Saturday, December 22, 2018

करीअरसाठी जिद्द आणि मेहनत असणे आवश्यक - क्रिकेटपटु हरभजनसिंग
Yuva Samna Media news 18 Network,Delhi.

व्हेरॉक चषक स्पर्धेत शृती इंडस्ट्रीज विजयी

औरंंगाबाद/प्रतिनिधी  :  कोणत्याही क्षेत्रात करीअर करण्याकरिता अंगात जिद्द आणि मेहनत असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय क्रिकेटपटु  हरभजनसिंग यांनी केले. शनिवारी (दि.२२) औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या व्हेरॉक चषकाच्या अंतीम सामन्यानंतर हरभजनसिंग याने उपस्थितांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या शृती इंडस्ट्रीजच्या संघाने शहर पोलिस संघावर ७ गडी राखून विजय मिळवला.
पुढे बोलताना हरभजन म्हणाला की, क्रिकेटमध्ये नाव कमाविण्यासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी अंगी असावी लागते. तसेच दुसऱ्यापेक्षा सर्वात्तम कामगिरी केल्यास यश निश्चितच भेटते. मनापासून मेहनत केल्यास तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी जेंव्हा क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली त्यावेळी आम्हाला आतासारख्या सोयी-सुविधा नव्हत्या. परंतु आताच्या खेळाडूंना अनेक दर्जेदार सोयी-सुविधा मिळत असल्याचे हरभजनसिंग यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सकाळी व्हेरॉक आंतरशालेय स्पर्धेचा अंतीम सामना राजा शिवाजी विद्यालय, वाळूज विरूध्द स.भु. हायस्वूâल या दोन संघात झाला. या सामन्यात राजा शिवाजी विद्यालयाच्या संघाने स.भु.च्या संघावर मात करीत व्हेरॉक चषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर दुपारच्या सत्रात औरंगाबाद शहर पोलिस संघ विरूध्द स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या शृती इंडस्ट्रीज या दोन संघात अंतीम सामना झाला. शहर पोलिस संघाने २० षटकात १२९ धावा उभारल्या होत्या. याला उत्तर देतांना शृती इंडस्ट्रीजच्या संघाला सुरूवातीलाच दोन धक्के बसले होते. परंतु शृती इंडस्ट्रीज संघातील खेळाडू नितीन चव्हाण याने ५३ चेंडूत ५३ धावांची खेळी करीत आपल्या संघाला शहर पोलिस संघावर ७ गड्यांनी मात करण्यात महत्वाची भुमिका बजावली.

भारतीय संघाचा क्रिकेटपटु हरभजनसिंग, व्हेरॉकचे तरंग जैन, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, उपाध्यक्ष पारस छाजेड, प्रभाकर मांडे आदींच्या हस्ते विजयी संघाला पारितोषीक आणि चषक देण्यात आला.
ह्या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी राहुल टेकाळे यांनी खुप मेहनत घेतली.

आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय संघात

किकेट खेळण्यास सुरूवात केल्यापासून भारतासाठी एक ना एक दिवस खेळणार असल्याचा आत्मविश्वास होता असे हरभजनसिंग याने यावेळी सांगितले. तसेच आपल्यासोबत ज्या खेळाडूंनी क्रिकेट खेळले, परंतु त्यांच्याकडे ध्येय नसल्याने ते काळाच्या ओघात पडद्याआड गेले असल्याचे त्याने यावेळी सांगितले. आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली असून क्रिकेट खेळाडूंनी आपला आत्मविश्वास कमी होवू देवू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Comment on post if you want to advertise with us.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...