Sunday, December 30, 2018

लासुर स्टेशन येथे जिओ कंपनीचे ऑप्टिकल फायबर
टाकण्याचे काम हे अवैध रित्या मागील तीन महिन्या पासुन सुरु आहे रस्ते फोडून रस्त्याचे नुकसान करत हे काम ग्रामपंचायतच्या मुकसंमतीने रात्रीच्या अंधारात सुरुच आहे काल रात्री रेल्वे गेट जवळ काम सुरू असतानी सदरील काम ग्रामपंचायत कडून थांबवण्यात आले तरीही आद्याप पर्यंत संबंधित ठेकेदारावर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडुन कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
यापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतीलच गंणपती मंदिर रोड येथे हेच काम पूर्ण झाले या कामासाठीची परवानगी सदरील कंपनीच्या ठेकेदाराने एक लाख पाहाष्ट हजार शंभर रुपये (१६५१००)ग्रामपंचायतला भरुन घेतली होती आणि सदरील काम पूर्ण करून घेतले पण या कामामुळे गणपती मंदिर रोडचे झालेले नुकसान ग्रामपंचायतने त्वरित डागडुज करुन भरुन काढणे आपेक्षित होते पण दोन महिने उलटुन ही रस्त्याचे डागडुज आद्याप पर्यंत झालेले नाही.

मग १६५१००रुपये मोबदला स्वरुपात स्विकारुन ग्रामपंचायत का स्वस्थ बसलेली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याआधी ही अवैध रित्या जिल्हा परिषद अंतर्गत असणार्या दायगावरोड वर देखील हेच खोदकाम कुठल्याही परवानगी शिवाय सर्रासपणे सुरू होते याची माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख नितीन कांजुणे व युवासेना उपशहर प्रमुख अमोल शिरसाठ यांनी तत्काळ ते काम थांबवुन जि.प.सहाय्याक अभियंता श्रीहत्ते यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली यापाठ पुराव्यामुळे सदरील ठेकेदाराने ८२,६७५रुपये भरुन जिल्हा परिषद कडून परवानगी घेऊन काम पूर्ण करण्यास भाग पाडले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...