Sunday, December 30, 2018

पळासखेडा येथे किराणा दुकानाला आग आगीत लाखोंचे नुकसान
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद
 सोयगाव.दि.२७ (प्रतिनिधी) सोयगाव तालुक्यातील पळासखेडा या गावातील  सुशिक्षित तरुण   मनोज मांगीलाल जैन यांच्या किराणा दुकानाला गुरुवार दि. २७  रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागली या आगीत किराणा दुकानात भरलेल्या किराणा मालाचे नुकसान झाले गावकऱ्यांनी ही आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला तो पर्यंत  सुमारे जवळपास साडे-तीन लाख रुपये किमतीचा किराणा माल जळून खाक झाला होता

ही आग दुकानात देवाजवळ लावलेल्या दिव्यामुळे लागल्याचे समजते आहे

 पळासखेडा येथील सुशिक्षित तरुण  मनोज मांगीलाल जैन यांनी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शासनाच्या मुद्रा लोण च्या माध्यमातून  किराणा दुकान हा व्यवसाय चालू केला होता मात्र ऐन दुष्काळ सदृश्य परिस्थिती मध्ये ते या व्यवसायातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवित होते  सर्व सुरळीत चालू असताना त्यांच्या  किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीमुळे आणि आगीत झालेल्या लाखोंच्या नुकसानी मुळे त्यांच्यावर आज वाईट वेळ आली आली आणि आपला परिवाराचा उदार निर्वाह  आणि बँकेचे मुद्रा लोण आता कसे भरायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे

दुकानाचे आगीत झालेल्या नुकसानाची पहाणी करून महसूल अधिकारी यानी पंचनामा केला , व  प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी त्यांना यावेळी  अपेक्षा केली  आहे.                       

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...