Wednesday, August 21, 2019

*अंबादास दाणवे 524 मते घेऊन पहिल्या फेरीतच विजयी*

शिवसेना-भाजपा युतीचे अंबादास दानवे यांना ५२४ मते पहील्या फेरीत मिळाली. तर कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली. अपक्ष शहानवाज खान यांना ३ मतांवर समाधान मानावे लागले. युतीकडे ३३० मते होती दानवेंना यापैकी १०७ मते जास्त मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. एमआयएमची २८ मते घेण्याची किमया अंबादास दानवे यांनी या निवडणुकीत करून दाखविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर आघाडीकडे २५० मते होती तरी कुलकर्णी यांना यापैकी १०६ मते मिळाली आहे. यावरून कॉंग्रेसने बळजबरी उमेदवार लादल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. एमआयएम, आरपीआय, बसपा, अपक्ष मिळून ७७ मते होती. एकूण ६५७ मते होती ६४७ मतदान झाले होते त्यापैकी ६३३ मते वैध ठरली. कोटा ३१७ मतांचा होता. १० वाजून १७ मिनटांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी ५२४ मते घेतलेले अंबादास दानवे यांना विजयी घोषित केले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून जल्लोष केला. महीला कार्यकर्त्यांनी सुध्दा जल्लोषात सहभाग घेवून आनंद व्यक्त केला. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यावर आता शिवसेनेचे अंबादास दानवे यांचे वर्चस्व राहणार असून आगामी निवडणुकीत दानवे यांना आपली किमया दाखवणे आता सहज शक्य होणार आहे. 

*Ambadas Danve Won the election in first round by getting 525 votes*
-OVM
: Ambadas danve 524
Kulkarni 106
Shahnavaz 3
Invalid Votes 14
-OVM




युवा सामना मिडियाचा दावा ठरला खरा.

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज संस्थेतअंबादास दानवे यांचा विजय निश्चित होणार. युवा सामना मिडियाचा दावा.निकाल-२२ आगसट २०१९ रोजी निश्चिती.
महापालिकेची विशेष कर वसुली मोहीम : शाळा, महाविद्यालय, मंगलकार्यालयासह पाच मालमत्ता सील

थकबाकीदारांच्या मालमत्ताना मनपाने ठोकले टाळे



औरंगाबाद / प्रतिनिधी
थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने बुधवार (दि.21) पासून दहा दिवसांची विशेष कर वसुली मोहीम सुरु केली आहे. मोहीमेच्या पहिल्याच दिवशी एक शाळा, महाविद्यालय व मंगल कार्यालयासह पाच मालमत्तांना थकीत कर न भरल्याने मनपाच्या प्रभाग पथकांनी टाळे ठोकले आहे. पहिल्या दिवशीच्या कारवाईत तीन लाख रूपयांपेक्षा अधिक कर देखील वसुल करण्यात आला आहे.

थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने वारंवार विशेष कर वसुली मोहीम राबवित व्याज व दंडात 75 टक्क्यापर्यंत सुट दिली. मात्र, यानंतरही मालमत्ताधारक थकबाकी भरत नसल्याने पालिकेने आता कडक पाऊल उचलले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी बुधवारपासून विशेष कर वसुली मोहीम राबवित असल्याची घोषणा केली होती. या मोहीमेत आता बड्या व्यावसायिक थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत त्याप्रमाणे अधिकार्‍यांना आदेशित केले होते. त्यानुसार बुधवारी दि.21 पालिकेच्या प्रभाग अधिकार्‍यांनी मोहीमेला सुरूवात केली. प्रभाग-1 मध्ये प्रमुख अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या नेतृत्वात शारिरीक शिक्षण महाविद्यालय पीएस कॉलेज परिसरातील प्राचार्यांचा हॉल सिल करण्यात आला. तर डायमंड हॉल येथे दोन दुकाने सिल केली. पथक कारवाईसाठी गेले असता शिवेश्वर मंडप यांनी लगेच दोन लाख रूपयांच्या कराचा भरणार केला. याप्रमाणे प्रभाग-1 मध्ये सहा मालमत्तांवर कारवाई करत 3 लाख 15 हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला. प्रभाग-7 मध्ये प्रमुख अधिकारी महावीर पाटणी यांच्या नेतृत्वात डॉ. आर.पी. नाथ हायस्कूल शाळेकडे 3 लाख 30 हजार 763 थकबाकी असल्याने शाळेच्या अनुक्रमे कॉम्पुटर रूम, हेडमास्तर यांची रूम व हजेरी रूम अशा 3 खोल्यांना टाळे ठोकण्यात आले. प्रमोद किशोरीलाल जैस्वाल यांनी 50 हजार रुपयांचे दोन धनादेश पुढील 2 दिवसांचे दिले. तर जय भवानीनगर येथील खालसा मंगल कार्यालय यांच्या कडे 1 लाख 85 हजार 207 रुपये थकबाकी होती. पथक कारवाईला गेल्यानंतरही ती भरली नसल्याने मंगल कार्यालय सिल करण्यात आले.
परप्रांतीय भामट्याने ठेकेदाराला ५६ लाखाला गंडविले, यंत्रसामुग्री केली गायब

औरंंगाबाद/प्रतिनिधी 
शासकीय ठेकेदाराला राजस्थानी भामट्याने गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. राजस्थानी भामट्याने पुलाच्या बांधकामासाठी नेलेली ५६ लाख रूपये किंमतीची यंत्रसामुग्री गायब केली आहे. शरद दादीज कैलास दादीज (वय ४०, रा. नलका नाल्याजवळ, प्लॉट नंबर ७/८, शिवाजीनगर, बागन, राजस्थान) अशी फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव आहे.

अहिंसानगर येथील रहिवासी विश्वनाथ शामराव घुगे (वय ६५) हे शासकीय ठेकेदार असून ते महाराष्ट्र, राजस्थान आणि गोवा राज्यात पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणारी कामे करतात. २०१५ साली त्यांना राजस्थान येथील बेनगंगा नदीवर पुल उभारण्याचे काम मिळाले होते. त्या कामावर देखरेख करण्यासाठी विश्वनाथ घुगे यांनी शरद दादीज कैलासचंद्र दादीज याला सुपरवायझर म्हणून नेमले होते. तसेच बांधकामासाठी ट्रक क्रमांक (एमएच-२०-एटी-२३९७), जीप क्रमांक (एमएच-२०-डीव्ही-६५९७), स्वीसींगसीटर प्लॉट, जनरेटर, २ क्राँक्रीट मिक्सर, सेंट्रीग प्लेट, जॅक असा एकूण ५६ लाख रूपये किंमतीची यंत्रसामुग्री १ फेब्रुवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान शरद दादीज यांच्या ताब्यात दिली होती.
दरम्यान, शरद दादीज याने काम पुर्ण झाल्यावर स्थानिक गुंडाच्या मदतीने विश्वनाथ घुगे व त्यांचा मुलगा महेश घुगे यांना यंत्रसामुग्री परत नेण्यास विरोध केला. त्यानंतर दादीज याने घुगे यांच्या मालकीची यंत्रसामुग्री इतरत्र भाड्याने देवून भाड्यापोटी मिळालेल्या रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी महेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद दादीज याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक साईनाथ गिते करीत आहेत.
एटीएम कार्डाची अदलाबदली करून ६० हजार लांबविले

औरंंगाबाद/प्रतिनिधी
नवीन मिळालेले एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी एटीएम सेंटर येथे गेलेल्या महिलेच्या एटीएम कार्डासोबत अदलाबदली करून दोन भामट्यांनी तिच्या बँक खात्यावरून ६० हजार रूपये लंपास केले. ही घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.
गारखेडा परिसरातील सारंग हौसींग सोसायटी येथे राहणाऱ्या रेणुका सचिन राजे (वय ४२) यांचे एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांना नुकतेच बँकेने एटीएम कार्ड दिले होते. नवीन कार्ड सुरू करण्यासाठी रेणुका राजे या २० ऑगस्ट रोजी पटीयाला कॉर्नर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटर येथे गेल्या होत्या. राजे या एटीएमचा पासवर्ड लॉग इन करीत असतांना एटीएममध्ये आलेल्या २५ ते ३० वयोगटातील दोन जणांनी तुम्ही चुकीचा पासवर्ड टाकत असल्याचे सांगून त्यांचे एटीएम कार्ड घेवून त्याच्या बदलीत दुसरेच कार्ड राजे यांच्या हातात देवून निघुन गेले.
दरम्यान, भामट्यांनी रेणूका राजे यांच्या एटीएम कार्डाच्या आधारे त्यांच्या बँक खात्यातून एकदा २० हजार तर एकदा ४० असे एकूण ६० हजार रूपये काढले. याप्रकरणी रेणूका राजे यांच्या तक्रारीवरून एटीएम कार्डाची अदलाबदली करून ६० हजार रूपये लांबविणाऱ्या दोघाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विकास खटके करीत आहेत.
आजपर्यंतच्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत भ्रष्ट्राचाराचा मलिदा चाखला : नगरसेविका वाडकर खणखणीत आरोप

मनपात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका प्रशासनातील अधिकारी एकाच विभागात ठाण मांडून वर्षानुवर्षे बसलेले आहेत. त्यामुळे विकास कामे ठप्प झाली असून आता पर्यंत आलेल्या जवळपास सर्व आयुक्तांनी भ्रष्टाचारात सामील होत अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचाराचा मलिदा चाखला आहे, असा घणाघाती आरोप नगरसेविका शिल्पराणी वाडकर यांनी केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार नियतकालिक बदल्या करण्यात याव्या अशी मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले आहे.

नगरसेविका वाडकर यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मनपातील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेले आहेत. यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत वेळोवेळी प्रशासनाला विचारणा केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शासकीय बदल्यांचे विनियम केले आहे.  त्यात अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणणे, पारदर्शकता जपणे, कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन गतिमान करणे यासाठी बदल्या करणे आवश्यक आहे. मात्र, आत्तापर्यंत महापालिकेत आलेले जवळपास आयुक्त यांनी अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचारात सामील असल्याने त्यांनी अनेक वर्षांपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांना महत्वाच्या व भ्रष्टाचारास पोषक असलेल्या विभागातून बदल्या केलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांनाही भ्रष्टाचाराचा मलिदा चाखला आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक संकटात सापडली आहे. मनपातील गैरकारभाराची सीआयडी मार्फत चौकशी केल्यास बहुताउंश अधिकारी- कर्मचारी जेल मध्ये दिसतील असा घणाघाती आरोप वाडकर यांनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, नगररचना विभागाला आर्थिक वर्षात 220 कोटी वसुलीचे उद्दिष्ठ असताना केवळ 55 कोटी वसुली झाली आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कोणतेही परिश्रम घेतलेले नाहीत. मालमत्ता कर वसुलीचे 450 कोटींचे उद्दिष्ठ असताना केवळ 115 कोटी वसुली झाली. त्यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. मनपाच्या मालमत्ताच्या भाडेपट्टा व भाड्याच्या रकमा थकीत असून करारनामे कालबाह्य आहेत. यासह अनेक आरोप करत त्यांनी अधिकारी केवळ मौजमजा करायला येतात त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नसून त्यांच्या बदल्या कराव्या अशी मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. सोबत मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रत पाठविण्यात आली आहे.

Monday, August 19, 2019

कैलासनगर भागात ठेकेदाराचा भरदिवसा भोसकून खून

दोघे जण पोलिसांच्या ताब्यात

औरंंगाबाद/प्रतिनिधी 
व्यावसायीक आर्थिक देवाण-घेवणीच्या वादातून ३२ वर्षीय ठेकेदार युवकाचा तीन जणांनी धारदार शस्त्राने भोसकून निर्घृणपणे खून केला. ही घटना सोमवारी (दि.१९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कैलासनगर भागातील गल्ली नंबर १ येथे घडली. फेरोज खान अनिस खान (वय ३२, रा.दादा कॉलनी, कैलासनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत हुसेन खान इब्राहीम खान उर्फ बाली (वय ३८, रा.दादा कॉलनी) आणि उस्मान खान या दोघांना ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरोज खान अनिस खान हा युवक ठेकेदारीचा आणि वाळुचा व्यवसाय करीत होता. गेल्या काही दिवसापासून दादा कॉलनीत राहणाऱ्या हुसेन खान उर्फ बाली याच्यासोबत फेरोज खान याचा आर्थिक देवाण-घेवणीच्या कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री फेरोज खान व हुसेन बाली यांच्यात देवाण-घेवाणीच्या कारणावरून पुन्हा एकदा जोरदार वाद झाला होता. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फेरोज खान हा आपल्या घरी असतांना हुसेन बाली याने त्याला बोलावून घेत गल्ली नंबर १ येथील सामाजिक सभागृहाजवळ नेले. त्या ठिकाणी हुसेन खान उर्फ बाली याने आपला पुतण्या उस्मान खान, मुलगा इम्रान खान हुसेन खान यांनी फेरोज खान याच्यासोबत वाद घातला. आम्हाला वाळुचा हप्ता का देत नाही असे म्हणत हुसेन खान उर्फ बाली याने धारदार शस्त्राने फेरोज खान याच्यावर हल्ला केला. त्यानंतर उस्मान खान, इम्रान खान यांनी देखील फेरोज खान याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे फेरोज खान हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, हुसेन बाली याने फेरोज खान याला बोलावून त्याचा घात केला असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर फेरोज खान याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फेरोज खान यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता उपचार सुरू असतांना दुपारी दिड वाजेच्या सुमारास फेरोज खान यांचा मृत्यू झाला. फेरोज खान यांचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त नातेवाईकांनी घाटी रूग्णालयात धाव घेतली. त्यामुळे अपघात विभागासह शवविच्छेदनगृहा समोर मोठा जमाव जमला होता. घाटीत जमाव जमला असल्याची माहिती मिळाल्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक सय्यद सिद्दीक्की आदींच्या पथकाने घाटी रूग्णालयात धाव घेवून संतप्त नातेवाईकांची समजूत काढली.


नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर गोंधळ

फेरोज खान याच्या मारेकऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करीत फेरोज खान याच्या संतप्त नातेवाईकांनी जिन्सी पोलिस ठाण्यासमोर गोंधळ घातला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संतप्त जमावाची समजूत काढुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला.

फेरोज खान याच्यावर १४ वार

हुसेन खान उर्फ बाली, उस्मान खान, इम्रान खान यांनी फेरोज खान यांच्यावर धारदार शस्त्राने १४ वार केले होते. त्यातील काही वार शरीराच्या अंतरभागात खोलपर्यंत लागल्याने फेरोज खान हे गंभीर जखमी झाले होते.

फेरोज खान यांची हत्या, वय 35, राहणार दादा कॉलनी, कैलास नगर याच्या वर हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली, आर्थिक देवाणघेवाण मधून खून झाला ची माहिती पोलिसांकडून कळाली आहे.
हत्या करणारा हाच तो आरोपी नाव हुसेन बाली



 सदरील घटनेची चौकशी करताना पोलीस विभाग औरंगाबाद दिसत आहे ही घटना कशी घडली व का घडली या मागचे कारण म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण आर्थिक.
देवाण-घेवाण करताना शहरात प्रत्येकाने सजग राहणे फार गरजेचे आहे कारण कोण तुम्हाला कधी धोका देणार यासंदर्भात सांगणे कठीण आहे त्याकरिता आपण कोणाशी व्यवहार करताना जाणीवपूर्वक विचार करूनच व्यवहार करावा.


मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा - अन्वर खान
*औरंगाबाद शहरात कार्यरत ५० स्वयंसेवी संस्थांचे सत्कार*
Photo- Baig Mushtak mirza

औरंगाबाद: दिनांक १९ ऑगस्ट २०१९. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी च्या वतीने औरंगाबाद शहरात समाजकार्य करणाऱ्या ५० स्वयंसेवी संस्थांचे सत्कार करण्यात आले. सत्कार समारंभ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर मजनू हिल औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमात औरंगाबाद शहरातील सु-प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता व एल्लोरा ग्रुप ऑफ कंपनीस चे संचालक अन्वर खान यांची मुख्य उपस्थिती होती. जी. एस. टी. आयकर विभाग चे सहायक आयुक्त चंद्रशेखर बोर्डे, माविन चे संचालक सय्यद अब्दुल रेहमान, कावीश फॉउंडेशन चे संचालक शोएब सिद्दीकी व डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वूमन चे प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष सोहेल झकीऊद्दीन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चंद्रशेखर बोर्डे यांनी स्वयंसेवी संस्थेसाठी शासनाच्या विविध योजनेचे उल्लेख करून सदर योजनेपासून जनसामान्यांसाठी कार्य करण्यासाठी स्वयंसेवीसंथांना आव्हान केले. सय्यद अब्दुल रेहमान यांनी स्वयंसेवी संस्था चालवणारे वक्ती हेच खरे नायक असल्याचे सांगितले. शोएब सिद्दीकी यांनी सांगितले कि स्वयंसेवी संस्था चालकांनी नवीन पिढीतील मुलांना स्पर्धा परीक्षे साठी प्रोत्साहित केले पाहिजे. औरंगाबाद ने खूप डॉक्टर्स आणि इंजिनिर्स दिले आहेत, आता तेहसीलदार, कलेक्टर, कमिशनर ची गरज आहे. डॉ. मकदूम फारुकी यांनी संस्थाचालकांना आपले रेकॉर्डस्, ऑडिट तसेच सर्व कागदपत्रे अपडेट ठेवण्याचे आव्हान केले. अन्वर खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 'मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असल्याचे सांगितले. या प्रसंगी श्रीमती फर्रुक जमाल (फैझ ए आम ट्रस्ट), डॉ. अर्चना सारडा (उडाण), मसिउद्दिन सिद्दीकी (सिद्दीकी वेलफेयर सोसायटी), रझी अहमद खान (अल-फरहान मेडिकल फॉउंडेशन), मोहम्मद झियाउद्दीन, मोहिद हशर (मजलिस तामीर ए मिल्लत),  अड. फैझ सय्यद (इस्लामिक रिसर्च सेंटर), प्रभुराम जाधव (हिमोफेलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र), फय्याज शेख (हैप्पी क्लब ग्रुप), सलीम सिद्दीकी (शोबा ए किदमत ए कल्क), तौसिफउल्लाह खान (जमात ए इस्लाम ए हिंद), डॉ. दिलशाद झैदी (अल हसन चेरिटेबलें ट्रस्ट), दीपक दौड (श्री. कृष्णा मेडिकल), जुनेद फारुकी (ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत), अनिस पटेल (पटेल फॉउंडेशन), दीपक आर्या (ओरफन फ्री इंडिया), नासेर शेख (एस. आई. ओ.), हाफिज अकील (के. के. ग्रुप), जफर पटेल (ग्लोबल मेडिकल फॉउंडेशन), शोएब सिद्दीकी (कावीश फॉउंडेशन), फारूक पटेल (जीवन जागृती सोसायटी), जावेद शेख (फेथ एजुकेशन अँड वेलफेयर सोसायटी), नाझीश सिद्दीकी (अजल फॉउंडेशन), देविदास उंचे (शिवम मेडिकल सोसायटी), वासिम खान (अल अजीज फॉउंडेशन), मुझफ्फर सिद्दीकी (अल्तमश वेलफेयर सोसायटी), मोहसीन मोहिउद्दीन (ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टीस), इफ्तेकार शेक (रिअल ड्रॉप), मोहम्मद रिझवान (अल-खैर फॉउंडेशन), माधव दराडे (माधव सोशल ग्रुप), अनिल लुमिया, काझी मो. शारिकउद्दीन (हेल्प टू ह्युमॅनिटी), शफिक भाई, रफिक भाई (तदफीन कमिटी), बिस्मिल्ला खान (अल-हक मेडिकल फॉउंडेशन), साजिद शेख (अल-अमान कमिटी), इम्रान शेक (तेहरीक-ए-सदा-ए-हक), मो. जफर (फ्रेंड्स ग्रुप), फिरदोस फातेमा (काफील एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), नईम खान (कॅन्डीड एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), मनोज गायके, मुबीन टोपीवाला, रफीउद्दीन रफिक (शैक्षणिक सल्लागार), शेक झिया (प्राईम वेलफेयर सोसायटी), डॉ. अबूबकर बावझीर (मायनॉरिटी ऍडवाईझरी फोरम), खान मुझम्मिल (शासकीय वैधकीय रुग्णालय), फारूक पटेल (हर्सूल), हशम हैदर (हैदर फाऊंडेशन), इम्रान खान (बेइंग अँजेल) या स्वयंसेवी संस्थेचा या प्रसंगी पुष्पगुछ, शाल, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्राचे सूत्रसंचालन मिर्झा दाऊद आझाद व मासिउद्दिन सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुस्लिम युथ फोरम व ग्लोबल मेडिकल फाऊंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...