युनायटेड सिग्मा हॉस्पिटल तर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त " किडनीथॉन 2019 " चे आयोजन
स्पर्धकांसोबत किडनी प्रत्यारोपण झालेले, किडनी दाते यांचा असणार सहभाग
औरंगाबाद । प्रतिनिधी
उद्या 3 मार्च 2019 रोजी जागतिक किडनी दिनानिमित्त सिग्मा गुप , युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, नेफ्रॉन किडनी केअर व नेफ्रॉन एक्सचेन्ज ट्रान्सप्लाट प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने " किडनीथॉन 2019 " या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत किडनी विकार तज्ञ डॉ . सचिन सोनी व डॉ . श्रीगणेश बरनेला यांनी दिली.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी सुदृढ जीवनशैलीचे महत्व , अवयवदान व किडनी तसेच अन्य अवयवाच्या प्रत्यारोपणा बद्दलची माहिती जनमनसात प्रसारित करण्यासाठी किडनिथॉन आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धा 10 कि . मी . , 5 कि . मी . व 2 कि . मी . या गटात होणार आहे . स्पर्धकांसोबत किडनी प्रत्यारोपण झालेले, किडनी दाते यांचा सहभाग या मॅरेथॉनचे मुख्य वैशिष्ट आहे . हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण झालेली सातारा येथील कोमल गोडसे पवार या स्पर्धेत " इव्हेंट एम्बसीडर " च्या स्वरूपात सहभागी होणार आहे . अवयव प्रत्यारोपण रुग्ण अवयव दात्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे . तसेच 147 प्रत्यारोपण रुग्ण व 64 किडनी दात्यांची या कीडनिथॉन 2019 साठी नोंदणी झाली असल्याची माहिती युनायटेड स्मिग्मा हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . अजय रोटे व मुख्य संचालक डॉ . उन्मेष टाकळकर यांनी यावेळी दिली .
युनायटेड सिग्मा हॉस्पिटलच्या समोरील प्रांगनावर उद्या सकाळी 6 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे .स्पर्धेचा मार्ग सिग्मा हॉस्पिटल, रोपळेकर हॉस्पिटल, अमरप्रीत हॉटेल,आकाशवाणी,सिडको असा असून शेवट सिग्मा हॉस्पिटल येथेच होणार आहे.या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी आपल्या शहरातील सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित राहणार आहेत .तरी जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी होऊन किडनी विकाराबद्दल व अवयवदाना संबधी जनजागृती करण्यास मदत करावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे .

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.