शहरात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
Photo-Yuva samna media News18 network Group,delhi.
दोघांना बुधवारपर्यंत कोठडी
औरंंगाबाद/प्रतिनिधी : रोशन गेट भागातील बारी कॉलनीत बनावट नोटाचा छापखाना जिन्सी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उदध्वस्त केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बुधवारपर्यंत (दि.२६) पोलीस कोठडी रवानगी केली. बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
रोशन गेट भागातील बारी कॉलनीत बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्यात येत असल्याची माहिती जिन्सी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून छापा मारला. व्यापारी शेख हारूण शेख बशीर (वय ३८ रा. बारी कॉलनी)आणि सय्यद शोहरत असगर अली (वय २५ रा.रहेमानिया कॉलनी) या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून २०० आणि १०० रुपयाची नोट, स्कॅनर, प्रिटंर, बॉड पेपर, रोख रक्कम १० हजार असे २९ हजार १५० रुपयाचे साहित्य जप्त केले.
दोघांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रोहिना अंजुम यांच्या समोर हजर करण्यात आले असता सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी बनावट नोटा छापण्यासाठी अन्य कोणी साथीदार आहे का?, बनावट नोटा चलनात आणणारे मोठे रॉकेट असून त्याचा शोध घ्यावयाचा आहे. बनावट नोटा किती चलनात आणल्या याची चौकशी करावयाची आहे, बनावट नोटाचा मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे दहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती केली.
Plz Like it and leave comments share to others.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.