Sunday, December 30, 2018

गुरुद्वारा बोर्ड नांदेड च्या सदस्य पदा करीता गंगापुर केंद्रावर  ६६टक्के मतदान 
गंगापुर( प्रतिनिधी) गुरुद्वारा बोर्ड नांदेड च्या ३ जागांकरीता दि २८ डिसेंबर ला सकाळी८:०० ते सायंकाळी५:३० पर्यंत मतदान झाले. गंगापुर मतदान केंद्रावरील २४ मतदार( ९पुरुष १५ स्त्रिया) पैकी १६ मतदारांनी(६६.६६℅) मतदानाचा हक्क बजावला.
मतदान चालू असताना तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेश द्वार बंद दिसत असल्याने तहसील कार्यालयात कामानिमित्त खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांना बाहेरूनच मागे फिरावे लागल्याने विनाकारण हेलपाटा बसला.
ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्या च्या तारखेस मुदतवाढ देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

  गंगापूर( प्रतिनिधी) सध्या  समाज कल्याण विभागाकडून  मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी  मिळणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता अर्ज भरण्याचे चालू आहे त्याची अंतिम तारीख  31 डिसेंबर अशी आहे
 मात्र तालुक्यातील  बहुतांश विद्यार्थी हे खेड्यातील आहेत  बऱ्याच जणांना कागदपत्रे मिळवण्यासाठी तालुक्याला यावे लागते त्यामुळे एके कागदपत्र जोडण्यासाठी  कित्येक हेलपाटे मारावे लागतात त्याचबरोबर अनेक  खेडेगावांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नाही.  ज्याठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी ही  विजेची समस्या, इंटरनेटच्या  स्पीड ची समस्या आहे  त्यातच भरीस भर म्हणून  ज्या वेबसाइटवरून अर्ज भरले जातात त्या वेबसाईटची  गती खूपच  मंद आहे त्यामुळे अर्ज भरण्यास खूप उशीर लागत आहे गंगापुरात इंटरनेट कॅफेवर  तर सध्या इतकी गर्दीआहे की दिवसभर बसून नाही कधी कधी संध्याकाळपर्यंत देखील  नंबर लागत नाहीनाईलाजाने कॅफेचालक कागदपत्रे ठेवून घेतात रात्री उशिरा बारा ते एक वाजेपर्यंत जागून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून देत आहेत तरीही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अद्यापही बाकी आहे  त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता च्या मुदतीत आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून होत आहे
*मागेल त्याला शेततळे योजनेस गंगापूर तालुक्यात उत्तम प्रतिसाद*
 गंगापूर( प्रतिनिधी) भूजल पातळी खोल गेल्यामुळे विहिरी व बोर झपाट्याने कयोरडे होत आहेत त्यामुळे पूर्वी सिंचनाखाली असलेले क्षेत्र झपाट्याने घटू लागले त्यावर उपाय म्हणून ' मागेल त्याला शेततळे ' नावाची योजना शासनाने जाहीर केली  शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरून शेततळ्याची मागणी करता येऊ लागली  त्यामुळे तालुक्यातून तब्बल 4746 शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले  पैकी 3281 शेततळ्यांना  कार्यारंभ आदेश देण्यात आले त्यातील  1302   शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी व्यंकटराव ठक्के  यांनी दिली


 सर्व शेततळ्यांची कामे ही चार विभागातील  मंडळ कृषी अधिकारी  यांच्या देखरेखीखाली चालू आहेत आत्तापर्यंत 1302 शेततळ्यांची कामे  पूर्ण झाली आहे उर्वरित शेततळ्याचे कामे  प्रगतीपथावर आहेत. तालुक्यातील सर्वात जास्त कामे ही एस एन झकेरिया, मंडळ कृषी अधिकारी गंगापूर (पश्चिम) यांच्या विभागात झाले आहेत त्यांच्या विभागात तब्बल  487  शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत अशी माहिती कृषी सहाय्यक  एस.ए. उदे यांनी दिली
गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील अरबगल्ली मधील रहिवासी हसन सालेह बाकोदा (ऊलायती)(६५)यांचे -हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असुन त्यांच्यावर येथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला .

-निधनवार्ता- सोयगाव,दि.२८(प्रतिनिधि) तालुक्यातील घोसला येथील शरद मन्साराम युवरे(वय ४८)यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे जरंडी येथील महात्मा ज्योतीराव फुले विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते.

*नववर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार
: राज्यात यावर्षी गंभीर दुष्काळ असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्यातील ९४ लाख ६४ हजार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. विमा कंपन्यांकडून आता छाननीचे काम सुरू झाले असून, नववर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना भरपाईची रक्‍कम मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात वादळ, अतिवृष्टी यासह अन्य कारणांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई दिली जाणार आहे. त्यानुसार विमा कंपन्यांनी क्‍लेम सेटलमेंटची कामे सुरू केली आहेत. दुसऱ्या टप्प्यात सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई दिली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप पीक विम्यापोटी ४८ कोटी ६० लाख रुपये भरले आहेत. यावर्षी राज्यातील ८५ लाख हेक्‍टरवरील पिके दुष्काळामुळे बाधित झाली असून, त्याचा सुमारे ८२ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या हिश्‍श्‍याची रक्‍कम विमा कंपन्यांना पुढील आठवड्यात दिली जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
उपविभाग अधिकारी यांनी घेतली गंगापुर येथे दुष्काळी उपाययोजनाची आढावा बैठक
टॅंकर ने अशुद्ध पाणीपुरवठा केल्यास ग्रामसेवक जबाबदार.
टीसीएलचा वापर करण्याच्या ऊपविभागीय अधीकाऱ्यांच्या सुचना

गंगापूर(प्रतिनिधी)- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क18
खाजगी टॅंकर ने पाणीपुरवठा करन्याआगोदर टीसीएल पावडरची प्रक्रीया करूनच पाणीपुरवठा करा यात हयगय झाल्याने अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकयात आल्यास याची जबाबदारी संबधीत ग्रामसेवकावर राहनार असल्याचे उपविभागीय अधीकारी संदीपान सानप यांनी ठनकाऊन सांगीतले.दुष्काळ निवारणासाठी गंगापुर येथे तहसिल कार्यालयात आयोजीत बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
दुष्काळ निवारन समिती चे अध्यक्ष दत्तु पाटील कऱ्हाळे यांच्या मागणीवरून गंगापुर तहसिल कार्यालयात दि.२६ डिसेंबर ला उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत दुष्काळात घेण्यात येणार्या ऊपाय योजनांची चर्चा झाली यामधे तालुक्यातील अधीग्रहीत बोअर व विहीरीवर माहीती दर्शक फलक लावने,पालक मंत्री पांदन योजने अंतर्गत शेतरस्त्यांचे प्रस्ताव सादर करून मंजुर शेतरस्त्याचे काम तात्काळ चालु करने,रोजगार हमी योजने अंतर्गत कामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करून नागरिकांना कामे ऊपलब्ध करने,, तालुक्यातील पशुगणना तातडीने पुर्न करून ऊपलब्ध पशुची संख्या विचारात घेऊन तालुक्यातील ऊपलब्ध चारा व निर्मान होणारी चारा टंचाई या सह अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील विसावी पशुगणना अतीषय संथ गतीने चालु असल्याने उपविभागीय अधीकारी यांनी नाराजी व्यक्त केली टॅब व सीम कार्ड देऊन 15 दिवस ऊलटुनही तालुक्यातील काही प्रगनकाची कामेच चालु नसल्याने संबधीत अधीकार्यांना सानप यांनी चांगलेच धारेवर धरले कामे लवकर करा अन्यथा गुन्हे दाखल करू अशा सुचना त्यावेळी सानप यांनी दिल्या या बैठकीत तहसिलदार अरून जर्हाड, दुष्काळ निवारन समिती चे अध्यक्ष दत्तु पाटील कऱ्हाळे ,गटविकास अधिकारी विद्याधर पाटील,तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, दुष्काळ निवारन समिती चे सदस्य जनार्दन तायडे,जनार्दन पवार यांच्या सह तालुक्यातील मंडळ अधीकारी, कृषी सहायक,तलाठी ,ग्रामसेवकांची उपस्थिती होती.

*:

तालुक्यातील दुष्काळी परीस्थीती वर प्रभावी पने काम करण्यासाठी आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या आदेशाने ग्रामस्थरीय दुष्काळ निवारन समित्या स्थापन करून तालुक्यातील गननिहाय आढावा बैठका होनार आहेत. यासाठी ग्रामस्थरीय कर्मचार्यांनी सर्व अद्ययावत माहीती ठेऊन आढावा बैठकीत उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
दत्तु पाटील कऱ्हाळे
अध्यक्ष दुष्काळ निवारन समिती गंगापुर.,

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...