Friday, October 4, 2019

इम्तियाज जलील, जावेद कुरेशी यांच्यात वादावादी. औरंगाबादचे राजकारण तापले.
Photos:-Baig Mushtak Mirza, Aurangabad

औरंगाबाद: ऐसें छप्पन आये और गये, मजलिस किसी मौताज नही, याहा सिर्फ ओवेसी साहेब की बात को किमत है, वो किसी राह चलते को, रिक्षावाले को भी तिकीट देगे तो उसको चुन के लायगे, अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी जावेद कुरेशी यांना नाव न घेता भाषणात टोला लगावला. त्याचा जाब विचारण्यासाठी कुरेशी आपल्या जागेवरून उठत इम्तियाज यांच्याकडे गेले. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ओवैसी यांच्या समोरच हा प्रकार घडल्यामुळे सभेत काही काळ घोषणाबाजी आणि गोंधळ उडाला. व्यासपीठावरील नेत्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवारी वरून धुसफूस सुरू आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आपले विश्वासू नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्याने कुरेशी नाराज होते. त्यातच इम्तियाज जलील यांनी आज ओवेसी यांच्या समोरच जावेद कुरेशी यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे कुरेशी यांचा पारा चढला.
भाषण संपवून इम्तियाज जागेवर येऊन बसत नाहीत, तोच कुरेशी त्यांच्याकडे गेले आणि तावातावाने बोलू लागले. ओवेसी भाषण सुरू करत असतानाच त्यांच्या पाठीमागे कुरेशी- इम्तियाज यांच्यात खडाजंगी सुरू होती. ही बाब समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजीला सुरवात केली. तोपर्यंत व्यासपीठावरील नेत्यांनी धाव घेत कुरेशी आणि इम्तियाज यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तीन चार मिनिटे सुरू होता. समोर गोंधळ आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओवेसी यांनी दम भरत शांत केले आणि भाषणाला सुरवात केली
कुरेशी बंडाच्या तयारीत?
दरम्यान, सभेनंतर कुरेशी यांनी आपल्या कार्यालयात समर्थकांची बैठक घेत इम्तियाज यांच्या विधानावर आक्षेप घेत, एमआयएमचा शहरात पाया आपण रचल्याचा दावा केला. ओवेसी यांनी भेटण्यासाठी वेळ दिली आहे, त्यांच्याशी भेटून पुढील निर्णय घेऊ असे जाहीर करतांनाच इम्तियाज जलील यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...