‘न झेपणारी आश्वासने देऊ नका’; अच्छे दिन, १५ लाखांच्या ‘जुमलेबाजी’वरून उद्धव यांनी सुनावले
फोटो- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क, मुंबई
उद्धव यांनी भाजपाबरोबरच काँग्रेसलाही टोला लगावला
देशातील लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजपा युती, राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. याच मुलाखतीमध्ये त्यांनी अच्छे दिन, १५ लाखांचे आश्वासन, जुमलेबाजी या प्रश्नांनाही उत्तरे दिली आहेत. न झेपणारी आश्वासने कोणीही देऊ नयेत असं मत व्यक्त करताना त्यांनी भाजपाबरोबरच काँग्रेसलाही टोला लगावला आहे.
महाराष्ट्रामध्ये युती झाल्याने राज्याचे प्रश्न सुटतील का? या प्रश्नाचे उत्तर देताना शिवसेना जेवढं जमू शकते तितकीच आश्वासने देते असं उद्धव यांनी सांगितलं. उद्धव म्हणतात, ‘लोकांशी खोटं बोलून मला एकही मत नकोय हा शिवसेनाप्रमुखांनी दिलेला कानमंत्र आम्ही आजही पाळतो. त्यामुळेच आम्ही करु शकतो तेवढचं आम्ही बोलतो. आम्ही आवाजवी बोलत नाही. मतं मिळवण्यासाठी खोटं बोलणं आम्हाला जमत नाही. सगळ्याच राजकीय पक्षांनी असंच करावं अशी माझी अपेक्षा आहे. आवाजवी बोलणे टाळायला हवे. जमणार नाहीत अशी आश्वासने देऊ नयेत. आश्वासनांमुळे लोकांच्या स्वप्नांना धुमारे फुटून नंतर ती पूर्ण करता आली नाही तर?,’
जुमलेबाजीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणतात, ‘निवडणूक असल्याने कोणी मी तुम्हाला काहीच देणार नाही असं म्हटलं तर लोक आम्ही तुम्हाला मतंही देणार नाही असं म्हणतील. त्यामुळेच लोकांच्या आयुष्यात आतापेक्षा अधिक समाधानाच्या गोष्टी देण्याची आश्वासने दिली जातात.’ म्हणजे तुम्हाला अच्छे दिन म्हणायचं आहे का असा सवाल राऊत यांनी केला असता उद्धव यांनी अच्छे दिन म्हणजे काय याबद्दल आपले मत मांडले. ‘अच्छे दिन म्हणा किंवा सुखासमाधानाचे दिवस म्हणा. पण आश्वासन देणाऱ्यांनी जनतेला स्पष्टपणे सांगावं लागतं. पण हे सुखासमाधानाचे दिवस आणताना अवाजवी घोषणा करणे टाळावं असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण शेवटी लोकांच्या अपेक्षा खूप मोठय़ा असू शकतात. त्यांच्या अपेक्षांना आपण किती सत्य स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात आणू शकतो हे कळतं. जे आपण करू शकतो तेवढ्यापुरतंच बोलावं,’ असं उद्धव यांनी सांगितले.
‘तुम्ही जनतेला पहिलं आश्वासन किंवा वचन कोणतं दिलं असतं?’ या प्रश्नालाही उद्धव यांनी उत्तर दिले. ‘आता असं कोणतंही वचन किंवा आश्वासन शिल्लक राहिलेलं नाही, की जे कुणी दिलेलं नाही. म्हणून मी म्हटलं, प्रत्येक ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा या तर मूलभूत गरजा पुरवण्याचं आश्वासन मी दिलं असतं,’ असं उद्धव म्हणाले. अन्न, वस्र, निवारा ही जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात कायमच अपूर्ण राहिलेली संकल्पना आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनाही या गोष्टींची आश्वासने द्यावी लागत, असल्याचे मत उद्धव यांनी मांडले.
आश्वासनांच्या विषयावरुनच राऊत यांनी १५ लाख रुपयांच्या घोषणेबद्दल विचारले असता, ‘मी ती घोषणा केली नाही’ असं उत्तर उद्धव यांनी दिले. ‘आता राहुल गांधींनीही जनतेच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये टाकण्याची घोषणा केली आहे. पण देशाच्या तिजोरीचा कुणी विचार केलाय का?’ असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. ‘१५ लाख’ हा आजही वादाचा विषय असल्याबद्दल सहमती दर्शवत उद्धव यांनी पूर्ण करु शकता येणारी नाही अशी आश्वासने देऊ नये असं मत नोंदवलं. ‘कोणीही अवाजवी घोषणा करू नयेत. लोकांना नेहमी खरं बोललेलं आवडतं. ते फार मोठी अपेक्षा आपल्याकडून करीत नाहीत. त्यांचं रोजचं जे आयुष्य आहे तेवढय़ापुरतं खरोखर दिलंत तर जेवढं जमतं तेवढं हा करतोय असं ते म्हणतील. पण एखादी अवाजवी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करू शकलो नाही तर लोकांचा असंतोष वाढत जातो,’ असं उद्धव यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.