औरंगाबाद शहरात वर्दळीच्या भागात एका नाशाधुंद माथेफिरू ट्रक ड्रायव्हरने आपला ट्रक घुसवून अनेकांना धडक देत काही मोटारसायकल स्वरांना अक्षरश चिरडले.
या गंभीर घटनेत एका मोटारसायकल स्वराचा मृत्यू झाला तर इतर आठ ते दहा जण जखमी झाले. सिल्लोड हुन मका भरून निघालेल्या या ट्रक ड्रायव्हरने फुलंब्री हर्सूल तसेच चेलीपुरा भागात ही अनेक वाहनांना धडक दिली त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ व दहशतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान सैरावैरा सुसाट निघालेल्या या गाडीस शहरातील चम्पाचौक भागात काही लोकांना थांबविण्यात यश आले. या वेळी ट्रकच्या मागावर असलेल्या स्थानिक लोकांनी ट्रक वर तुफान दगडफेक केली त्यामुळे ट्रक चा समोरच्या भागाचा चुराडा झाला. नागरिकांनी ट्रक ड्रायव्हर व क्लिनरला खाली खेचून बेदम चोप दिला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिनसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर वासूरकर व त्यांचा पथक पाहोचले व ड्राइवर व क्लिनरला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घाटी दवाखान्यात जाऊन जखमींची विचारपूस केली. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी अफवां वर विश्वास न ठेवण्याचे लोकांना आवाहन केले.
Saturday, March 2, 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा
भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...
-
महापालिकेची विशेष कर वसुली मोहीम : शाळा, महाविद्यालय, मंगलकार्यालयासह पाच मालमत्ता सील थकबाकीदारांच्या मालमत्ताना मनपाने ठोकले टाळे ...
-
१६ वर्षाच्या अनोलखी इसमाचा दगडाने ठेचून खून ---------------------युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,नागपूर. नागपूर:- लोकसभा निवडणूक तोंडा...
-
माजी केंद्रीय अर्थ मंत्री जेष्ठ नेते श्री. अरुणजी जेटली यांचे अल्पशा आजाराने एम्स मद्धे निधन 💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐 ...

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.