Sunday, December 30, 2018

रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना एक महिन्याच्या आत सुरू करा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे
गंगापूर (बाळासाहेब वाघमारे) गंगापूर वैजापूर तालुक्यातील ३७ गावांच्या शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी देण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितले.

 बंद पडलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने ही योजना कार्यान्वित करण्यासाठी ५ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंजूर केला आहे. त्यामुळे मागील २० वर्षांपासून बंद असलेल्या या योजनेला संजीवनी मिळाली असुन या योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजेदरम्यान विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आले होते या वेळी योजनेची माहिती पुण्यनगरी प्रतिनिधी यांना दिली

गोदावरीच्या बँक वॉटरचा वापर करुन गंगापूर वैजापूर तालुक्यातील गावांना सिंचनाचा फायदा व्हावा, या उद्देशाने माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पुढाकारातून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेमुळे तालुक्यातील २३ गावांतील १७०० एकर जमीन तसेच गंगापूर तालुक्यातील काही गावांना सिंचनाचा फायदा मिळणार होता. पण कर्जाच्या बोजामुळे ही योजना बंद पडली. या योजनेसाठी सहकारी संस्थेने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून ही रक्कम व्याजासह १३० कोटी रुपये झाले होते. जिल्हा मध्यवर्ती बँक ६५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यास तयार असून उर्वरित कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याने इतर बँका या शेतकºयांना कर्ज देत नसल्याने या भागातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. रामकृष्ण गोदावरी योजनेचा वापर फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून केला गेला. प्रत्यक्षात ही योजना सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधींना अपयश आले, असा आरोप होत होता. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष जे.के. जाधव यांनी गेल्या वर्षी कनकसागज, टाकळीसागज या भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन योजना सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी बागडे यांनी योजना सुरु करण्यासाठी अनुकुल प्रतिसाद दिला होता. त्यानंतर योजनेतील पंपिग मशीन, पाईपलाईन, व्हॉल्व्ह व इतर नादुरुस्त मशिनरी सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील बंद पडलेल्या सिंचन योजना सुरु करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदिल दाखविला असून पाच कोटी ७१ लाख रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंजूर केला होता.

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३८ गावांना फायदा वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३८ गावांना सिंचनाचा मोठा फायदा मिळणार आहे. ही योजना सुरु झाल्यास ग्रामीण भागासह वैजापूर शहर, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील जांबरगाव व रोटेगाव येथील औद्योगिक वसाहतीला पाणी मिळणार आहे.

घोटाळ्यामुळे १९९९मध्ये योजना डबघाईस १९९०-९१ या वर्षात या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. गोदावरी नदीतील कायगाव टोका येथून जायकवाडी धरणाच्या फुगवट्यातील पाणी वैजापूर तालुक्यात भूमिगत पाईपलाईनद्वारे आणण्याच्या या योजनेस १९९१ मध्येच यशही आले. मात्र, ही योजना जास्त काळ टिकली नाही. व्यवस्थापनाचे ढिसाळ नियोजन व आर्थिक घोटाळ्यामुळे १९९९ ला योजना डबघाईस येऊन बंद पडली. यामुळे हजारो शेतकºयांच्या बागायती शेती करण्याच्या स्वप्नाला तडा गेला. याशिवाय योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सभासदांच्या जमिनीवर जिल्हा बँकेच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते.
या योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली असून त्याची पाहणी करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे आले होते या वेळी जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटिल आयडियाज इंजीनियरिंग कंपनीचे प्रशांत जोशी ,अमोल पाटील मलिक ,गंगापूर शाखेचे जिल्हा बँकेचे विजय काळे आदि कर्मचारी उपस्थित होते
रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या देखभाल दुरुस्तीची गंगापूर येथे  पाहणी करतांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे व इतर.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...