*निर्भय, नि:पक्ष, पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडा -जिल्हाधिकारी उदय चौधरी*
औरंगाबाद, दि.9 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 निर्भय, नि: पक्ष, पारदर्शक वातावरणात पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आचारसंहिता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत श्री. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी श्री. चौधरी बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, निवडणूक उपजिल्हाधिकारी निलेश श्रिंगी व पोलीस, महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीत अधिकारी – कर्मचारी यांनी करावयाची कामे, अहवाल, तंत्रज्ञानाचा वापर, भारत निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे, नियोजन आणि नियंत्रण आदींबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सविस्तरपणे सादरीकरणातून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून उत्तम संवादातून सांघिकपणे आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या दृष्टीकोनातून निवडणूक काळात काम करावे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसनही केले. श्रीमती पाटील यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच योग्य त्या सूचनाही दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी केले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.