Thursday, March 7, 2019

ज्युबलीपार्क चौकात मृतदेह रस्त्यावर ठेवून मातंग समाजाच्या आरक्षणासाठी निदर्शने

औरंंगाबाद/प्रतिनिधी  : मातंग समाजाला वेगळे आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील संजय ज्ञानोबा ताकतोंडे (वय ३५, रा.साळेगाव, ता.केज, जि. बीड) याने मंगळवारी जलसमाधी घेतली होती. ताकतोंडे यांचे बुधवारी (दि.६) घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी ज्युबलीपार्क येथील चौकात संजय ताकतोंडे याचा मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल १ तास जोरदार निदर्शने केली. ज्युबलीपार्क परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण मिळावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास भरघोस निधी मिळावा आदी मागण्यासाठी संजय ताकतोंडे याने मंगळवारी आपला अडीच मिनिटांचा व्हीडीओ मोबाईलवर व्हायरल करून बीडमधील बिंदुसरा प्रकल्पात जलसमाधी घेतली होती. बुधवारी संजय ताकतोंडे याचे घाटी रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय ताकतोंडे याच्या कुटुंबियास ५० लाख रूपये शासनाने मदत करावी, संजय ताकतोंडे याच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, मातंग समाजाला आरक्षण न देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

पोलिसांनी कार्यकर्त्यांनी समजूत काढल्यावर कार्यकर्त्यांनी संजय ताकतोंडे याचा मृतदेह ताब्यात घेतला. परंतु कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत ज्युबलीपार्क चौकात रुग्णवाहिकेतून मृतदेह बाहेर काढुन रस्त्यावर ठेवून निदर्शने करण्यास सुरूवात केली. यामुळे एकच गोंधळ उडाल्याने तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक दादाराव शिनगारे, विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक अमोल देशमुख, विजय पवार, गोरख चव्हाण यांच्यासह क्युआरटी कमांडो, दंगा नियंत्रण पथक, पोलिस आयुक्तालयातील स्ट्रायकींग फोर्स घटनास्थळी दाखल झाला होता. तासभर आंदोलन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी संजय ताकतोंडे याचा मृतदेह घेवून बीडकडे प्रयाण केले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...