Thursday, March 7, 2019

ज्युबलीपार्क चौकात मृतदेह रस्त्यावर ठेवून मातंग समाजाच्या आरक्षणासाठी निदर्शने

औरंंगाबाद/प्रतिनिधी  : मातंग समाजाला वेगळे आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील संजय ज्ञानोबा ताकतोंडे (वय ३५, रा.साळेगाव, ता.केज, जि. बीड) याने मंगळवारी जलसमाधी घेतली होती. ताकतोंडे यांचे बुधवारी (दि.६) घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी ज्युबलीपार्क येथील चौकात संजय ताकतोंडे याचा मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल १ तास जोरदार निदर्शने केली. ज्युबलीपार्क परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण मिळावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास भरघोस निधी मिळावा आदी मागण्यासाठी संजय ताकतोंडे याने मंगळवारी आपला अडीच मिनिटांचा व्हीडीओ मोबाईलवर व्हायरल करून बीडमधील बिंदुसरा प्रकल्पात जलसमाधी घेतली होती. बुधवारी संजय ताकतोंडे याचे घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय ताकतोंडे याच्या कुटुंबियास ५० लाख रूपये शासनाने मदत करावी, संजय ताकतोंडे याच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, मातंग समाजाला आरक्षण न देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

पोलिसांनी कार्यकर्त्यांनी समजूत काढल्यावर कार्यकर्त्यांनी संजय ताकतोंडे याचा मृतदेह ताब्यात घेतला. परंतु कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत ज्युबलीपार्क चौकात रुग्णवाहिकेतून मृतदेह बाहेर काढुन रस्त्यावर ठेवून निदर्शने करण्यास सुरूवात केली. यामुळे एकच गोंधळ उडाल्याने तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक दादाराव शिनगारे, विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक अमोल देशमुख, विजय पवार, गोरख चव्हाण यांच्यासह क्युआरटी कमांडो, दंगा नियंत्रण पथक, पोलिस आयुक्तालयातील स्ट्रायकींग फोर्स घटनास्थळी दाखल झाला होता. तासभर आंदोलन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी संजय ताकतोंडे याचा मृतदेह घेवून बीडकडे प्रयाण केले.

Wednesday, March 6, 2019

मनपाची प्लास्टिक कॅरीबॅग जप्ती मोहीम जोरात ; नागरिक मित्र पथकाने लाखभर दंड वसूल केला

औरंगाबाद/प्रतिनिधी : महापालिकेची शहरात प्लास्टिक बंदी मोहीम जोरात सुरु असून बुधवारी (दि. ६ मार्च ) दिवसभरात एकूण नऊ प्रभागात नागरिक मित्र पथकाने केलेल्या कारवाईत २२४ व्यापाऱ्यांकडून ८० किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या. या कारवाईत तब्बल १ लाख ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शासनाने राज्यात प्लास्टिक व थर्माकाल आदी अविघटनशील वस्तुचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक व साठवणूकीवर बंदी लागू केलेली आहे. यानुसार मनपा हद्दीत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच माजी सैनिकांचे नागरी मित्र पथक स्थापन करण्यात आले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी बैठकीत प्रतिबंधीत
प्लास्टिक वापर रोखण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ५ तारखेपासून पासुन मनपा हद्दीत प्रतिबंधीत प्लास्टिकचा साठा, वाहतुक व विक्री करणा-या आस्थापनांवर जप्ती/दंडाची कार्यवाही सुरु केली आहे. बुधवारी (दि. ६ मार्च ) प्रभाग कार्यालयांच्या प्लास्टिक बंदी पथकांनी व माजी सैनिकांच्या नागरी मित्र पथकांनी ५२९ दुकानांची आणि फळविक्रेत्यांच्या
हातगाड्याची तपासणी केली. यात २२४ व्यापाऱ्यांकडून ८०.२ किलो प्रतिबंधीत प्लास्टिक जप्त केले. यात तब्बल १ लाख ६५० रुपयांचा दंड वसुल केला आहे. बंदी असणा-या प्लास्टिकचा माल वाहतुकदारांमार्फत शहरात आणल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील ट्रांसपोर्ट कार्यालय व गोदामांची तपासणी करण्याचे तसेच ट्रॅव्हल्स बसद्वारे येणाऱ्या मालाची अचानक तपासणी करण्याचे पथकांना आदेश देण्यात आलेले आहेत. अशी तपासणी करण्याकरीता सहकार्य करण्याबाबत वाहतुकदार, ट्रॅव्हल्स चालक यांना पत्र देण्यात आलेले आहे. मोठ्याप्रमाणावर व्यावसायीक क्षेत्र, भाजीमंड्या, आठवडी बाजार अशा ठिकाणी अचानक तपासणी मोहिम राबवण्यात येत आहेत.
ही मोहीम उपायुक्त ( प्र ) रवींद्र निकम, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ प्रभागात स्वच्छता निरीक्षक, नागरिक मित्र पथक आणि जवान यांनी राबविली.
*महाराष्ट्र* लोकसभा निवडणुकीत तीन टप्प्यांमध्ये मतदान होईल. मतदान *दिनांक 10, 17 आणि 24 एप्रिल रोजी आहेत*.

*मतदारसंघात मतदान तारीख*

     *पहिला टप्पा 143*
 1*बुलढाणा 10-एप्रिल -
 2*अकोला 10-एप्रिल -
 3*अमरावती 10-एप्रिल -
 4*वर्धा 10-एप्रिल -
 5*रामटेक 10-एप्रिल -
 6*नागपूर 10-एप्रिल -
 7*भंडारा-गोंडिया 10-एप्रिल -
 8*गडचिरोली-चिमुर 10-एप्रिल -
 9*चंद्रपूर 10-एप्रिल -
10*यवतमाळ-वाशिम 10-एप्रिल

      *दूसरा टप्पा 145*
 1*हिंगोली 17-एप्रिल -
 2*नांदेड 17-एप्रिल -
 3*परभणी 17-एप्रिल -
 4*मावळ 17-एप्रिल -
 5*पुणे 17-एप्रिल -
 6*बारामती 17-एप्रिल -
 7*शिरूर 17-एप्रिल -
 8*अहमदनगर 17-एप्रिल -
 9*शिर्डी 17-एप्रिल -
10*बीड 17-एप्रिल -
11*उस्मानाबाद 17-एप्रिल -
12*लातूर 17-एप्रिल -
13*सोलापूर 17-एप्रिल -
14*म्हाडा 17-एप्रिल -
15*सांगली 17-एप्रिल -
16*सातारा 17-एप्रिल -
17*रत्नागिरी-सिंधुदुर्ग 17-एप्रिल
18*कोल्हापूर 17-एप्रिल -
19*हातकणंगले 17-एप्रिल -

    *तीसरा टप्पा 146*
 1*नंदुरबार 24-एप्रिल -
 2*धुळे 24-एप्रिल -
 3*जळगाव 24-एप्रिल -
 4*राव्हर 24-एप्रिल -
 5*जालना 24-एप्रिल -
 6*औरंगाबाद 24-एप्रिल -
 7*दिंडोरी 24-एप्रिल -
 8*नाशिक 24-एप्रिल -
 9*पालघर 24-एप्रिल -
10*भिवंडी 24-एप्रिल -
11*कल्याण 24-एप्रिल -
12*ठाणे 24-एप्रिल -
13*मुंबई उत्तर 24-एप्रिल -
14*मुंबई उत्तर पश्चिम 24-एप्रिल
15*मुंबई उत्तर-पूर्व 24-एप्रिल -
16*मुंबई उत्तर मध्य 24-एप्रिल -
17*मुंबई दक्षिण मध्य 24-एप्रिल
18*मुंबई दक्षिण 24-एप्रिल -
19*रायगड 24-एप्रिल -
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक जप्ती मोहिमे अंतर्गत शहरातील विविध भागात 9 पथकांमार्फत प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात आली .

या मोहिमेत विविध भागांतील हातगाड्या, फळविक्रेते,यांची तपासणी करण्यात आली .यात 69 दुकांनदारावरती कार्यवाही करण्यात आली एकूण 298 दुकाने तपासण्यात आली त्यामध्ये 73 किलो प्लास्टिक जप्त करून 63 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही मोहीम मा उपायुक्त( प्र )श्री.रवींद्र निकम,मा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख  तथा सहायक आयुक्त श्री नंदकिशोर भोंबे,यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 झोन मधील स्वछता निरीक्षक,नागरिक मित्र पथक ,व जवान यांनी ही मोहीम यशस्वीपणे राबविली.
यापुढे ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे हातगाड्या ,प्लास्टिक विक्रेते ,व मोठे दुकानदार यांच्या वरती प्लास्टिक जप्ती अंतर्गत  कार्यवाही करण्यात येणार आहे. प्लास्टिक चा वापर टाळावा व पुढील कार्यवाही टाळावी असे आवाहन मनपा तर्फे करण्यात येत आहे.

Tuesday, March 5, 2019

जांभाळा येथील अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी






माळीवाडा प्रतिनिधीः  औरंगाबाद नाशिक रोडवर   जांभळा या गावानजिक आज सकाळी 10:30 वाजेदरम्यान ट्रक आणि स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर अपघात होऊन दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे सदर ट्रक औरंगाबादच्या दिशेने येत होता तर फोर स्विफ्ट औरंगाबादहुन जांभळा गावाकडे चालली होती या दरम्यान स्विफ्ट गाडी क्रमांक mh20 -0295 ही अतिशय भरधाव होती व ट्रक क्रमांक पी बी 13 ए एल 74 71 यांच्यात समोरासमोर अपघात झाला अपघात इतका भयानक होता की स्विफ्ट गाडीचे इंजिन दोनशे फूट दूर फेकले गेले यात मिसबा कॉलनी ,मिटमिटा येथील शेख वाजिद शेख अजगर वय 35 मिसबाह कॉलनी, मिटमिटा व शेख गणी शेख समद वय 32 राहणार मिसबाह कॉलनी ,मिटमिटा यांचा जागीच मृत्यू झाला तर तर  नसिर खान बाबु खान वय 32 राहणार, मिटमिटा व अजीम खान हसन खान वय 32 राहणार मिसबहा कॉलनी , मिटमिटा हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे घाटी दवाखान्यात हलवण्यात आले आहे यावेळी जांभाळ्या येथील दिपक चोपडे जांभाळ्यातील गावकरानी जखमीला काढून  घाटी मध्ये नेण्यासाठी मदत केली घटनेची माहिती मिळताच मिटमिटा येथील रहिवाशांनी घाटी येथे गर्दी केली होती. घटनास्थळी छावणी विभागाचे सह पोलिस आयुक्त  डी  एन मुंडे यांनी पाहणी केली व पुढील तपासाचे आदेश दिले घाटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेख नासेर शेख आरिफ ,अब्दुल करीम, भाजपा शाखाप्रमुख बाबा मुळे, एमआयएम चे ,शेख हरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  एडवोकेट हबीब कुरेशी पठाण, शिवसेनाचे नवनाथ मुळे, मगबोल कादरी  मनसेचे जिल्हा सचिव रियाज पटेल आदींनी जखमी ची चौकशी करण्यासाठी धाव घेतली तसेच मृत्यू पावलेल्या युवकां च्या घरच्यांची सांत्वना केली मृत्यू पावलेले युवक यांचे नुकतेच दोन वर्षांपूर्वी लग्न झालेले होते त्यामुळे त्यांना लहान लहान बालके असून घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे .ट्रक चालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास दौलताबाद पोलीस स्टेशन करीत आहे दौलताबाद पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अशोक शेळके ज्ञानेश्वर साबळे यांनी जखमींना घाटीत हलवण्यास वेळीच मदत केली. सदर अपघात झालेल्या ठिकाणी महामार्गाचे काम चालू असल्यामुळे वाहतूक एकाच बाजूने चालू आहे त्यामुुळे हा एकेरी मार्ग चालू आहे त्यामुळे अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहे अपघात ज्या ठिकाणी झाला ती जागा अपघाताचा ब्लॅक पॉईंट असल्याचे म्हटले जाते त्या ठिकाणी अद्याप आठ ते दहा लोकांचा अपघातांमध्ये जीव गेलेला आहे त्यामध्ये भारतीय जवानांचा ही समावेश आहे ती जागा अपघात स्थळ म्हणून जाहीर आहे तरीहीी त्या अद्याप कुठला ही दिशादर्शक फलक लावलेला नाही.
मनपा मुख्यालय येथील प्रबोधनकार सीताराम ठाकरे सभागृह येथे महिला व बालकल्याण समिती यांच्या तर्फे रिस्पॉन्सीबल नेटिझम बद्दल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यशाळेचे उदघाटन मा महापौर श्री नंदकुमार घोडले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा सभापती महिला बालकल्याण समिती श्रीमती माधुरी अदवंत,मा मुख्यलेखापरिक्षक श्रीमती दिपराणी देवतराज , मा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, महिला बालविकास अधिकारी श्रीमती अपर्णा थेटे, मा शिक्षण अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी,आहान फाउंडेशन व रिस्पॉन्सीबल नेटिझम तर्फे श्री उन्मेश जोशी, श्री विजय देशमुख ,श्री आशिष शिंदे ,व मनपा शाळेच्या 200 विद्यार्थी ,शिक्षक ,अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रिस्पॉन्सीबल नेटिझम म्हणजे इंटरनेटवर केलेल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घेऊन जबाबदारीने वागणारे व त्याचा वापर करणारे व लहान मुले व किशोरवयीन मुली व मुले ,महाविद्यालयीन मुले मुली पालकवर्ग यांच्यामध्ये या आभासी गटातील धोक्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि कायदा व मानसिक आरोग्य सांभाळून इंटरनेटवर जबाबदारीने कसे वागायचे यासाठी इंटरनेटचा वापर करताना किशोरवयीन व महाविद्यालयीन मुले ,मुली ,पालक व शिक्षक याना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे .लहान मुले ,तरुण तरुणी किंवा या वयोगटातील व्यक्तींना इंटरनेट जगाचे अत्यंत आकर्षण वाटते पण त्यातील धोक्याची त्यांना जाणीव नसते त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे.या धोक्यापासून संरक्षण करण्याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
तसेच महिलांना मोफत संगणक ओळख असे 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये मेगाप्रो कॉम्पुटर, सुयश कॉम्प्युटर, कहार कॉम्प्युटर, अक्षरा कॉम्पुटर,वर्ल्ड इन्फोटेक कॉम्प्युटर सेंटर या संस्थेच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी अमृत फाउंडेशन यांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना खिचडी वाटप,चिवडा,शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की वाटप करण्यात आले .
शिवसेनेला मिळणार पालिकेतील सत्तेत वाटा!

भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्याने आता पुणे महापालिकेत सेनेला सत्तेचा वाटा मिळणार आहे. तशी मागणीच शिवसेनेने सत्ताधारी भाजपकडे केली असून, उपमहापौरपदासह एक वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपद आणि काही विषय समित्यांच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदांची मागणीही केली आहे. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप व सेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले. त्यात भाजपने पालिकेत एकहाती सत्ता मिळविली, तर सेनेचे केवळ दहा नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सेनेला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले होते. आता मात्र निवडणुकीसाठी युती झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपचा अर्ज भरण्यासाठी सेनेने हजेरी लावली होती. आता यापुढे जाऊन सेनेला थेट सत्तेत वाटा हवा आहे.
शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी याबाबत महापौर मुक्ता टिळक यांना पत्र दिले आहे. त्यात पुढील अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद, एक वर्षासाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद, चार विषय समित्यांपैकी प्रत्येक वर्षी दोन समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद आणि एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद अशा विविध पदांची मागणी केली आहे. आता नक्की कोणती पदे सेनेला मिळणार यासंबंधीचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट आणि सेनेचे संपर्क नेते, खा. संजय राऊत आणि संपर्कप्रमुख बाळा कदम हे लवकरच एकत्र बैठक घेऊन घेणार आहेत.
दरम्यान, भाजपनेही सेनेला सत्तेत वाटा देण्याची तयारी दर्शविली असून, उपमहापौरपद आणि काही विषय समित्यांची अध्यक्षपदे सेनेला सोडली जातील, असे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...