Sunday, December 23, 2018

कार्यक्रमाच्या नियोजनातही महापौर एकटेच ; उदघाटनावरून राजकारण तापले

औरंगाबाद/प्रतिनिधी:  रविवारी मनपाच्या वतीने शहर बस सेवा आणि एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 वाजता क्रांती चौकात शहर बस सेवेचा शुभारंभ होणार असून यानंतर कांचनवाडीत एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पण होईल. या कार्यक्रमाच्या नियोजनातही महापौर एकटेच धावपळ करताना दिसत आहेत. पदाधिकारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही यातून अंग काढून घेतल्याचे चित्र आहे. सहयोगी पक्ष भाजपा आणि विरोधी पक्ष एमआयएम यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांची कायम नागरिकांच्या प्रश्नावर धडपड सुरू असते. शहरात शहर बस सेवा सुरु होत आहे. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. असे असताना यातही काहीजणांनी राजकारण सुरु केले आहे. महापौरांना एकटे पाडण्याचा सर्वबाजूनी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.
......
भाजपाला निमंत्रण दिले नाही- आ. सावे

मनपाच्या कार्यक्रमाची पत्रिकाच अद्याप आपल्याला मिळालेली नसून मनपा प्रशासन जर यात सहभागी नसेल तर हा शिवसेनेचा कार्यक्रम असणार अशी टीका आ. अतुल सावे यांनी केली. मुख्यमंत्र्यांना डावलून कार्यक्रम होत असल्याने भाजपा नेते कार्यक्रमात सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
......
एमआयएमचा कार्यक्रमावर बहिष्कार

राज्य सरकारच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाबाबत मनपाच्या विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलेले नाही. या कार्यक्रमात मनपा प्रशासनाचा सहभाग नसेल तर एमआयएम पक्ष सहभागी होण्याचा प्रश्‍नच येत नाही अशी प्रतिक्रिया आ. इम्तियाज जलील यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...