Sunday, December 30, 2018

उपविभाग अधिकारी यांनी घेतली गंगापुर येथे दुष्काळी उपाययोजनाची आढावा बैठक
टॅंकर ने अशुद्ध पाणीपुरवठा केल्यास ग्रामसेवक जबाबदार.
टीसीएलचा वापर करण्याच्या ऊपविभागीय अधीकाऱ्यांच्या सुचना

गंगापूर(प्रतिनिधी)- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क18
खाजगी टॅंकर ने पाणीपुरवठा करन्याआगोदर टीसीएल पावडरची प्रक्रीया करूनच पाणीपुरवठा करा यात हयगय झाल्याने अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकयात आल्यास याची जबाबदारी संबधीत ग्रामसेवकावर राहनार असल्याचे उपविभागीय अधीकारी संदीपान सानप यांनी ठनकाऊन सांगीतले.दुष्काळ निवारणासाठी गंगापुर येथे तहसिल कार्यालयात आयोजीत बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
दुष्काळ निवारन समिती चे अध्यक्ष दत्तु पाटील कऱ्हाळे यांच्या मागणीवरून गंगापुर तहसिल कार्यालयात दि.२६ डिसेंबर ला उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत दुष्काळात घेण्यात येणार्या ऊपाय योजनांची चर्चा झाली यामधे तालुक्यातील अधीग्रहीत बोअर व विहीरीवर माहीती दर्शक फलक लावने,पालक मंत्री पांदन योजने अंतर्गत शेतरस्त्यांचे प्रस्ताव सादर करून मंजुर शेतरस्त्याचे काम तात्काळ चालु करने,रोजगार हमी योजने अंतर्गत कामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करून नागरिकांना कामे ऊपलब्ध करने,, तालुक्यातील पशुगणना तातडीने पुर्न करून ऊपलब्ध पशुची संख्या विचारात घेऊन तालुक्यातील ऊपलब्ध चारा व निर्मान होणारी चारा टंचाई या सह अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील विसावी पशुगणना अतीषय संथ गतीने चालु असल्याने उपविभागीय अधीकारी यांनी नाराजी व्यक्त केली टॅब व सीम कार्ड देऊन 15 दिवस ऊलटुनही तालुक्यातील काही प्रगनकाची कामेच चालु नसल्याने संबधीत अधीकार्यांना सानप यांनी चांगलेच धारेवर धरले कामे लवकर करा अन्यथा गुन्हे दाखल करू अशा सुचना त्यावेळी सानप यांनी दिल्या या बैठकीत तहसिलदार अरून जर्हाड, दुष्काळ निवारन समिती चे अध्यक्ष दत्तु पाटील कऱ्हाळे ,गटविकास अधिकारी विद्याधर पाटील,तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, दुष्काळ निवारन समिती चे सदस्य जनार्दन तायडे,जनार्दन पवार यांच्या सह तालुक्यातील मंडळ अधीकारी, कृषी सहायक,तलाठी ,ग्रामसेवकांची उपस्थिती होती.

*:

तालुक्यातील दुष्काळी परीस्थीती वर प्रभावी पने काम करण्यासाठी आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या आदेशाने ग्रामस्थरीय दुष्काळ निवारन समित्या स्थापन करून तालुक्यातील गननिहाय आढावा बैठका होनार आहेत. यासाठी ग्रामस्थरीय कर्मचार्यांनी सर्व अद्ययावत माहीती ठेऊन आढावा बैठकीत उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
दत्तु पाटील कऱ्हाळे
अध्यक्ष दुष्काळ निवारन समिती गंगापुर.,

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...