Monday, July 13, 2020

*सुसज्ज २०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयाचे तात्काळ बांधकाम सुरु करा – खासदार सय्यद इम्तियाज जलील*

औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता यांना औरंगाबाद दुध डेअरी जवळ सुसज्ज २०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयाची तात्काळ निविदा प्रक्रिया पुर्ण करुन बांधकाम सुरु करण्याचे पत्राव्दारे कळविले आहे.
          खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात पुढे नमुद केले की शहरात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुने थैमान घातले असुन त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. कोविड-१९ विषाणु बाधित रुग्णांना उपचारासाठी शहरात शासकीय अथवा खाजगी रुग्णालयामध्ये बेडच उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णावर योग्य तो वैद्यकीय उपचार सुरु होण्यासाठी विलंब लागत असल्याने अनेक रुग्ण गंभीर आजारी होवुन दगावलेले आहे.
          औरंगाबाद दुध डेअरी जवळ महिला व शिशुसाठी सुसज्ज २०० खाटांचे रुग्णालय तात्काळ पुर्ण करण्याचे आदेशच मा.उच्च न्यायालयाने दिल्याने औरंगाबाद जिल्ह्याव्यतिरिक्त संपुर्ण मराठवाडाच्या जनतेला त्याचा फायदा होणार आहे. रुग्णालयासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी स्वत: शासनाच्या विविध स्तरावर पाठपुरावा करुन रुग्णालय तात्काळ बांधण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. इम्तियाज जलील विरुध्द महाराष्ट्र शासन याचिकेच्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमुद केले आहे की, रुग्णालयाचे संपुर्ण नविन बांधकाम हे सर्व सोयीसुविधासह मा.उच्च न्यायालयाच्या निगराणीत होणार आहे.
          सदरील रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या फेब्रुवारी २०२० च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी सुध्दा मंजुर करण्यात आलेला आहे. महिला व शिशुसाठी २०० खाटांचे रुग्णालयाचे काम त्वरीत सुरु केल्यास भविष्यात कोविड-१९ सारख्या संसर्गजन्य तसेच महिला व शिशुचे विविध आजारावर मात करण्यासाठी वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध राहील.

*बाळासाहेबांच्या नावाने रुग्णालय उभारावे – खासदार इम्तियाज जलील*
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरात महानगरपालिका आढावा बैठकीत अधिकाऱ्याना सुचना दिल्या की, शहरात लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकाचे काम पुर्ण करावे. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली की, बाळासाहेब यांचा स्मारक उभारण्या ऐवजी त्यांच्या नावाने सिडकोच्या त्याच जागेवर मोठे रुग्णालय बांधले तर खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल. शहराला स्मारक ऐवजी रुग्णालयाची अत्यावश्यक गरज आहे, जेणेकरुन सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होणार आहे. महाआघाडी सरकारला जनतेची काळजी नाही का ?  महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता आहे मग त्यांना हे कळत नाही का सर्वात जास्त महत्व कोणत्या कामाला देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=311688116875361&id=103772211000287

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...