*पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षे कैद*
*मुंबई : -* पत्रकारांवर वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आले आहे.
यानुसार आता पत्रकार वा माध्यमानंतर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षाचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोंन्हीही, अशी शिक्षा होणार आहे.
तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे.
महाराष्ट्र प्रसारमाध्यमांतील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७ या नावाने हा कायदा अस्तित्वात येणार आहे.
विधानसभेत चर्चेविना हे विधेयक मजूर करण्यात आले आहे.