Tuesday, March 26, 2019

राहुल गांधी नी काल रुपये ७२ ०००० /- उत्पन्नाची हमी देणारा जाहीर नामा सादर केला .
त्यावर साद पडसाद उमटत आहेत.  भक्तांचा व पांढरपेशांचा हे गरीबांचे लाड आहेत असे मत आहे .देशाच्या अर्थव्यवस्थे संदर्भातील हा आपला पारंपरिक दृष्टीकोण आहे . व हा सामन्यतः प्रत्येक मध्यम व उच्च मध्यम वर्गीयाचा आहे . व अशाच च वर्गाचा मोदी हा नायक आहे . भारतात आपल्या वर्गवर्ण समुहाशिवाय इतरही ५०% च्या वर  वर्गवर्ण समुह राहातात . हे आपण लक्षात ठेवत नाही . त्यामुळे भ्रामक मॉडेल देणारे सामान्य वकुबाचे लोक  समाजाला भुरळ घालतात . व समाज त्याची किमत मोजतो . अमर्त्य सेन यांचे वेल्फेअर ईकॉनॉमिक्स हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गतीमान ठेवणारे तसेच देशाच्यासुद्धा फायद्याचे असते हे मी मनमोहनसिंग साहेबांच्या कारकिर्दीत अनुभवले . व  मनमोहनसिंग साहेबांच्या या धोरणाला  येथील भांडवदार वर्गाचा तर विरोध होताच पण विरोधात  कॉंग्रेसच्या समाजवादी धोरणाच्या परीणितीमुळे स्थिर झालेला सहावा वेतन आयोगी कर्मचारी आणि तसेच  संगणक क्रांतीमुळे रोजगार मिळालेला सायबर हमाल पण सामील होता .
माझ्याकडे २८ वर्षापासून एकच बाइ घरकामासाठी आहे . २८ वर्षापूर्वी ती झोपडपट्टीत रहात असे . रोज काम करणे ही तीची निकड होती . तीला ताप आला म्हणून ती कामावर आली नाही तर तिचा रोजी बुडणार होती. व पगारी रजा व सुट्या घेणारा वेतनी वर्ग तीचा खाडा कापणार होते . म्हणजे ती कामावर आली नाही तर तीचे व तीच्या मुलाबाळांचे खायचेच वांधे होणार होते . तीने  महिन्याला १० रुपये वेतनवाढ मागितली तरी खुप खळ खळ केली जात असे . पगार वाढवून दिला नाही म्हणून कामावर येणार नाही अशी भूमिका पण ती घेउ शकत नव्हती . कारण दुसर्या दिवशीचा खायचा प्रश्न होता . थोडक्यात तीच्या श्रममुल्या साठी ती बार्गेन करु शकत नव्हती . युपीए सरकारने महीन्याला ३५ किलो धान्य दिल्यावर तीच्या घरात महिन्याचा शिधा आला . व तीचे वेतन वाढवून घेण्यासाठी ती बिनदिक्कत कामावर येणार नाही . हे सांगु शकली . इतक्या साध्या गोष्टीमुळे त्या १० वर्षाच्या कालखंडात श्रमिकांची रोजंदारी चौपट झाली . त्या वर्गाच्या हातात खाण्यापिण्या व्यतीरिक्त अतीरिक्त पैसा आला . तीने घर बांधले . घरात टीव्ही फ्रीज घेतला . जी पुर्वी फाटक्या साड्या नेसत असे . ती  आता चांगल्या नेसायला लागली . हा झाला तीचा लाभ  .
देशाला समाजाला काय फायदा झाला ? तर तीची क्रयशक्ती वाढली . तीने टी वी ,फ्रिज व इतर गरजेच्या वस्तू घेतल्या . तीच्या मुलाने मोटर सायकल घेतली . यातून या वस्तुंची बाजारपेठ त्या कालखंडात झपाट्याने वाढली . त्यामुळे रोजगार निर्मिती झाली . व जागतिक मंदीच्या काळात देशाची अर्थव्यवस्था गतीमान राहीली . हे मला जाणवलेले वास्तव आहे . व ही चांगली कल्याणकारी व्यवस्था येथील पांढरपेशा अभिजन व नवमध्यमवर्गीय भंगार बाडग्या बहुजनास नको होते . तो म्हणत होता सोनिया मनमोहनसिंग गरीबांचे लाड करतात . ऐतखाउ बनवतात . यांना हटवा . गरीबांचे लाड बंद करा . त्यासाठी मोदीला आणा . तो मुसलमान , अनुसूचित जाती जमाती ,काश्मीर यांना वठणीवर आणेल . ३७० कलम रद्द करेल . राममंदीर बांधेल . सगळा लहान पासून मोठा बनिया वर्ग , मध्यमवर्ग या सुमार बेवकुफ माणसाच्या भजनी लागला . त्याच्याबद्दल कोणी काही बोलले तर अंगावर यायला लागला .

आज काय परीस्थिती आहे ?कधी नव्हे एवढी बेरोजगारी वाढली आहे . रोजगार निर्मिती पुर्ण थांबली आहे . मोदीच्या  सुरुवातीपासून कच्छपी लागलेला टपरी पासून दुकानदारी करणारा बनियाची विक्री कमालीची घटली आहे . तरी त्या मुर्खांची प्राथमिकता राममंदिर आहे .
राहुल गांधीनी सादर केलेली योजना ही जागतिक किर्तीच्या अर्थतज्ञांशी विचार विनिमय करून सादर केली आहे . त्यातून सामान्य माणसाच्या हातात पैसा आल्यास त्याची क्रयशक्ती वाढणार आहे . त्यामुळे बाजारपेठेत मागणी तयार होइल . पर्यायाने औद्योगिकीकरण व रोजगार निर्मिती होणार आहे . देशाच्या  अर्थव्यवस्थेस गती मिळणार आहे . हा खचितच उल्लु नमोसारखा १५ लाखाचा जुमला नाही .डोक ठिकाणावर ठेवून सारासार विचार करा . व कोण देशाच्या व तुमच्या भावी पिढ्यांच्या हीताचे आहे . याचा निर्णय घ्या !

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...