Sunday, December 30, 2018

मागेल त्याला शेततळे योजनेस गंगापूर तालुक्यात उत्तम प्रतिसाद
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क  गंगापूर( प्रतिनिधी) भूजल पातळी खोल गेल्यामुळे विहिरी व बोर झपाट्याने कोरडे होत आहेत त्यामुळे पूर्वी सिंचनाखाली असलेले क्षेत्र झपाट्याने घटू लागले त्यावर उपाय म्हणून ' मागेल त्याला शेततळे ' नावाची योजना शासनाने जाहीर केली  शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरून शेततळ्याची मागणी करता येऊ लागली  त्यामुळे तालुक्यातून तब्बल 4746 शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले  पैकी 3281 शेततळ्यांना  कार्यारंभ आदेश देण्यात आले त्यातील  1302   शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी व्यंकटराव ठक्के  यांनी दिली


 सर्व शेततळ्यांची कामे ही चार विभागातील  मंडळ कृषी अधिकारी  यांच्या देखरेखीखाली चालू आहेत आत्तापर्यंत 1302 शेततळ्यांची कामे  पूर्ण झाली आहे उर्वरित शेततळ्याचे कामे  प्रगतीपथावर आहेत. तालुक्यातील सर्वात जास्त कामे ही एस एन झकेरिया, मंडळ कृषी अधिकारी गंगापूर (पश्चिम) यांच्या विभागात झाले आहेत त्यांच्या विभागात तब्बल  487  शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत अशी माहिती कृषी सहाय्यक  एस.ए. उदे यांनी दिली
सोयगाव  तहसील कार्यलयातून पहिले मराठा जात प्रमाणपत्राचा मान  गजानन एकनाथ
गव्हाड  व  ज्ञानेश्वर पाटील (बाळू बोरसे)यांना सोयगाव तहसील कार्यालयातून पाहिले मराठा जात प्रमाणपत्र सोयगाव येथील  तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार प्रभू गवळी,विठ्ठल  जाधव,तलाठी नाना गायकवाड साहेब,महा इ सेवा केंद्राचे संचालक दीपक फुसे याच्या सहमान्यवरांचे  उपस्थित होते.                                                 
सोयगाव. दि.२६(प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बनोटी ता.सोयगाव येथील एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. २४) रात्री पाचोरा जामनेर रस्त्यावरील मालखेडा (ता. जामनेर) जवळ घडली.रविंद्र पन्नालाल चौधरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.


वघारी (ता. जामनेर) येथे सोमवारी सालीचे साखरपुड्यात लग्न असल्याने रविंद्र बनोटी येथुन सकाळी वघारी येथे पोहचुन कार्यक्रम आटोपल्यावर नातेवाईकांना भेटुन सायंकाळी सहा वाजता बजाज प्लॅटीना एमएच २० ई यु १०२७ क्रमांकाच्या दुचाकीवरून जामनेर पाचोरा राज्य मार्गाने बनोटी कडे येत असतांना मालखेडा गावानजीक अंधारात समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाला या अपघातात रविंद्र गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेला होता काही वेळानंतर रस्त्याने पायी जाणार्‍या तरुणांनी पाहील्याने त्याच्याकडील मोबाईल नंबर वरती आलेल्या काॅल वरील नंबरावर संपर्क साधून ओळख पटली. तोपर्यंत नातेवाईक तिथे पोहचल्यावर मरणासन्न झालेल्या रविंद्र यास पाचोरा (जि. जळगाव) येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले तिथे उपचारादरम्यान तब्बेत खालावल्याने जळगाव येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले तिथे उपचारादरम्यान त्यांचा रात्री ११.३० मिनीटांनी मृत्यू झाला उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह बनोटी येथे आणुन मंगळवारी (दि.२५)सायंकाळी त्यांच्यावर बनोटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले आणि पत्नी असा परीवार होता.


अंत्यत मनमिळाऊ स्वभावाचा रविंद्र एक कलाकार होता गावातील नाट्यमंडळात नेहमी सहभाग राहायचा आणि गावात परंपरेनुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी सोंगांचा कार्यक्रमात रावणाची भूमिका साकारायचा. घटनेच्या दहा मिनिटे अगोदर बनोटी येथील मित्राशी भ्रमणध्वनीवरुन संभाषण करुन थोड्या वेळात तिथे पोहचतो असे सांगितले आणि काळाने त्यांचा घात केला.
पळासखेडा येथे किराणा दुकानाला आग आगीत लाखोंचे नुकसान
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद
 सोयगाव.दि.२७ (प्रतिनिधी) सोयगाव तालुक्यातील पळासखेडा या गावातील  सुशिक्षित तरुण   मनोज मांगीलाल जैन यांच्या किराणा दुकानाला गुरुवार दि. २७  रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागली या आगीत किराणा दुकानात भरलेल्या किराणा मालाचे नुकसान झाले गावकऱ्यांनी ही आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला तो पर्यंत  सुमारे जवळपास साडे-तीन लाख रुपये किमतीचा किराणा माल जळून खाक झाला होता

ही आग दुकानात देवाजवळ लावलेल्या दिव्यामुळे लागल्याचे समजते आहे

 पळासखेडा येथील सुशिक्षित तरुण  मनोज मांगीलाल जैन यांनी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शासनाच्या मुद्रा लोण च्या माध्यमातून  किराणा दुकान हा व्यवसाय चालू केला होता मात्र ऐन दुष्काळ सदृश्य परिस्थिती मध्ये ते या व्यवसायातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवित होते  सर्व सुरळीत चालू असताना त्यांच्या  किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीमुळे आणि आगीत झालेल्या लाखोंच्या नुकसानी मुळे त्यांच्यावर आज वाईट वेळ आली आली आणि आपला परिवाराचा उदार निर्वाह  आणि बँकेचे मुद्रा लोण आता कसे भरायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे

दुकानाचे आगीत झालेल्या नुकसानाची पहाणी करून महसूल अधिकारी यानी पंचनामा केला , व  प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी त्यांना यावेळी  अपेक्षा केली  आहे.                       
गोवर रुबेला लसीकरण मोहीम
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.अमोल गिते ला तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मंगेश घोडके.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रमोद आल्हाट डाॅ.सतिश बोधाडे.यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम राबविण्यात आली..
यावेळी गावातील सरपंच..उपसरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..
 अंगणवाडी कर्मचारी सुनंदा आहेर..कल्पना बोरसे..ताराबाई झांबरे यांनी हया कामी परिश्रम घेतले.
हर्सुल क्र.4 मधे अपेक्षित लाभार्थी 143पैकी  113 लाभार्थयाना ही लस देण्यात आली.
उपविभाग अधिकारी यांनी घेतली गंगापुर येथे दुष्काळी उपाययोजनाची आढावा बैठक :

टॅंकर ने अशुद्ध पाणीपुरवठा केल्यास ग्रामसेवक जबाबदार.
टीसीएलचा वापर करण्याच्या ऊपविभागीय अधीकाऱ्यांच्या सुचना

गंगापूर(प्रतिनिधी)-
खाजगी टॅंकर ने पाणीपुरवठा करन्याआगोदर टीसिएल पावडरची प्रक्रीया करूनच पाणीपुरवठा करा यात हयगय झाल्याने अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकयात आल्यास याची जबाबदारी संबधीत ग्रामसेवकावर राहनार असल्याचे उपविभागीय अधीकारी संदीपान सानप यांनी ठनकाऊन सांगीतले.दुष्काळ निवारणासाठी गंगापुर येथे तहसिल कार्यालयात आयोजीत बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
दुष्काळ निवारन समिती चे अध्यक्ष दत्तु पाटील कऱ्हाळे यांच्या मागणीवरून गंगापुर तहसिल कार्यालयात दि.२६ डिसेंबर ला उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत दुष्काळात घेण्यात येणार्या ऊपाय योजनांची चर्चा झाली यामधे तालुक्यातील अधीग्रहीत बोअर व विहीरीवर माहीती दर्शक फलक लावने,पालक मंत्री पांदन योजने अंतर्गत शेतरस्त्यांचे प्रस्ताव सादर करून मंजुर शेतरस्त्याचे काम तात्काळ चालु करने,रोजगार हमी योजने अंतर्गत कामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करून नागरिकांना कामे ऊपलब्ध करने,, तालुक्यातील पशुगणना तातडीने पुर्न करून ऊपलब्ध पशुची संख्या विचारात घेऊन तालुक्यातील ऊपलब्ध चारा व निर्मान होणारी चारा टंचाई या सह अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील विसावी पशुगणना अतीषय संथ गतीने चालु असल्याने उपविभागीय अधीकारी यांनी नाराजी व्यक्त केली टॅब व सीम कार्ड देऊन 15 दिवस ऊलटुनही तालुक्यातील काही प्रगनकाची कामेच चालु नसल्याने संबधीत अधीकार्यांना सानप यांनी चांगलेच धारेवर धरले कामे लवकर करा अन्यथा गुन्हे दाखल करू अशा सुचना त्यावेळी सानप यांनी दिल्या या बैठकीत तहसिलदार अरून जर्हाड, दुष्काळ निवारन समिती चे अध्यक्ष दत्तु पाटील कऱ्हाळे ,गटविकास अधिकारी विद्याधर पाटील,तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, दुष्काळ निवारन समिती चे सदस्य जनार्दन तायडे,जनार्दन पवार यांच्या सह तालुक्यातील मंडळ अधीकारी, कृषी सहायक,तलाठी ,ग्रामसेवकांची उपस्थिती होती.


तालुक्यातील दुष्काळी परीस्थीती वर प्रभावी पने काम करण्यासाठी आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या आदेशाने ग्रामस्थरीय दुष्काळ निवारन समित्या स्थापन करून तालुक्यातील गननिहाय आढावा बैठका होनार आहेत. यासाठी ग्रामस्थरीय कर्मचार्यांनी सर्व अद्ययावत माहीती ठेऊन आढावा बैठकीत उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
दत्तु पाटील कऱ्हाळे
अध्यक्ष दुष्काळ निवारन समिती गंगापुर.,
लासुर स्टेशन येथे जिओ कंपनीचे ऑप्टिकल फायबर
टाकण्याचे काम हे अवैध रित्या मागील तीन महिन्या पासुन सुरु आहे रस्ते फोडून रस्त्याचे नुकसान करत हे काम ग्रामपंचायतच्या मुकसंमतीने रात्रीच्या अंधारात सुरुच आहे काल रात्री रेल्वे गेट जवळ काम सुरू असतानी सदरील काम ग्रामपंचायत कडून थांबवण्यात आले तरीही आद्याप पर्यंत संबंधित ठेकेदारावर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडुन कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
यापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतीलच गंणपती मंदिर रोड येथे हेच काम पूर्ण झाले या कामासाठीची परवानगी सदरील कंपनीच्या ठेकेदाराने एक लाख पाहाष्ट हजार शंभर रुपये (१६५१००)ग्रामपंचायतला भरुन घेतली होती आणि सदरील काम पूर्ण करून घेतले पण या कामामुळे गणपती मंदिर रोडचे झालेले नुकसान ग्रामपंचायतने त्वरित डागडुज करुन भरुन काढणे आपेक्षित होते पण दोन महिने उलटुन ही रस्त्याचे डागडुज आद्याप पर्यंत झालेले नाही.

मग १६५१००रुपये मोबदला स्वरुपात स्विकारुन ग्रामपंचायत का स्वस्थ बसलेली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याआधी ही अवैध रित्या जिल्हा परिषद अंतर्गत असणार्या दायगावरोड वर देखील हेच खोदकाम कुठल्याही परवानगी शिवाय सर्रासपणे सुरू होते याची माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख नितीन कांजुणे व युवासेना उपशहर प्रमुख अमोल शिरसाठ यांनी तत्काळ ते काम थांबवुन जि.प.सहाय्याक अभियंता श्रीहत्ते यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली यापाठ पुराव्यामुळे सदरील ठेकेदाराने ८२,६७५रुपये भरुन जिल्हा परिषद कडून परवानगी घेऊन काम पूर्ण करण्यास भाग पाडले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...