आमदार अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद
---------------------
कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन 29 तारखेला भूमिका स्पष्ट करणार - आमदार अब्दुल सत्तार
भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही; अपक्ष लढणार असल्याने सर्वांच्या भेटी घेतल्या
----------------------
29 तारखेला औरंगाबादेत कार्यकर्त्यांचा मेळावा
* माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आमचे नेते आहेत त्यांनी आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न ही केले असतील मात्र पक्षश्रेष्ठी त्यांना विश्वासात घेत नसतील तर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यावी असा प्रश्न मला स्वतःला पडला. यामुळेच मी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाच्या पदाचाही राजीनामा दिला. अपक्ष म्हणून लढणार असल्याने मी सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहे.त्यामुळे मी भाजप असो की इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्न येत नाही असे स्पष्ट करीत आ. अब्दुल सत्तार भाजपात जाणार या विषयाला पूर्ण विराम मिळाला आहे.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकारांशी बोलतांना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय येत्या 29 तारखेला घेणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. यासाठी औरंगाबाद येथील आमखास मैदानावर 29 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
अपक्ष लढणार की काँग्रेस पक्षाकडून लढणार या प्रश्नाला उत्तर देताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की , यासाठीच 29 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. कार्यकर्त्यांनी समर्थन दिले ती भूमिका मी घेईल. निवडणूक लढावी की नाही यासाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीत केवळ औपचारिक चर्चा झाली. त्यासोबतच मी राष्ट्रवादीचे काही नेते तसेच अबू आझमी यांची ही भेट घेतली. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्याशी ही माझी फोन वर चर्चा झाली. मी औरंगाबाद लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याने मी सर्व पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहे. त्यामुळे मी भाजप किंवा इतर पक्षात जाणार हा प्रश्नच उपस्थित राहत नाही.
- आमदार अब्दुल सत्तार

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.