अखेर औरंगाबाद महापालिकेला मिळाला आयुक्त
IAS Aastikumar Pandey With Wife IPS Mokshada Patil, SP, Aurangabad.
बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद मनपा आयुक्त पदी नियुक्ती, निपुण विनायक यांचे ठिव ठीकाण नाही.
औरंगाबाद/प्रतिनिधी- युवा सामना मिडिया न्युज-
महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक वारंवार सुट्टीवर जात असल्याने त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. पालिका पदाधिकाऱ्यासोबत खटकल्यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रयत्नात होते. दिवाळीपासून ते रजा टाकून निघून गेले ते शहरात परतले नाही. शेवटी बुधवारी (दि.४) शासनाने त्यांच्या जागी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने हे आदेश जारी करण्यात आले असून पाण्डेय यांना तात्काळ पालिकेत रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
आस्तिककुमार पांडे यांची फेब्रुवारी महिन्यात अकोला येथून बीडला बदली झाली होती. त्यांनी केलेल्या वाळू माफियाविरोधातील कारवाया, गौण खनीज वाहतूकीतील पारदर्शकता आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे नेहमीच ते चर्चेत राहिले. त्याबरोबरच चला शहर घडवूया ही मोहीम जनतेत स्वच्छतेची व जबाबदारीची जागरूकता निर्माण करणारी ठरली. त्यांची आता औरंगाबाद येथील महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी म्हणून यशदा प्रकल्पाच्या संचालिका प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती केली आहे.
तब्बल सव्वा महिन्यापासून रजेवर गेलेले महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे पुन्हा शहरात येणाच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने शहरातील विकासकामांबरोबरच पालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प झाला होता. शहरात असतानाही आयुक्त डॉ. निपुण हे पालिकेत फिरकत नाहीत. यामुळे आयुक्तांविषयी नागरिकांतून नाराजी तर नगरसेवकांविषयी रोष व्यक्त केला जात होता. यासंदर्भात आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पालिकेसाठी पूर्णवेळ आयुक्त म्हणून नवीन अधिकारी देण्याची मागणी केली होती. तसेच आमदार अंबादास दानवे यांचीही याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, बुधवारी (दि.४) सामान्य प्रशासन विभागाने डॉ. निपुण विनायक यांच्या जागी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्याने सव्वा महिन्यांत पालिकेला आयुक्त मिळाला आहे.
विकासकामांना गती मिळेल - महापौर घोडेले
महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाल्याने आता विकासकामे झपाट्याने होतील. अस्तिककुमार पांडे यांचे शहरात स्वागत आहे. पालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन हे समन्वय ठेऊन काम करीत आहेत. मात्र, पूर्णवेळ आयुक्त नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दीर्घ प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच उद्धव ठाकरे यांनी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी पूर्ण केली. याबाबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच यासाठी पाठपुरावा करणारे स्थानिक आमदार यांचेही आभार व्यक्त करतो.
समस्यांना एकटे महापौर घोडेले भिडले
शहरात कचराकोंडी उद्भवल्यानंतर महापालिकेचे पूर्णवेळ आयुक्त म्हणून राज्य शासनाने खास दिल्ली येथून डॉ. निपुण विनायक यांना महापालिकेत पाठविले. कचरा प्रश्न आता सुटला असल्याचे पाहून ते गेल्या काही महिन्यांपासून बदलीच्या प्रयत्नात होते. शहरात असूनही डॉ. विनायक हे पालिका मुख्यलयात कमी आणि संशोधन केंद्रात बसून कारभार चालवायचे. त्यात ते वारंवार सुट्टीवर निघून जात असल्याने कायम वादग्रस्त ठरले. याउलट महापौर नंदकुमार घोडेले यांनी जबाबदारीतून पळ न काढता येणाऱ्या सर्व समस्यांना एकट्याने तोंड दिले. डेंग्यूमुळे शहरात 11 जणांचे बळी गेले. अशा परिस्थतीत डॉ. विनायक हे रजा टाकून निघून गेले. मात्र, महापौरांनी एकट्याने अधिकऱ्यांच्या बैठक घेऊन त्यांना कामाला लावले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. ठेकेदारांची कोट्यवधींची बिलं थकली आहेत. त्यांचे आंदोलने, घेराव, निवेदने याला महापौर घोडेले एकटे सामोरे जात आहेत. मात्र, कर वसुलीसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष न दिल्याने अधिकात्यांचेही याकडे दुर्लक्ष राहिले. आता नवीन आयुक्त म्हणून अस्तिककुमार पांडे आले असल्याने पालिकेच्या तिजोरी भरले आणि शहरातील विकासकामे गतीने होतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.