इंटिरियर डेकोरेटर अत्यंय हे उपयुक्त होते. सदर कोर्समध्ये रेसिडेन्शिअल डिझाईन ,कमर्शियल डिझाईन ,इंडस्ट्रियल डिझाईन ,फर्निचर डिझाईन, डिझाईन मटेरियल आर्ट आणि आर्किटेक हिस्ट्री, सॉफ्टवेअर डिझाईन, प्रॅक्टिकल फर्निचर डिझाईन, स्टुडिओ डिझाईन सारखे प्रोजेक्ट पूर्ण केले जाते.


इंटिरिअर डेकोरेटर कोर्स अर्ध-वेळ म्हणजे पार्ट-टाईम करू शकता. कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. महिलांसाठी विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा.8668620106,8793666376.


2. कोर्स-कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक)- बांधकाम क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी कमी वयात अल्प वेळात शिक्षण म्हणजे दहावी उत्तीर्ण करून आपण बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करू शकता.सदर कोर्स एक वर्षाच्या कालावधीचा आहे. संपूर्ण भारत देशात कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा एकमेव असा कोर्स आहे जो दहावीनंतर एक वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये सरळ सेवा भरती साठी वर्ग-3 पदावर  "#स्थापत्य_अभियांत्रिकी_सहाय्यक" म्हणून नोकरी मिळविता येते. व तसेच महानगरपालिका जिल्हा परिषद सिडको राज्य रस्ते विकास महामंडळ जलसंपदा नगरपरिषद नगरपंचायत पंचायत समिती येथे ही सरळ सेवा भरती साठी उपयुक्त होतो. तसेच पीडब्ल्यूडी विभागाकडून वर्ग 7 मध्ये दहा लक्ष पर्यंत शासकीय गुत्तेदाररिचे करता येते. (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर)

Add caption

एवढेच नव्हे तर बांधकाम क्षेत्रात स्वतःचा खाजगी व्यवसाय करता येतो व रियल इस्टेट कन्सल्टंट म्हणूनही काम करता येते वरील कोर्स करण्यासाठी पात्रता कमीत कमी 10 वी पास पाहिजे व व बारावी आणि पदवीधर विद्यार्थी ही करू शकता. सदर कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. सदर कोर्स हे शासनमान्य असून शासनमान्य प्रमाणपत्र दिला जातो.महिलांसाठी विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा-8668620106,8793666376.

Sunday, July 19, 2020

खाकीतले अष्ठपैलू व्यक्तिमत्व आयपीएस कैसर खालिद यांच्या वाढदिवसानिमित्त खास !

    कर्तव्य, इमानदारी यांना महत्त्व देणे तसेच जनसेवा, जनसुरक्षा करणे हेच कर्तव्यदक्ष पोलिसांचे सद् गुण आहेत. पोलीस खात्यात कर्तव्य दक्ष अधिकारी, कर्मचारी यांची कमी नाही. कर्तव्याची मोजदाद केली तर मोठी यादी तयार होईल. या पोलीस बांधवांच्या अंगी कर्तव्यनिष्ठा खच्चून भरलेली आहे. त्या पोलिसांपैकी एक आहेत आपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद ! अष्ठपैलू व्यक्तिमत्त्वामुळे कैसर खालिद हे हजारो नागरिकांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत. हे अद् भूत व्यक्तिमत्व असलेल्या आयपीए कैसर खालिद यांचा आज जन्मदिन! त्या निमित्ताने विशेष लेखाद्वारे आयपीएस कैसर खालिद यांना "युवा सामना मिडिया" परिवाराकडून शुभेच्छा देण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न!
   
     पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांचा जन्म बिहार राज्यातील अररिया येथे झाला. त्यांनी अररियामधील शाळांमधून शिक्षण पूर्ण केले, नंतर सायन्स कॉलेज पटना आणि पाटणा कॉलेज येथे प्रवेश घेतला. अगदी सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी, त्याला शिक्षण पूर्ण होईपर्यंत इयत्ता चौथीपासूनच बरीच शिष्यवृत्ती मिळाली. सन 1997 साली त्यांची प्रतिष्ठित भारतीय पोलीस सेवा परीक्षेसाठी निवड झाली अन् महाराष्ट्र पोलीस दलाला कैसर खालिद यांच्या रूपात अष्ठपैलू व्यक्तिमत्व लाभले.
    "पोलीस" हे नाव कानी पडताच नागरिकांच्या मनी पोलिसांप्रति असलेली बरीवाईट भावना व्यक्त होते. याला एकादी क्षुल्लक घटनादेखील निमित्त ठरते. त्यातूनच सोशल मीडियावर पोलिसांना कधी शुभेच्छा तर कधी लोखोळ्यांना वाहिल्या जातात. आजच्या घडीला पोलीस खात्यातील "पोलिसींग"मुळेच आपण सर्व सुरक्षित आहोत. चोर पकडणे, गुन्ह्यांची उकल करण्याबरोबर कर्तव्यापलीकडे जाऊन उद्याच्या भारताचे भविष्य पोलीस घडवत आहेत. देशाच्या हितासाठी उद्याचे नागरिक सुजान, जबाबदार बनणले पाहिजेत. हे केवळ शिक्षणामुळे शक्य होऊ शकते. शिक्षणाचे बाळकडू प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही, हे वेळीच लक्षात आल्याने बिहार राज्यातून कैसर खालिद यांच्या रूपात एक कर्तव्य दक्ष आयपीएस अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलाला लाभला. अडथळ्याशिवाय जगण सोपे नाही. खरं पाहता अडथळ्यांमुळेच जीवन जगण्याचे खरे मोल समजते. मात्र संकटाच्या वेळी उद् भवलेल्या परिस्थिवर कशी मात करायची हे बहुदा उमजत नसते. अशा वेळी संयमाने कृती करणे, भोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच पाऊल पुढे टाकले पाहिजे, हे जीवनाचे सहस्य कळल्यामुळे बिहार राज्यातील गावाखेड्यातल्या परंपरेच्या बेड्या तोडून कैसर खालिद यांनी पटणा विद्यापीठातून पदवी संपादन केली.
    काम कोणतेही असो, परिश्रम करण्याची, जीद्द पाहिजे. त्यासाठी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. पण स्वप्नात रंगून स्वप्नभंग होणार नाहीत, हा विचारही तितकाच मोलाचा आहे. हे केवळ अनुभवानेच मनुष्य शिकतो. ज्ञान वाढल्याने कमी होत नाहीतर त्यात आणखी भर पडते. सुजलाम, सुफलाम भारतासाठी प्रत्येक नागरिकांनी शिक्षण घेतलेच पाहिजे. त्यासाठी प्रबोध गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊनच कैसर खालिद हे ठिकठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाकीतले प्रबोधनकार कैसर खालिद यांच्या मार्गगर्शन मोलाचे ठरले आहे.
    विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याबरोबर कैसर खालिद यांच्या अंगी आणखी एक कलाकार दडलेला आहे. कैसर खालिद हे उत्तम कवी, शायर आहेत. आपल्या अवतीभोवती असलेले वातावरण, व्यक्ती, त्यांचे जगणे, वागणे, बोलणे यातूनच कैलास खालिद यांनी अनेक कविता, गजलंची निर्मिती केली. अनेक कार्यक्रमांमध्ये कैसर खालिद प्रमुख पाहुण्यापदी उपस्थित राहून नागरिकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या खास शैलीत कविता, गझल, शायरीच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये कमालीचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकांचा दृष्टीकोन बदलला आणि आज तेच प्रगतीच्या वाटेवर आहेत.
    कैसर खालिद हे सद्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या संरक्षण आणि नागरी शाखेत पोलीस महानिरीक्षक पदावर कर्तव्य बजावत आहेत.
या सन्मानिय पदावर विराजमान झाल्यावर कैसर खालिद यांची पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे वेळेसोबत धावा ! वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ गेली तर संधी हातून निसटते. वेळेबाबत उदाहरण देताना खालिद म्हणतात, वेळ ही एका वेगवान घोड्यासमान आहे. त्याच्या डोक्यावर भरगच्च केसांचा झुपका आहे अन् घोड्याचे इतर शरीर विनाकेसाचे आहे. घोड्याचे कसे मुठीत वेळीस धरले तर आपण त्याच वेगाने धावू शकतो. घोड्याच्या डोक्यावरचे केस हातून निसटले (अर्थात वेळ निघून गेली) तर घोड्याचा कितीही पाठलाग करा, तो हाती लागणार नाही. वेळेचे हे उत्तम उदाहरण अनेक तरुणांना भविष्यासाठी सुवर्ण सल्ला ठरले आहे.
    जश्न-ए-अदब या ना नफा आणि साहित्यिक स्वयंसेवी संस्था, मुंबई यांच्या बॅनरखाली कैसर खालिद हे लोकजागृती करत आहेत. उर्दू आणि हिंदी साहित्य आणि कलेच्या माध्यमातून भारताच्या संयुक्त संस्कृतीची मूल्ये जनमाणसात पोहोचवण्याच्या कामात कैसर खालिद यांचा खारीचा वाटा आहे. इतकेच नव्हे तर कैसर कालिद यांची शौर-ए-असर, दश्त-ए-जा.एन ही पुस्तके तर संपादित केलेले दीवाने-शाद अजीमाबादी ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    न्याय, सहानुभूती आणि जातीय सलोखा, एकत्रित संस्कृतीला चालना, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून पहिल्यांदाच हिंदी व ऊर्दू भाषिक साहित्यांकांना एका मंचवर एकत्रित आणून मराठी साहित्यांचा उदो उदो करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांसाठी महिला कमांडो बटालियन उभारणे,  मुंबई शहरात रुग्णवाहिकांना जाण्यासाठी मोहीम राबविली. निसर्गावर प्रेम करणाऱ्या खालिद यांनी पर्यावरण संवर्धनासाठी उत्तम कार्य केले.मोठ्या प्रमाणात वनीकरण मोहीम सुरू केली. समाजातील विविध घटकांचे एकीकरण यावर विश्वास असलेल्या कैसर खालिद यांची अंगी असलेल्या अष्ठपैलू व्यक्तिमत्वाचा आदर करत महाराष्ट्र शासनाने त्यांना सन 2009 साली वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित केले. याजोडीला महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार, प्रेमचंद सन्मान, इंडियन बिझिनेस अँड प्रोफेशनल्स कौन्सिल दुबई एक्सलन्स इन लीडरशिप अवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्काराने कैसर खालिद यांना सन्मानित करण्यात आले आहे.
     सध्या जगावर कोरोनाचे (कोविड-19) सकंट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. या लाकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या मजुरांना, कामगारांना बसला आहे. सदर बाब लक्षात घेऊन पासबान-ए-अदब या सेवाभावी संस्थेकडून दररोज २० हजारांहून अधिक नागरिकांना अन्नाचे वाटप केले जात आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पासबान - ए - अदब संस्थेचे अध्यक्ष (आयपीएस) विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने ‘खाकीतला अन्नदाता’ नागरिकांसमोर आला आहे.
  कर्तव्यासोबत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आयपीएस कैसर खालीद यांनी पासबान - ए - अदब संस्थेची स्थापना केली. कायम समाजसेवेसाठी अग्रेसर असलेली ही संस्था लॉकडाऊन काळात मदतीसाठी पुढे सरसावली. हाताला काम नसल्यामुळे अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून तात्काळ एपीएमसी मार्केटमधून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, भाजीपाला विकत घेऊन गोवंडी परिसरात लॉकडाऊनचे नियम पाळत गरजूंसाठी अन्नपदार्थ तयार करण्यात येत आहे. या अन्नपदार्थांचे पॅकेट तयार करून सदर पॅकेट काळजीपूर्वक मुंबई उपनगरात वाटण्यासाठी नेले जाते.
    लॉकडाऊन सुरू झाल्यापासून (लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत) नित्याने मुंबई उपनगरातील गोवंडी, शिवाजी नगर, बैगनवाडी, मानखुर्द, चिता कॅम्प, चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, विक्रोली, नागपाडा, मदनपुरा आदी परिसरात २० हजारांहून अधिक नागरिकांना दररोज अन्नपदार्थाच्या पॅकेटचे वाटप केले जात आहे. तसेच या संस्थेचे सदस्य सजासेवक आरशद खान हे आपल्या इतर सहकार्यांसोबत गरजू व्यक्तींच्या घराेघरी जाऊन
5 किलो तांदूळ, 5 किलो पीठ, तूरडाळ, मसूर डाळ, साखर, कांदे, बटाटे आदी प्रत्येकी 1 किलो तर 1 लिटर तेल व 250 ग्रॅम चहापती आदी जीवनाश्यक वस्तू देत आहेत. मुंबई प्रमाणे राज्यात ठिकठिकाणी अशा प्रकारे स्थिती आहे. मात्र मुंबईबाहेर अन्न वाटप करणे शक्य होत नसल्याने त्या ठिकाणी आर्थिक मदत पोहोचवली जाते. आर्थिक मदत मिळताच गरजू नागरिक अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य विकत घेऊन कुटुंबाचा व स्वत:चा उदरनिर्वाह करत आहेत. या सामाजिक कार्यामुळे पासबान - ए - अदब ही संस्था कायम चर्चेत राहिली आहे.
    अशा या अष्ठपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आयपीएस कैसर खालिद यांना वाढदिवसाच्या "युवा सामना मिडिया" परिवाराकडून हार्दीक शुभेच्छा!

Monday, July 13, 2020

*सुसज्ज २०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयाचे तात्काळ बांधकाम सुरु करा – खासदार सय्यद इम्तियाज जलील*

औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता यांना औरंगाबाद दुध डेअरी जवळ सुसज्ज २०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयाची तात्काळ निविदा प्रक्रिया पुर्ण करुन बांधकाम सुरु करण्याचे पत्राव्दारे कळविले आहे.
          खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात पुढे नमुद केले की शहरात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुने थैमान घातले असुन त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. कोविड-१९ विषाणु बाधित रुग्णांना उपचारासाठी शहरात शासकीय अथवा खाजगी रुग्णालयामध्ये बेडच उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णावर योग्य तो वैद्यकीय उपचार सुरु होण्यासाठी विलंब लागत असल्याने अनेक रुग्ण गंभीर आजारी होवुन दगावलेले आहे.
          औरंगाबाद दुध डेअरी जवळ महिला व शिशुसाठी सुसज्ज २०० खाटांचे रुग्णालय तात्काळ पुर्ण करण्याचे आदेशच मा.उच्च न्यायालयाने दिल्याने औरंगाबाद जिल्ह्याव्यतिरिक्त संपुर्ण मराठवाडाच्या जनतेला त्याचा फायदा होणार आहे. रुग्णालयासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी स्वत: शासनाच्या विविध स्तरावर पाठपुरावा करुन रुग्णालय तात्काळ बांधण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. इम्तियाज जलील विरुध्द महाराष्ट्र शासन याचिकेच्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमुद केले आहे की, रुग्णालयाचे संपुर्ण नविन बांधकाम हे सर्व सोयीसुविधासह मा.उच्च न्यायालयाच्या निगराणीत होणार आहे.
          सदरील रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या फेब्रुवारी २०२० च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी सुध्दा मंजुर करण्यात आलेला आहे. महिला व शिशुसाठी २०० खाटांचे रुग्णालयाचे काम त्वरीत सुरु केल्यास भविष्यात कोविड-१९ सारख्या संसर्गजन्य तसेच महिला व शिशुचे विविध आजारावर मात करण्यासाठी वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध राहील.

*बाळासाहेबांच्या नावाने रुग्णालय उभारावे – खासदार इम्तियाज जलील*
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरात महानगरपालिका आढावा बैठकीत अधिकाऱ्याना सुचना दिल्या की, शहरात लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकाचे काम पुर्ण करावे. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली की, बाळासाहेब यांचा स्मारक उभारण्या ऐवजी त्यांच्या नावाने सिडकोच्या त्याच जागेवर मोठे रुग्णालय बांधले तर खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल. शहराला स्मारक ऐवजी रुग्णालयाची अत्यावश्यक गरज आहे, जेणेकरुन सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होणार आहे. महाआघाडी सरकारला जनतेची काळजी नाही का ?  महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता आहे मग त्यांना हे कळत नाही का सर्वात जास्त महत्व कोणत्या कामाला देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=311688116875361&id=103772211000287

Tuesday, April 28, 2020

 नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय परिवाराने केले २ हजार कुटुंबांना अन्नदान


औरंगाबाद, 20 एप्रिल, देश आणि राज्य कोरोनाशी लढत असताना मजूर व कष्टकरी लॉकडाऊनच्या काळात अडचणीत सापडल्याने कुटुबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने विविध पक्ष संघटना व स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आले आहे. नेहमी गरजूंना मदत करण्यासाठी ओबेरॉय कुटुंब शहरात अशा संकटकाळी पुढे येताना शहराने बघितले आहे. माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नेते स्व.मनमोहनसिंग करमसिंग ओबेरॉय सढळ हाताने भूकेल्यांची भूक मिटवण्यासाठी नेहमी तत्पर असायचे त्याच पध्दतीने त्यांचे सुपूत्र राष्ट्रवादी पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा काळी-पिवळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नवीन मनमोहनसिंह ओबेरॉय यांनी २ हजार कुटुंबांना अन्नदान केले आहे. ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला पाच कीलो आटा, दोन किलो तांदूळचे वाटप सोशल डिस्टन्सचे पालन करत करण्यात आले. उस्मानपुरा येथील निवासस्थानी गरजूंना मदतीचे वाटप करण्यात आले असे नवीन ओबेरॉय यांनी सांगितले.

Friday, February 14, 2020

*उध्दवजी मंत्रालय नक्की जनतेचे की वशिल्याच्या तट्टूंचे  ?*
युवा सामना मिडिया विशेष लेख(बेग एम.एन.)

      राज्याचा कारभार जिथून चालतो, नियंत्रीत केला जातो ते मंत्रालय नक्की कुणाचे आहे ? सामान्य जनतेचे की वशिल्याच्या तट्टूंचे ? हा प्रश्न मंत्रालयात गेल्यावर अनेकवेऴा पडल्याशिवाय रहात नाही. मंत्रालयाच्या दारावर गेल्या गेल्या पहिलीच पाटी वाचायला मिऴते ती म्हणजे सामान्य जनतेसाठी दुपारी दोन नंतर प्रवेश. मंत्रालय सकाऴी सुरू होते दहाला आणि सामान्य जनतेला प्रवेश दुपारी दोनला. सकाऴी आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि या सर्वांच्या वशिल्याच्या तट्टूंनाच प्रवेश दिला जातो. म्हणजे जे व्हीआयपी आहेत त्यांनाच प्रवेश दिला जातो. राज्याच्या काना-कोपर्यातून आलेला सामान्य माणूस दुपारी दोन वाजेपर्यंत मंत्रालयाच्या भव्य इमारतीकडे आशाऴभूत नजरेने पाहत राहतो. त्याच्यासमोर अनेक व्हीआयपी, वशिल्याचे तट्टू आत जातात, बाहेर येतात पण गेटवरचे पोलिस त्याला गेटजवऴही थांबू देत नाहीत. तो गेटवर आला की तिथून त्याला हुसकावून लावले जाते. त्याने तिथं उभं राहून मंत्रालयाकडे पहायचेही नाही. त्याची तेवढीही लायकी नाही. तो तिथे आला की खाकीतले बाबू अंगावर येतात. कुत्रे हाकलतात तसे त्याला हाकलतात. लोकांनी कामासाठी गावाकडून आदल्या दिवशी यायचे. ना जेवायची सोय ना रहायची सोय. फुटपाथवर किंवा रेल्वे स्टेशनवर वेऴ काढायचा. रेल्वे स्टेशनवरील शौचालयात अंघोऴ करायची. रस्त्यावरच वडा-पाव किंवा कायतरी खायचे आणि सका-सकाऴी मंत्रालय गाठायचे. तिथे गेल्यावर पास काढायला रांगेत उभे रहायचे. रांगही अशी की डोक्यावर छत्र नाही. भर उन्हात होरपऴत उभे रहायचे. त्या रांगेत उभं राहून पास काढला अन गेटवर गेले की तिथे थांबवले जाते. तुम्हाला आत्ताच नाही दुपारी दोन नंतर सोडले जाईल म्हणून गेटवरचा पहारेकरी आदेश देतो. परत झकमारत आणि ताटकऴत तिथेच कुठेतर थांबावे लागते. गेटजवऴ नाही थांबायचे कारण कँमेर्यात आतल्या साहेबांना दिसते आणि मग ते पहारेकर्यांना शिव्या घालतात म्हणे. म्हणून ते कुत्रे हाकलल्यासारखे लोकांना हाकलतात. त्यामुऴे गेटपासून काही अंतरावर आशाऴभूत आणि हतबल मानसिकतेने जनता ताटकऴत बसते. या मंत्रालयाचा मालक असलेली जनता रोज मंत्रालयाच्या दारातच विटंबीत होते, अपमानित होते. याची खंत कुणालाच वाटत नाही हे विशेष.

     सामान्य जनतेला सकाऴी मंत्रालय सुरू होतानच प्रवेश दिला गेला पाहिजे. त्याला प्राधान्य दिले पाहिजे. त्याला नमस्कार करून, सलाम ठोकून प्राधान्याने आत घेतला पाहिजे. कारण तोच त्या मंत्रालयाचा खराखुरा मालक आहे. बाकी आमदार, खासदार, मंत्री किंवा अधिकारी हे त्याचे नोकर आहेत. नोकरांनीच मालकाच्या संपत्तीवर कब्जा केला आहे. नोकरच मालक झाले आहेत. सामान्य माणसाला मंत्रालायात दुपारी दोनला प्रवेश देण्यात येतो. पण आत आल्यावर त्याला ज्या टेबलला पोहोचायचे आहे तिथवर जाईपर्यंत पाच वाजतात. या माऴ्यावरून त्या माऴ्यावर आणि या टेबलवरून त्या टेबलवर त्याला कोलले जाते. मुऴात जिथे काम आहे ते कार्यालय आणि तिथले साहेब भेटणे म्हणजे मटक्यातला जँकपॉट लागण्यासारखे आहे. वेऴेत कार्यालय सापडले तर आतले बाबूराव जेवायला सुटलेले असतात. जेवण केल्यावर थोडसं इकडे-तिकडे, मग लघूशंकेला, तोवर चहाची वेऴ होते. चहाची वेऴ झाली की थोड्या वेऴाने सुट्टी होते. साहेब घरी जायच्या तयारीला लागतात.  आपलं काम घेवून आलेला माणूस वाट पहात बसलेला असतो. आपलं काम कधी होणार ? या विवंचनेत थांबलेल्या माणसाला उद्या येता का ? म्हणून सांगितले जाते. जिथं एक दिवस थांबायची औकाद नाही तिथे दुसरा दिवस कसा काढायचा आणि कुठे काढायचा ? हा आक्राऴ-विक्राऴ प्रश्न असतो. पण सामान्य माणूस या सगऴ्या कात्रीतून प्रवास करतो. काही अधिकारी चांगले आहेत. माणूसकीला जपणारे आहेत. समोरच्या माणसाला समजून घेतात. स्वत:चे कर्तव्य आणि प्रामाणिकपणा जपणारे असतात. समोरच्याचे दु:ख जाणून घेत, अडचण समजून घेत तत्परतेने काम करतात. पण काही अधिकारी या पठडीत मोडत नाहीत. त्यांना एकतर आमदार-खासदार आणि मंत्र्याची शिफारस लागते किंवा हात ओले करून दिले तरच कागद पुढे सरकतो, अन्यथा नाही. काम टाऴण्यासाठी तारीख पे तारीख सुरू करतात. अनेक कुरापती काढून काम टाऴले जाते. हे आणा, ते आणा असे सांगून समोरच्या माणसाला कोलले जाते. हेलपाटे मारायला लावले जातात. हे मंत्रालयातलं विदारक वास्तव आहे. त्यामुऴे मंत्रालय नक्की कुणाचं ? हा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.

           लोकशाहीत लोक मालक असतात. पण ही मालकी आहे ती फक्त संविधानात आणि नागरिक शास्त्राच्या पुस्तकातच. वास्तव यापेक्षा वेगऴे आहे. वास्तवात लोक लाचार, मजबूर आणि हतबल आहेत. त्याला कुणी वाली नाही, त्याला कुणी धनी नाही. नेते मंडऴी निवडणूका होईपर्यंतच लोकांच्यापुढे झुकतात, वाकतात. त्यांना नमस्कार करतात. त्याला राजा म्हणतात. पण  निवडणूका झाल्या की या राजाला भिकेला लावतात. हेच इथले वास्तव आहे. सामान्य माणूस जर राजा असता, मालक असता तर तो रोज असा अपमानित झाला नसता. त्याची रोज अशी फजिती झाली नसती. मंत्रालयातच नव्हे तर प्रत्येक सरकारी कार्यालयात साहेबांना भेटण्यासाठी त्याला ताटकऴत ठेवले नसते. त्याची वेऴ दुपारनंतरची ठेवली नसती. लोकशाहीत मालक असलेल्या जनतेची ही क्रुर चेष्टा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एक संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांनी ही बाबूशाही मोडीत काढावी. त्यांनी सामान्य जनतेला न्यायाची व सन्मानाची वागणूक द्यावी. बाबूशाही मोडीत काढून लोकशाहीला पुरक काम करावे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी लोकाभिमुख काम केले. त्यांना लोकांनी डोक्यावरही घेतले आहे. तसे लोकाभिमुख काम करण्याची संधी उध्दवजी यांना आहे. त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा लोकाभिमुख करावी. लोकांची गैरसोय होणार नाही याची काऴजी घ्यावी. केवऴ मंत्रालयच नव्हे तर सर्व सरकारी कार्यालयातील अशा पाट्या काढून टाकाव्यात. सामान्य माणसाला कार्यालय सुरू झाल्या-झाल्या प्रवेश द्यावा. कुणी कितीही मोठा साहेब असला तरी तो जनतेपेक्षा मोठा नसतो. तो जनतेचा नोकर असतो. त्याने कार्यालयात येणार्या सामान्यातल्या सामान्य माणसाला अदबीने भेटले पाहिजे. त्यांच्याशी अदबीने बोलले पाहिजे. त्याची सन्मानाने विचारपुस करत त्याचे काम केले पाहिजे. खरेतर त्याला सलामच ठोकला पाहिजे कारण तो मालक असतो. लोकशाहीत जनता मालक आहे. मालकाचा रूबाब असायला हवा पण इथे नोकरांचा रूबाब आहे. इथल्या व्यवस्थेने मालकाला लाचार केले आहे. त्याची अवस्था दऴभद्री करून ठेवली आहे. मंत्रालयातच लोकशाही हूतात्मा होते. तिचा मुडदा पाडला जातो मग ती राज्यात इतर ठिकाणी कशी जीवंत राहणार ? हा महत्वाचा प्रश्न आहे.

हयावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे व जनतेला न्याय देण्याचे काम करावे,असे आव्हान जनतेकडून होत आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...