Tuesday, April 2, 2019

चार पोलिसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

उदगीर - येथील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून, निवडणूक आचारसंहितेचा धाक दाखवून दीड लाख रुपये लुटणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांवर अखेर सोमवारी (ता. एक) दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने झालेल्या या कारवाईत चारही पोलिसांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
फोटो- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,उदगीर,महाराष्ट्र

या संदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिलेली माहिती अशी - हनुमान कट्टा रोड परिसरातील बालाजी ज्वेलर्सचे मालक सचिन चन्नावार यांनी शुकवारी रात्री साडेआठच्या सुमारास पेढी बंद केली. बॅगेत सहा लाख रुपये ठेवून ते घरी निघाले. या वेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या शहर पोलिस ठाण्याचे हरी डावरगावे, महेश खेळगे, श्‍याम बडे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे रमेश बिरले यांनी त्यांना पकडले. ‘बॅगमध्ये काय आहे, किती पैसे आहेत, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, आम्ही निवडणूक आचारसंहितेच्या पथकामध्ये आहोत, एवढी रक्कम घेऊन फिरता येत नाही, पैसे जप्त केले जातात,’ आदी प्रश्‍नांचा भडिमार या चौघांनी चन्नावार यांच्यावर केला. त्यानंतर पन्नास टक्‍के देण्याची मागणी केली. चौकशी करा; पण पेसे देणार नाही, असा पवित्रा चन्नावार यांनी घेताच चौघा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगमधील दीड लाख रुपये बळजबरीने काढून घेतले.
या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा, रक्कम परत मिळावी, अशा आशयाचे निवेदन सचिन चन्नावार यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि त्याच्या प्रती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. निवडणूक विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी उदगीर शहर पोलिस ठाणे गाठून चन्नावार यांचा जबाब नोंदवून घेतला व चौघा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...