Tuesday, April 2, 2019

बनवाबनवी! उपग्रहाच्या मदतीनं पकडली टॅक्स चोरी
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क टिम,गाजियाबाद,उत्तर प्रदेश-
गाजियाबादमध्ये उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी पकडण्यात आली. देशातील हे पहिलंच प्रकरण आहे.

खबरदार! तुम्ही जर टॅक्स वाचवण्यासाठी चुकीचं पाऊल उचलत असाल तर तुमच्यावर उप्रगहाची नजर आहे. विश्वास नाही ना बसत? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी कशी पकडणार? ते कसं शक्य आहे? तर, थोडं थांबा. तर्क लढवण्यात तुम्ही घाई करताय. तुमच्या विश्वास बसत नाही? तर, उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये 15 कोटींची टॅक्स चोरी उपग्रहाच्या मदतीनं पकडण्यात आली. उपग्रहाच्या मदतीनं केलेली देशातील ही पहिलीच कारवाई आहे.गाजियाबादमधील हायवेजवळ असलेला व्यावसायिक कॉम्प्लेक्स शेत जमीन असल्याचं दाखवत त्याची विक्री करण्यात आली. पण, इनकम टॅक्स विभागाला संशय आला. त्यानंतर हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीकडून फोटो मागिवण्यात आले. तेव्हा सारा प्रकार समोर आला. त्यानंतर टॅक्स वसुल करण्यात आला.उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी पकडण्याचं हे देशातील पहिलंच प्रकरण आहे. गाजियाबदमधील मोदीनगर येथील एका व्यक्तीनं टॅक्स वाचवण्यासाठी फेब्रुवारी 2016मध्ये व्यावसायिक कॉम्पलेक्सची जमीन शेत जमिन असल्याचं दाखवत त्याची खरेदी केली होती. शिवाय, आयकर विभागाच्या नोटीसीला देखील तसंच उत्तर देण्यात आलं.
अखेर, जमिनीची नेमकी स्थिती समजून घेण्याकरता हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीकडून उपग्रहाच्या मदतीनं फोटो मागिवण्यात आले. त्यानंतर सारा प्रकार समोर आला. कारण, जेव्हा जमिन रजिस्टर करण्यात आली होती तेव्हा त्याठिकाणी कमर्शिअल कॉम्पलेक्स उभारण्यात आलं होतं. या फोटोंच्या आधारे आयकर विभागानं संबंधित व्यक्तिला नोटीस पाठवत 15 कोटींचा टॅक्स वसूल केला. कारण, अशा प्रकरणांमध्ये 100 टक्के टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे टॅक्स वाचवणाऱ्यांवर आता उपग्रहाची देखील नजर असणार हे नक्की!

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...