Friday, October 4, 2019

इम्तियाज जलील, जावेद कुरेशी यांच्यात वादावादी. औरंगाबादचे राजकारण तापले.
Photos:-Baig Mushtak Mirza, Aurangabad

औरंगाबाद: ऐसें छप्पन आये और गये, मजलिस किसी मौताज नही, याहा सिर्फ ओवेसी साहेब की बात को किमत है, वो किसी राह चलते को, रिक्षावाले को भी तिकीट देगे तो उसको चुन के लायगे, अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी जावेद कुरेशी यांना नाव न घेता भाषणात टोला लगावला. त्याचा जाब विचारण्यासाठी कुरेशी आपल्या जागेवरून उठत इम्तियाज यांच्याकडे गेले. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ओवैसी यांच्या समोरच हा प्रकार घडल्यामुळे सभेत काही काळ घोषणाबाजी आणि गोंधळ उडाला. व्यासपीठावरील नेत्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवारी वरून धुसफूस सुरू आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आपले विश्वासू नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्याने कुरेशी नाराज होते. त्यातच इम्तियाज जलील यांनी आज ओवेसी यांच्या समोरच जावेद कुरेशी यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे कुरेशी यांचा पारा चढला.
भाषण संपवून इम्तियाज जागेवर येऊन बसत नाहीत, तोच कुरेशी त्यांच्याकडे गेले आणि तावातावाने बोलू लागले. ओवेसी भाषण सुरू करत असतानाच त्यांच्या पाठीमागे कुरेशी- इम्तियाज यांच्यात खडाजंगी सुरू होती. ही बाब समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजीला सुरवात केली. तोपर्यंत व्यासपीठावरील नेत्यांनी धाव घेत कुरेशी आणि इम्तियाज यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तीन चार मिनिटे सुरू होता. समोर गोंधळ आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओवेसी यांनी दम भरत शांत केले आणि भाषणाला सुरवात केली
कुरेशी बंडाच्या तयारीत?
दरम्यान, सभेनंतर कुरेशी यांनी आपल्या कार्यालयात समर्थकांची बैठक घेत इम्तियाज यांच्या विधानावर आक्षेप घेत, एमआयएमचा शहरात पाया आपण रचल्याचा दावा केला. ओवेसी यांनी भेटण्यासाठी वेळ दिली आहे, त्यांच्याशी भेटून पुढील निर्णय घेऊ असे जाहीर करतांनाच इम्तियाज जलील यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे सांगितले.

Tuesday, October 1, 2019

रेल्वेस्टेशन येथुन रिक्षात बसवुन प्रवाश्यांना लुटणाऱ्या टोळीच्या उस्मानपुरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

आरोपीकडून २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद/ प्रतिनिधी
जनशताब्दीने रेल्वे स्टेशनवर उतरून तेथून २८ सप्टेंबर रोजी गादिया विहार कडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला लुटणाऱ्या टोळीला मुद्देमालासह उस्मानपुरा पोलिसांनी मंगळवारी (दि.१) गजाआड केले.
मोहम्मद नमीर अन्सारी मोहम्मद मजाहिर अन्सारी (वय-२५ रा. बेहरमा गढी, ता.कसबा नेहतोर, जि.बिजनौर उत्तरप्रदेश ह.मु. आझाद चौक, औरंगाबाद), खर्शीद अंसारी वल्द युसुफ अंसारी (वय ३५ रा. गल्ली न. 11 आझाद चौक रहीम नगर औरंगाबाद), गुलफाम अंसारी वल्द जुल्फीकार अंसारी (वय २६ रा. बेहरमा गढी, ता.कसबा नेहतोर, जि.बिजनौर उत्तरप्रदेश ह.मु. आझाद चौक, औरंगाबाद अशी आरोपींची नावे असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजता सेवानिवृत्त शिक्षिका व त्यांचे पती हे
जनशताब्दी रेल्वेने औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथे उतरुन राहत्या घरी गादिया विहार येथे जाण्याकरिता रिक्षात बसले होते. रिक्षा चालकाने अगोदर दोन व्यक्ती बसवुन ठेवले होते. बसण्यास अडचण होत असल्याने या दाम्पत्याने त्यांच्याकडील बॅग सहप्रवशी आरोपींकडे दिल्या. आरोपीनी बॅगमधुन एकुण 207.19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत एकुण 02,74,833/-रु, व 25000/- रु. रोख रक्कम असे एकुण 02,99,833/- रु.कि.चा मुद्देमाल रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी लुटला होता. याबाबत उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रेल्वेस्टेशन सीसीटीव्ही कंट्रोल रुम त्यांचेकडुन आरोपीबाबत माहिती घेवुन आरोपीची सीसीटीव्ही फुटेजमध्ये पडताळणी केली असता आरोपी हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळुन आला नाही. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेस्टेशनला रेल्वे आल्यानंतर गर्दी करणा-या रिक्षाचालकापैकी संशयित रिक्षाचालक मोहम्मद नमीर याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवितात त्याने गुन्हा कबुल करीत साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक ऑटो रिक्षा क्र.MH 20 EF 3505, दोन मोबाईल, 05.5 तोळे सोन्याचे दागिने किंमत 02,09,000/-रु. व 10,000/-रु. रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सपोआ साखोळे, पोनि दिलीप तारे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सर्जेराव सानप, पोकॉ अश्ररफ सय्यद, राहुल काळे, मनोज बनसोडे यांनी केली.


अनिस रामपुरे यांना "युवा गौरव" पुरस्काराने सम्मानित . 
औरंगाबाद येथील  दैनिक शम-ऐ-रहबर चे फोटोग्राफर अनिस याकुब रामपुरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाच वर्षा पासुन उत्कृष्ट फोटोग्राफ़ि चे काम केल्या मुळे सा. औरंगाबाद युवा व युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे "युवा गौरव" पुरस्काराने सम्मानित करणयात आला. 
सदर पुरस्कार वितरण सोहळा २९ सप्टेंबर २०१९ रविवारी रोजी रात्री ७ वाजता मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे पार पड़ला प्रमुख पाहुने अनवर खान, ईब्राहिम पठाण, नायाब अन्सारी, शारेख नक्शबंदी, संपादक अब्दुल कय्यूम, उपसरपंच सय्यद शेरू, नगरसेवक शेख हनिफ बब्बू, शेख खालेद, मोहसिन अहेमद, आदींच्या  हस्ते सन्मान पत्र व ट्रफि देऊन सम्मानित केले. 
 अनिस याकुब रामपुरे यांना "युवा गौरव"  पुरस्कार  मिळालयाने मित्र मंडल  व रामपुरे परीवाराच्या वतीने  शूभेच्छा देण्यात आले.

Thursday, September 26, 2019

चिकलठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुणपणे हत्या
परिसरात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल


औरंंगाबाद/प्रतिनिधी : चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सिडको एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविले. दिनकर भिकाजी बोर्डे (वय ५०), कमलबाई दिनकर बोर्डे (वय ५०), भगवान दिनकर बोर्डे (वय २६) सर्व राहणार दत्त नगर, चौधरी कॉलनी अशी मयतांची नावे आहेत. मारेकरी अमोल भगीरथ बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.

चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत राहणाऱ्या बोर्डे कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेद्र माळाळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घर उघडून बघीतले असता, घरात सर्वत्र रक्त पसरले होते. तर तीन जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत तीन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविले. हे हत्याकांड कोणत्या कारणाने घडले याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. तरी मारकरी अमोल बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Saturday, September 21, 2019



महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू ; 
दिवाळी अगोदर फटाके फोडण्याची तयारी.
२१ ऑक्टोबर ला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल लागनार

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा आज मुख्य निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली असून महाराष्ट आणि हरियाणात आज दुपारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला एकाच टप्यात मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदारांची नोदणी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा ९ नोव्हेंबरपर्यंत असून २८८ जागेसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत घोडेबाजार करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार असून यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा उमेदवारांनी आपल्या गुन्हेगारीची सर्व माहिती देणं गरजेचं असल्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत यंदा प्लास्टिक वापरावर बंदी असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तर विधानसभा उमेदवारांना २८ लाखापेक्षा अधिक खर्च करता येणार नाही. याबाबत उमेदवारांनी दक्षता घ्यावी असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले.

Thursday, September 19, 2019

औरंगाबाद म.न.पा. आयुक्त निपुण विनायक यांचा रोशन गेट ते सेंट्रल नाका दु चाकीवर तर सईदा कॉलनी येथे पायी दौरा
मा. खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांच्या मार्गदर्शनाखाली एम. आई. एम. चे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंदविला सहभाग
दि. १९ सप्टेंबर २०१९. औरंगाबाद जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत म.न.पा. प्रशासनाला ठणकावून सांगितले कि १० दिवसात औरंगाबाद शहरात असलेला कचरा डेपु स्थलांतर ना केल्यास एम.आई.एम. आक्रमक भूमिका घेणार. औरंगाबाद महानगरपालिका चे आयुक्त श्री. निपुण विनायक यांनी आज औरंगाबाद शहराच्या जुन्या भागामध्ये पायी व दु चाकी वर बसून दौरा केला. रोशन गेट, मदनी चौक, टाकलकर सोसायटी ते सेंट्रल नाका या भागामध्ये पालिका आयुक्तांनी दौरा केला. आयुक्तांनी तेथिल सडकांची दुर्दशा पहिली, रस्त्यातील खड्यांची पाहणी केली व तिथला कचरा डेपो त्वरित स्थलांतर होणार असे आश्वसन दिले. खराब रस्ते, कचरा तसेच मोकाट कुत्र्यांमुळे होणारी गैर सोय नगरसेवकांनी मा. आयुक्तांसमोर मांडली. मा. आयुक्तांनी यांना समस्या हल करण्याचे आश्वासन दिले. रस्त्यातील खड्डे अनुभवण्या साठी आयुक्त साहेब स्वतः दु चाकी वर स्वार होऊन त्यांनी सर्व खड्यांचे झटके अनुभवले. सामान्य माणसांना होणारा त्रास त्यांनी अनुभवला. एम.आई.एम. चे नगरसेवक रफिक चिता यांच्या गाडीवर बसून आयुक्त साहेबांनी सादर दौरा केला. रस्त्यांचे खराब हाल बघून आयुक्तांनी लवकरात लौकर रस्ते दुरुस्त व्हावे असे आदेश दिले. रोशन गेट परिसरातील रस्त्यावर असलेले मेन होल बंद करण्याचे देखील त्यांनी आदेश दिले. सईदा कालोनी मधील सर्व अंतर्गत रस्त्यांची त्यांनी पाहणी केली. तुंबलेले पाणी व खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारी गैरसोय हे आयुक्तांनी बघितली. कचरा, खड्डे, दूषित पाणी, खराब रस्ते, ड्रेनेज इ विषयांवर अन्वर खान यांनी मा. आयुक्ता सोबत सविस्तर चर्चा केली व मा. आयुक्तांनी मनपूर्वक विचार करून अधिकाऱ्यांना सर्व कामाचे इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले तसेच रस्ते बनविण्यासाठी म.न.पा. अधिकाऱ्यांना त्वरित एस्टीमेट बनविण्यास आयुक्तांनी सांगितले. या प्रसंगी एम. आई. एम. चे खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांच्या मार्दर्शखाली एम. आई. एम. चे विरोधी पक्ष नेता, गट नेता व नगरसेवकांची उपस्थिती होती. जुन्या शहरामध्ये लवकरच विकास कार्य सुरु होतील असे आश्वासन आयुक्तांनी दिले. सर्व नगरसेवक श्री. नासेर सिद्दीकी, श्री. जमीर अहमद कादरी, श्री. रफिक चिता, डॉ. अफजाल खान, श्री. अरुण बोर्डे, श्री. गंगाधर ढगे, श्री. अरिफ हुसैनी, श्री. अझीम खान, श्री. अबुल हसन हाश्मी, श्री. सईद फारुकी,  श्री. अज्जू नाईकवाडे, श्री. सलीम सहारा तसेच एम. आई. एम. चे मोठे कार्यकर्ता श्री. हाशम चाऊस व श्री. अमर बिन हैदरा हि या प्रसंगी विशेष उपस्थित होती. सादर दौऱ्या मध्ये मा. आयुक्त निपुण विनायक यांच्या सोबत शहर अभियंता श्री पानझडे, पाणी पुरवठा चे कार्यकारी अभियंता श्री. कोल्हे, एक्झिकटीव्ह इंजिनियर श्री. काझी, विद्युत विभागाचे चे श्री. देशमुख, श्री. देशपांडे व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांची नुकतीच भारत सरकार च्या अर्बन डेव्हलोपमेंट कमेटी वर नियुक्ती झाली असून आता ह्या सर्व नागरी प्रश्न लवकरच सुटतील तसेच आता शहराच्या विकास करिता जास्तीत जास्त बजेट मिळेल असे विश्वास हि अन्वर खान यांनी व्यक्त केले.
*बीड येथे भरदिवसा सैनिकी विद्यालयातील शिक्षकाचा खुन*


बीड : – शहरातील जयदत्‍त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भोसकून खून करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बालेपीर भागात घडली. भरदुपारी खूनाची घटना घडल्याने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली असून शिक्षकाचा खून झाल्याचे समजताच संबंधितांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी करण्यास सुरवात केली.
सय्यद साजिद अली असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते सैनिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सय्यद यांचा कुकरीने भोसकून खून केल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांचा खून कोणत्या कारणामुळे केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सय्यद यांचा खून झाल्याचे समजताच सय्यद यांच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने जिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली.
भरदुपारी खून झाल्याचे समजताच बीड पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी आणि जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. सय्यद यांच्या छातीवर व पोटावर वार करण्यात आले आहेत. रक्‍ताच्या थारोळयात पडलेल्या सयय्द यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्रकरणाचा अधिक तपास बीड पोलिस करीत आहेत.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...