Wednesday, March 6, 2019

मनपाची प्लास्टिक कॅरीबॅग जप्ती मोहीम जोरात ; नागरिक मित्र पथकाने लाखभर दंड वसूल केला

औरंगाबाद/प्रतिनिधी : महापालिकेची शहरात प्लास्टिक बंदी मोहीम जोरात सुरु असून बुधवारी (दि. ६ मार्च ) दिवसभरात एकूण नऊ प्रभागात नागरिक मित्र पथकाने केलेल्या कारवाईत २२४ व्यापाऱ्यांकडून ८० किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या. या कारवाईत तब्बल १ लाख ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शासनाने राज्यात प्लास्टिक व थर्माकाल आदी अविघटनशील वस्तुचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक व साठवणूकीवर बंदी लागू केलेली आहे. यानुसार मनपा हद्दीत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच माजी सैनिकांचे नागरी मित्र पथक स्थापन करण्यात आले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी बैठकीत प्रतिबंधीत
प्लास्टिक वापर रोखण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ५ तारखेपासून पासुन मनपा हद्दीत प्रतिबंधीत प्लास्टिकचा साठा, वाहतुक व विक्री करणा-या आस्थापनांवर जप्ती/दंडाची कार्यवाही सुरु केली आहे. बुधवारी (दि. ६ मार्च ) प्रभाग कार्यालयांच्या प्लास्टिक बंदी पथकांनी व माजी सैनिकांच्या नागरी मित्र पथकांनी ५२९ दुकानांची आणि फळविक्रेत्यांच्या
हातगाड्याची तपासणी केली. यात २२४ व्यापाऱ्यांकडून ८०.२ किलो प्रतिबंधीत प्लास्टिक जप्त केले. यात तब्बल १ लाख ६५० रुपयांचा दंड वसुल केला आहे. बंदी असणा-या प्लास्टिकचा माल वाहतुकदारांमार्फत शहरात आणल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील ट्रांसपोर्ट कार्यालय व गोदामांची तपासणी करण्याचे तसेच ट्रॅव्हल्स बसद्वारे येणाऱ्या मालाची अचानक तपासणी करण्याचे पथकांना आदेश देण्यात आलेले आहेत. अशी तपासणी करण्याकरीता सहकार्य करण्याबाबत वाहतुकदार, ट्रॅव्हल्स चालक यांना पत्र देण्यात आलेले आहे. मोठ्याप्रमाणावर व्यावसायीक क्षेत्र, भाजीमंड्या, आठवडी बाजार अशा ठिकाणी अचानक तपासणी मोहिम राबवण्यात येत आहेत.
ही मोहीम उपायुक्त ( प्र ) रवींद्र निकम, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ प्रभागात स्वच्छता निरीक्षक, नागरिक मित्र पथक आणि जवान यांनी राबविली.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...