Sunday, July 19, 2020

खाकीतले अष्ठपैलू व्यक्तिमत्व आयपीएस कैसर खालिद यांच्या वाढदिवसानिमित्त खास !

    कर्तव्य, इमानदारी यांना महत्त्व देणे तसेच जनसेवा, जनसुरक्षा करणे हेच कर्तव्यदक्ष पोलिसांचे सद् गुण आहेत. पोलीस खात्यात कर्तव्य दक्ष अधिकारी, कर्मचारी यांची कमी नाही. कर्तव्याची मोजदाद केली तर मोठी यादी तयार होईल. या पोलीस बांधवांच्या अंगी कर्तव्यनिष्ठा खच्चून भरलेली आहे. त्या पोलिसांपैकी एक आहेत आपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद ! अष्ठपैलू व्यक्तिमत्त्वामुळे कैसर खालिद हे हजारो नागरिकांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत. हे अद् भूत व्यक्तिमत्व असलेल्या आयपीए कैसर खालिद यांचा आज जन्मदिन! त्या निमित्ताने विशेष लेखाद्वारे आयपीएस कैसर खालिद यांना "युवा सामना मिडिया" परिवाराकडून शुभेच्छा देण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न!
   
     पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांचा जन्म बिहार राज्यातील अररिया येथे झाला. त्यांनी अररियामधील शाळांमधून शिक्षण पूर्ण केले, नंतर सायन्स कॉलेज पटना आणि पाटणा कॉलेज येथे प्रवेश घेतला. अगदी सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी, त्याला शिक्षण पूर्ण होईपर्यंत इयत्ता चौथीपासूनच बरीच शिष्यवृत्ती मिळाली. सन 1997 साली त्यांची प्रतिष्ठित भारतीय पोलीस सेवा परीक्षेसाठी निवड झाली अन् महाराष्ट्र पोलीस दलाला कैसर खालिद यांच्या रूपात अष्ठपैलू व्यक्तिमत्व लाभले.
    "पोलीस" हे नाव कानी पडताच नागरिकांच्या मनी पोलिसांप्रति असलेली बरीवाईट भावना व्यक्त होते. याला एकादी क्षुल्लक घटनादेखील निमित्त ठरते. त्यातूनच सोशल मीडियावर पोलिसांना कधी शुभेच्छा तर कधी लोखोळ्यांना वाहिल्या जातात. आजच्या घडीला पोलीस खात्यातील "पोलिसींग"मुळेच आपण सर्व सुरक्षित आहोत. चोर पकडणे, गुन्ह्यांची उकल करण्याबरोबर कर्तव्यापलीकडे जाऊन उद्याच्या भारताचे भविष्य पोलीस घडवत आहेत. देशाच्या हितासाठी उद्याचे नागरिक सुजान, जबाबदार बनणले पाहिजेत. हे केवळ शिक्षणामुळे शक्य होऊ शकते. शिक्षणाचे बाळकडू प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही, हे वेळीच लक्षात आल्याने बिहार राज्यातून कैसर खालिद यांच्या रूपात एक कर्तव्य दक्ष आयपीएस अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलाला लाभला. अडथळ्याशिवाय जगण सोपे नाही. खरं पाहता अडथळ्यांमुळेच जीवन जगण्याचे खरे मोल समजते. मात्र संकटाच्या वेळी उद् भवलेल्या परिस्थिवर कशी मात करायची हे बहुदा उमजत नसते. अशा वेळी संयमाने कृती करणे, भोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच पाऊल पुढे टाकले पाहिजे, हे जीवनाचे सहस्य कळल्यामुळे बिहार राज्यातील गावाखेड्यातल्या परंपरेच्या बेड्या तोडून कैसर खालिद यांनी पटणा विद्यापीठातून पदवी संपादन केली.
    काम कोणतेही असो, परिश्रम करण्याची, जीद्द पाहिजे. त्यासाठी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. पण स्वप्नात रंगून स्वप्नभंग होणार नाहीत, हा विचारही तितकाच मोलाचा आहे. हे केवळ अनुभवानेच मनुष्य शिकतो. ज्ञान वाढल्याने कमी होत नाहीतर त्यात आणखी भर पडते. सुजलाम, सुफलाम भारतासाठी प्रत्येक नागरिकांनी शिक्षण घेतलेच पाहिजे. त्यासाठी प्रबोध गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊनच कैसर खालिद हे ठिकठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाकीतले प्रबोधनकार कैसर खालिद यांच्या मार्गगर्शन मोलाचे ठरले आहे.
    विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याबरोबर कैसर खालिद यांच्या अंगी आणखी एक कलाकार दडलेला आहे. कैसर खालिद हे उत्तम कवी, शायर आहेत. आपल्या अवतीभोवती असलेले वातावरण, व्यक्ती, त्यांचे जगणे, वागणे, बोलणे यातूनच कैलास खालिद यांनी अनेक कविता, गजलंची निर्मिती केली. अनेक कार्यक्रमांमध्ये कैसर खालिद प्रमुख पाहुण्यापदी उपस्थित राहून नागरिकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या खास शैलीत कविता, गझल, शायरीच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये कमालीचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकांचा दृष्टीकोन बदलला आणि आज तेच प्रगतीच्या वाटेवर आहेत.
    कैसर खालिद हे सद्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या संरक्षण आणि नागरी शाखेत पोलीस महानिरीक्षक पदावर कर्तव्य बजावत आहेत.
या सन्मानिय पदावर विराजमान झाल्यावर कैसर खालिद यांची पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे वेळेसोबत धावा ! वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ गेली तर संधी हातून निसटते. वेळेबाबत उदाहरण देताना खालिद म्हणतात, वेळ ही एका वेगवान घोड्यासमान आहे. त्याच्या डोक्यावर भरगच्च केसांचा झुपका आहे अन् घोड्याचे इतर शरीर विनाकेसाचे आहे. घोड्याचे कसे मुठीत वेळीस धरले तर आपण त्याच वेगाने धावू शकतो. घोड्याच्या डोक्यावरचे केस हातून निसटले (अर्थात वेळ निघून गेली) तर घोड्याचा कितीही पाठलाग करा, तो हाती लागणार नाही. वेळेचे हे उत्तम उदाहरण अनेक तरुणांना भविष्यासाठी सुवर्ण सल्ला ठरले आहे.
    जश्न-ए-अदब या ना नफा आणि साहित्यिक स्वयंसेवी संस्था, मुंबई यांच्या बॅनरखाली कैसर खालिद हे लोकजागृती करत आहेत. उर्दू आणि हिंदी साहित्य आणि कलेच्या माध्यमातून भारताच्या संयुक्त संस्कृतीची मूल्ये जनमाणसात पोहोचवण्याच्या कामात कैसर खालिद यांचा खारीचा वाटा आहे. इतकेच नव्हे तर कैसर कालिद यांची शौर-ए-असर, दश्त-ए-जा.एन ही पुस्तके तर संपादित केलेले दीवाने-शाद अजीमाबादी ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    न्याय, सहानुभूती आणि जातीय सलोखा, एकत्रित संस्कृतीला चालना, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून पहिल्यांदाच हिंदी व ऊर्दू भाषिक साहित्यांकांना एका मंचवर एकत्रित आणून मराठी साहित्यांचा उदो उदो करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांसाठी महिला कमांडो बटालियन उभारणे,  मुंबई शहरात रुग्णवाहिकांना जाण्यासाठी मोहीम राबविली. निसर्गावर प्रेम करणाऱ्या खालिद यांनी पर्यावरण संवर्धनासाठी उत्तम कार्य केले.मोठ्या प्रमाणात वनीकरण मोहीम सुरू केली. समाजातील विविध घटकांचे एकीकरण यावर विश्वास असलेल्या कैसर खालिद यांची अंगी असलेल्या अष्ठपैलू व्यक्तिमत्वाचा आदर करत महाराष्ट्र शासनाने त्यांना सन 2009 साली वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित केले. याजोडीला महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार, प्रेमचंद सन्मान, इंडियन बिझिनेस अँड प्रोफेशनल्स कौन्सिल दुबई एक्सलन्स इन लीडरशिप अवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्काराने कैसर खालिद यांना सन्मानित करण्यात आले आहे.
     सध्या जगावर कोरोनाचे (कोविड-19) सकंट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. या लाकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या मजुरांना, कामगारांना बसला आहे. सदर बाब लक्षात घेऊन पासबान-ए-अदब या सेवाभावी संस्थेकडून दररोज २० हजारांहून अधिक नागरिकांना अन्नाचे वाटप केले जात आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पासबान - ए - अदब संस्थेचे अध्यक्ष (आयपीएस) विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने ‘खाकीतला अन्नदाता’ नागरिकांसमोर आला आहे.
  कर्तव्यासोबत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आयपीएस कैसर खालीद यांनी पासबान - ए - अदब संस्थेची स्थापना केली. कायम समाजसेवेसाठी अग्रेसर असलेली ही संस्था लॉकडाऊन काळात मदतीसाठी पुढे सरसावली. हाताला काम नसल्यामुळे अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून तात्काळ एपीएमसी मार्केटमधून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, भाजीपाला विकत घेऊन गोवंडी परिसरात लॉकडाऊनचे नियम पाळत गरजूंसाठी अन्नपदार्थ तयार करण्यात येत आहे. या अन्नपदार्थांचे पॅकेट तयार करून सदर पॅकेट काळजीपूर्वक मुंबई उपनगरात वाटण्यासाठी नेले जाते.
    लॉकडाऊन सुरू झाल्यापासून (लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत) नित्याने मुंबई उपनगरातील गोवंडी, शिवाजी नगर, बैगनवाडी, मानखुर्द, चिता कॅम्प, चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, विक्रोली, नागपाडा, मदनपुरा आदी परिसरात २० हजारांहून अधिक नागरिकांना दररोज अन्नपदार्थाच्या पॅकेटचे वाटप केले जात आहे. तसेच या संस्थेचे सदस्य सजासेवक आरशद खान हे आपल्या इतर सहकार्यांसोबत गरजू व्यक्तींच्या घराेघरी जाऊन
5 किलो तांदूळ, 5 किलो पीठ, तूरडाळ, मसूर डाळ, साखर, कांदे, बटाटे आदी प्रत्येकी 1 किलो तर 1 लिटर तेल व 250 ग्रॅम चहापती आदी जीवनाश्यक वस्तू देत आहेत. मुंबई प्रमाणे राज्यात ठिकठिकाणी अशा प्रकारे स्थिती आहे. मात्र मुंबईबाहेर अन्न वाटप करणे शक्य होत नसल्याने त्या ठिकाणी आर्थिक मदत पोहोचवली जाते. आर्थिक मदत मिळताच गरजू नागरिक अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य विकत घेऊन कुटुंबाचा व स्वत:चा उदरनिर्वाह करत आहेत. या सामाजिक कार्यामुळे पासबान - ए - अदब ही संस्था कायम चर्चेत राहिली आहे.
    अशा या अष्ठपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आयपीएस कैसर खालिद यांना वाढदिवसाच्या "युवा सामना मिडिया" परिवाराकडून हार्दीक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...