Monday, March 25, 2019

*लोकसभा २०१९*
*अशा असतील थेट लढती*

1.    सोलापूर- सुशीलकुमार शिंदे (CONG) विरुद्ध  डॉ. जयसिध्देश्वराय स्वामी (BJP)

2.    बारामती- सुप्रिया सुळे (NCP) विरुद्ध  कांचन कुल ( BJP)

3.    दिंडोरी-  धनराज महाले (NCP) विरुद्ध  डॉ.भारती पवार ( BJP)

4.    चंद्रपूर- विनायक बांगडे  ( CONG) विरुद्ध  हंसराज अहिर (BJP)

5.    भिवंडी-  सुरेश तावरे ( CONG) विरुद्ध  कपिल पाटील (BJP)

6.    औरंगाबाद- सुभाष झांबड (CONG) विरुद्ध  चंद्रकांत खैरे ( SENA)

7.    जालना- विलास औताडे ( CONG) विरुद्ध  रावसाहेब दानवे (BJP)

8.    लातूर-  मच्छिंद्र कामंत ( CONG) विरुद्ध  डॉ. सुधाकर शृंगारे (BJP)

9.    नाशिक- समीर भुजबळ(NCP) विरुद्ध  हेमंत गोडसे (SENA)

10.    बुलडाणा-  डॉ. राजेंद्र शिंगणे( NCP) विरुद्ध  प्रतापराव जाधव (SENA)

11.    यवतमाळ- माणिकराव ठाकरे (CONG) विरुद्ध  भावना गवळी ( SENA)

12.    रायगड-  सुनिल तटकरे(NCP)  विरुद्ध  अनंत गिते (SENA)

13.    कल्याण- बाबाजी पाटील(NCP) विरुद्ध 
डॉ. श्रीकांत शिंदे (SENA)

14.    ठाणे- आनंद परांजपे(NCP) विरुद्ध  राजन विचारे (SENA)

15.    मुंबई दक्षिण मध्य-  एकनाथ गायकवाड (CONG) विरुद्ध  राहुल शेवाळे (SENA)

16.    मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा (CONG) विरुद्ध  अरविंद सावंत (SENA)

17.    मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध  श्रीरंग बारणे( SENA)

18.    शिरुर- डॉ. अमोल कोल्हे(NCP) विरुद्ध  शिवाजीराव आढळराव (SENA)

19.    शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध  सदाशिव लोखंडे (SENA)

20.    कोल्हापूर- धनंजय महाडिक(NCP) विरुद्ध  संजय मंडलिक (SENA)

21.    हातकणंगले- राजू शेट्टी ( स्वाशेसं)  विरुद्ध  धैर्यशील माने (SENA)

22.    परभणी- राजेश विटेकर (NCP) विरुद्ध  संजय जाधव (SENA)

23.    नंदुरबार ( एसटी)-  के. सी पाडवी (CONG) विरुद्ध  हिना गावित (BJP)

24.    धुळे-  कुणाल पाटील (CONG) विरुद्ध  डॉ. सुभाष भामरे (BJP)

25.    वर्धा- चारुलता टोकस (CONG) विरुद्ध  रामदास तडस (BJP)

26.    नागपूर-  नाना पटोले (CONG) विरुद्ध  नितीन गडकरी (BJP)

27.    गडचिरोली-  डॉ. नामदेव उसेंडी( CONG)  विरुद्ध  अशोक  नेते (BJP)

28.    मुंबई- उत्तर-मध्य-  प्रिया दत्त (CONG) विरुद्ध  पूनम महाजन (BJP)

29.    अहमदनगर-  संग्राम जगताप (NCP) विरुद्ध  डॉ. सुजय विखे पाटील (BJP)

30.    बीड-   डॉ. प्रीतम मुंडे (BJP) विरुद्ध  बजरंग सोनवणे(NCP)
*बोगस पत्रकारांवर येणार  संक्रांत!*Viral News-खुलासा
बेग मुश्ताक मिर्झा- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,दिल्ली 

● RNI द्वारे नोंदणीकृत वृत्तपत्र तसेच सूचना-प्रसारण मंत्रालयातर्फे TV चॅनेल्स, रेडिओ हेच फक्त पत्रकारांना ओळखपत्रे (ID - प्रेस कार्ड) देऊ शकतात. इंटरनेटवर चालविणाऱ्या न्यूजपोर्टल्स (यूट्यूब न्यूज चॅनेल्स) व केबल, डिश टीव्ही वर चालविले जाणारे न्यूज चॅनेल्स यांची कोणतीही नोंदणी नाही. त्यांना PRESS म्हणवून घेण्याचा किंवा आयकार्ड वापरण्याचा, ते जारी करण्याचा कोणताही अधिकार नाही. तसे आढळून आल्यास ते अवैध व बेकायदेशीर आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
*- कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड,*
*केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री    पत्रकार मित्रांनो सदरचा वरील मेसेज हा कुणीतरी खोडसर पणामुळे सोशल* मीडियावर व्हायरल केला आहे सध्या भारतामध्ये आदर्श आचारसंहिता लागू असताना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री यांना अशा प्रकारचे आदेश काढण्यासाठी अधिकार सध्यातरी नाही कारण की  आदर्श आचारसंहितेत कुठल्याही मंत्र्याला त्याच्या पदाचे अधिकार वापरता येत नाहीत सर्व अधिकार निवडणूक निर्वाचन आयोग गाणे गोठवण्यात आलेले असतात कोण पत्रकार आहे किंवा पत्रकाराची ओळखपत्रे प्रेस कार्ड देण्याचा अधिकार यूट्यूब न्यूज चैनल्स तसेच इंटरनेट वर चालणाऱ्या वृत्तवाहिन्या बेकायदेशीर आहे म्हणण्याचा अधिकार संबंधित माहिती प्रसारण मंत्राला  कोणी दिला सुप्रीम कोर्टाचा आदेश असेल तर कायद्याप्रमाणे  मान्य असेल मात्र खोडसाळपणा करीत प्रसिद्धी माध्यम सोशल मीडियाला बदनाम करण्याचा भ्रमित करण्याचा कारभार काही लोकांनी चालवला आहे वरील संदेश अनेक वर्षापासून विविध केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने निवडणुकीतच सोशल मीडियावर वायरल केला जातो तसं जर विचार केला तर मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये  पत्रकाराची डिग्री प्राप्त केली होती अनेक वेळा हा ही संदेश पाठवला जातो की ज्याच्याकडे इन्स्टिट्यूट मध्ये  डिग्री प्राप्त नाही तो पत्रकार नाही म्हणून सांगावेसे वाटते कि भारतीय संविधाना मध्ये कलम 19 यांनी दिलेले अधिकारा चे महत्व लोकांनी जाणून घेतले पाहिजे भारतीय लोकशाही चा आधारस्तंभ असलेली कलम 19 विषयी जर जाणून घेतले तर     पी आर बी अॅक्ट पेक्षा  कलम 19 अत्यंत महत्त्वाचे आहे ज्याने लोकशाहीत आभिव्यक्तिस्वातंत्र्य भारतीय मीडियाला सक्षम बनवण्यासाठी बळ दिले आहे कलम 19 गोठविण्यात आले तर भारतातील सर्वच न्यूज चैनल वृत्तपत्रे 100% नेस्तनाबूत होतील कलम 19 गोठणे म्हणजे भारतात आराजकता हुकूमशाही निर्माण करण्यासारखे आहे  त्यामुळे संदेशामुळे कुठल्याही पत्रकार बांधवांनी सोशल मीडियाच्या घाबरून जाण्यासारखे काहीच नाही भारतीय संविधानाने जे अधिकार कलम 19 प्रमाणे प्रदान केलेले आहे प्रचारक व प्रसारक म्हणून प्रत्येक व्यक्ती वृत्तसंकलन करीत त्याचे जाहीरपणे प्रसिद्धी करू शकतो दम असेल तर युट्युब फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम टेलिग्राम हाईक व्हाट्सअप यासारख्या सर्वच internet वर programmer वर बंदी घाला तेच शासनाला शक्य होणार नाही    बांधकाम मिस्तरी  ला शासन कडून   हजारो कोटींची उधळण करून शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा कारभार मात्र लबाड  मंत्र्याकडून होत आहे  पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांच्या पेन्शन योजना घरांसाठी घरकुल योजना पत्रकारांसाठी विधान मंडळात आरक्षित आमदार की  ची जागा लोसभेत आरक्षित भारतातून पन्नास खासदार   पत्रकार तून मतदान घेऊन खासदारकीचे पद देण्याचे निर्णय  लोकसभेत विधानसभेत कधी घेऊ शकत नाही मात्र मंत्र्याच्या खुर्च्यांना  भ्रष्टाचाराचे आधार असल्याने उठ सूट मीडियावरच नियम अटी शर्ती लागू करून बंदिस्त करण्याचा कारभार याच्या कडुन  केला जात आहे

Sunday, March 24, 2019

*एका पत्रकारचा सुखद अनुभव शेअर करतोय नक्की वाचा*

दिनांक २० मार्च २०१९
आज सकाळी मी गोरेगाव वरून माझे काम आटपून दादर ला येत असताना जोगेश्वरी हायवे ला एका निरागस मुलाने मला लिफ्ट मागितली, मी थांबलो त्याला बाईक वर बसवले तो बोलला काका मला शंकरवाडी स्टॉप ला सोडा,    मी बोललो मला माहीत नाही तूच सांग मला मी गाडी थांबवतो त्याने जेव्हा गाडी थांबवायला सांगितली तेव्हा खूप अंतर आम्ही पुढे आलो होतो.  मी त्याला विचारले खूप लांब आहे रे जिथून मी तुला घेतले आणि आता इथे सोडले , जाताना तू कसा गेलास ?
तो बोलला मी चालत गेलो मी बोललो एवढ्या लांब ? तो बोलला , हो माझ्या बहिणीचे रिपोर्ट घ्यायचे होते, आईने मला बस ला २० रु. दिले आहे ,जाताना १० वाचवले आणि आता तुमच्यामुळे १० वाचले .
मी बोललो असे का केले ?तो बोलला आई ने मला चांगल्या शाळेत घातले आहे,  मग असे वर्षभर पैसे वाचवून मी शाळा चालू झाले की त्या पैशाचा स्कूल युनिफॉर्म घेतो.
डोळ्यात आपसूक पाणी आले आताच्या या काळात संस्कार बघायला मिळाले मला ,
नंतर मी त्याला बोललो तू असा कोणाच्या पण गाडीला लिफ्ट नको मागत जाऊस लोक बरोबर नाहीत रे
तो बोलला मी कोणाच्या पण गाडीला लिफ्ट नाही मागत मग मला का मागीतलीस तो बोलला तुमच्या गाडीवर PRESS लिहले होते ना म्हणून लिफ्ट मागितली .

मी बोललो का असे?

तो बोलला आई ने मला सांगितले आहे की सगळे धोका देतील पण ,पत्रकार धोका न देता तुला तुझ्या योग्य जागेवर पोहचवतील .

आज अभिमानाने छाती फुगून आली की मी एका पत्रकार आहे...🙏🏼
*बोगस पत्रकारांवर येणार  संक्रांत!*,तात्काळ कारवाई चे संकेत- कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड,केंद्रीय मंत्री,भारत सरकार,दिल्ली.

● RNI द्वारे नोंदणीकृत वृत्तपत्र तसेच सूचना-प्रसारण मंत्रालयातर्फे TV चॅनेल्स, रेडिओ हेच फक्त पत्रकारांना ओळखपत्रे (ID - प्रेस कार्ड) देऊ शकतात. इंटरनेटवर चालविणाऱ्या न्यूजपोर्टल्स (यूट्यूब न्यूज चॅनेल्स) व केबल, डिश टीव्ही वर चालविले जाणारे न्यूज चॅनेल्स यांची कोणतीही नोंदणी नाही. त्यांना PRESS म्हणवून घेण्याचा किंवा आयकार्ड वापरण्याचा, ते जारी करण्याचा कोणताही अधिकार नाही. तसे आढळून आल्यास ते अवैध व बेकायदेशीर आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
*- कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड,*
केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री






For more details plz Share,Comments,like & Share, Subscribe YUVA SAMNA MEDIA GROUP,DELHI.
नवी मुंबईमध्ये 70 लाखांची वाईन जप्त


गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने 70 लाखांची वाईन जप्त केली आहे. अवैधरित्या गोडाऊनमध्ये हा दारूसाठा करण्यात आला होता.गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने 70 लाखांची वाईन जप्त केली आहे. अवैधरित्या गोडाऊनमध्ये हा दारूसाठा करण्यात आला होता. तुर्भे एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीत्याठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 6 हजार हून अधिक वाईनच्या बाटल्या आढळून आल्या.  त्याची किंमत 70 लाखांहून अधिक आहे. याबाबत पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, कस्टमच्या लिलावात दारू खरेदी केल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याची कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे दारूसाठा जप्त करून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये वाटण्यासाठी हा दारूसाठा करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आजवरची ही सर्वात  मोठी कारवाई आहे.
माढ्याचा तिढा अखेर सुटला; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी, संजय शिंदेंशी होणार सामना
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांचा तिढा अखेर सुटला आहे.
भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रणजितसिंह निंबाळकर हे सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे, पण उद्या दे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना माढ्याचे तिकीट देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माढ्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता रणजितसिंह निंबाळकर विरूद्ध संजय शिंदे असा थेट मुकावला पाहायला मिळणार आहे. तत्पुर्वी माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार अस जाहीर झालं होत, पण ऐनवेळी पवारांनी माघार घेतल्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी पक्की होती. पण त्यांचे सुपूत्र रणजितसिंब मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. यानंतर भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांना मैदानात उतरवणार असे सगळ्यांना वाटत होते, पण भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे तिकीट दिले.

Saturday, March 23, 2019

औरंगाबाद शहरात श्री संस्थान गणपतीची आरती करून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोनगावकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभयसिंग गायकवाड, मनपा स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन, शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी, नगरसेवक ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, राजेंद्र दानवे, ऋषिकेश जैस्वाल, तसेच शिवसेना महिला आघाडी च्या पदाधिकारी यांची उपस्तीती होती. यावेळी शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत नाशिक येथून बोलविण्यात आलेल्या ढोल पथकांनी विशेष लक्ष वेधले. जय भवानी, जय शिवाजी च्या जय घोषात परिसर दुमदुमला.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...