Sunday, March 24, 2019

*एका पत्रकारचा सुखद अनुभव शेअर करतोय नक्की वाचा*

दिनांक २० मार्च २०१९
आज सकाळी मी गोरेगाव वरून माझे काम आटपून दादर ला येत असताना जोगेश्वरी हायवे ला एका निरागस मुलाने मला लिफ्ट मागितली, मी थांबलो त्याला बाईक वर बसवले तो बोलला काका मला शंकरवाडी स्टॉप ला सोडा,    मी बोललो मला माहीत नाही तूच सांग मला मी गाडी थांबवतो त्याने जेव्हा गाडी थांबवायला सांगितली तेव्हा खूप अंतर आम्ही पुढे आलो होतो.  मी त्याला विचारले खूप लांब आहे रे जिथून मी तुला घेतले आणि आता इथे सोडले , जाताना तू कसा गेलास ?
तो बोलला मी चालत गेलो मी बोललो एवढ्या लांब ? तो बोलला , हो माझ्या बहिणीचे रिपोर्ट घ्यायचे होते, आईने मला बस ला २० रु. दिले आहे ,जाताना १० वाचवले आणि आता तुमच्यामुळे १० वाचले .
मी बोललो असे का केले ?तो बोलला आई ने मला चांगल्या शाळेत घातले आहे,  मग असे वर्षभर पैसे वाचवून मी शाळा चालू झाले की त्या पैशाचा स्कूल युनिफॉर्म घेतो.
डोळ्यात आपसूक पाणी आले आताच्या या काळात संस्कार बघायला मिळाले मला ,
नंतर मी त्याला बोललो तू असा कोणाच्या पण गाडीला लिफ्ट नको मागत जाऊस लोक बरोबर नाहीत रे
तो बोलला मी कोणाच्या पण गाडीला लिफ्ट नाही मागत मग मला का मागीतलीस तो बोलला तुमच्या गाडीवर PRESS लिहले होते ना म्हणून लिफ्ट मागितली .

मी बोललो का असे?

तो बोलला आई ने मला सांगितले आहे की सगळे धोका देतील पण ,पत्रकार धोका न देता तुला तुझ्या योग्य जागेवर पोहचवतील .

आज अभिमानाने छाती फुगून आली की मी एका पत्रकार आहे...🙏🏼

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...