Sunday, December 30, 2018

सोयगाव. दि.२६(प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बनोटी ता.सोयगाव येथील एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. २४) रात्री पाचोरा जामनेर रस्त्यावरील मालखेडा (ता. जामनेर) जवळ घडली.रविंद्र पन्नालाल चौधरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.


वघारी (ता. जामनेर) येथे सोमवारी सालीचे साखरपुड्यात लग्न असल्याने रविंद्र बनोटी येथुन सकाळी वघारी येथे पोहचुन कार्यक्रम आटोपल्यावर नातेवाईकांना भेटुन सायंकाळी सहा वाजता बजाज प्लॅटीना एमएच २० ई यु १०२७ क्रमांकाच्या दुचाकीवरून जामनेर पाचोरा राज्य मार्गाने बनोटी कडे येत असतांना मालखेडा गावानजीक अंधारात समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाला या अपघातात रविंद्र गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेला होता काही वेळानंतर रस्त्याने पायी जाणार्‍या तरुणांनी पाहील्याने त्याच्याकडील मोबाईल नंबर वरती आलेल्या काॅल वरील नंबरावर संपर्क साधून ओळख पटली. तोपर्यंत नातेवाईक तिथे पोहचल्यावर मरणासन्न झालेल्या रविंद्र यास पाचोरा (जि. जळगाव) येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले तिथे उपचारादरम्यान तब्बेत खालावल्याने जळगाव येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले तिथे उपचारादरम्यान त्यांचा रात्री ११.३० मिनीटांनी मृत्यू झाला उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह बनोटी येथे आणुन मंगळवारी (दि.२५)सायंकाळी त्यांच्यावर बनोटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले आणि पत्नी असा परीवार होता.


अंत्यत मनमिळाऊ स्वभावाचा रविंद्र एक कलाकार होता गावातील नाट्यमंडळात नेहमी सहभाग राहायचा आणि गावात परंपरेनुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी सोंगांचा कार्यक्रमात रावणाची भूमिका साकारायचा. घटनेच्या दहा मिनिटे अगोदर बनोटी येथील मित्राशी भ्रमणध्वनीवरुन संभाषण करुन थोड्या वेळात तिथे पोहचतो असे सांगितले आणि काळाने त्यांचा घात केला.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...