Sunday, December 30, 2018

स्व. विनायकराव पाटीलच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री मुक्तानंद महाविद्यालयात अभिवादन.
गंगापूर : (प्रतिनिधी)मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. विनायकराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री मुक्तानंद महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.श्री.लक्ष्मणराव मनाळ यांची उपस्थिती होती. उपप्राचार्य प्रा.वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब पवार, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, प्रा. बाळासाहेब सातूरे , डॉ. बालाजी नवले , पर्यवेक्षक प्रा.वृद्धेश्वर पाटील, रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा.भगवान मनाळ, डॉ.अर्चना मंटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी स्व.विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. बालाजी नवले यांनी स्व.विनायकराव पाटील यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ रुपी रोपट्याचा आता मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तार झाला आहे असे प्रतिपादन केले.
प्रा.बाळासाहेब सातुरे यांनी स्व. विनायकराव पाटीलांच्या जीवनक्रमावर प्रकाश टाकत यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी आमदार श्री. मनाळ म्हणाले कि, स्व.विनायकराव पाटीलांनी मराठवाड्यात शिक्षणाची व सहकाराची मुहूर्तमेढ रोवली, त्यात त्यांनी मराठवाड्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.तसेच औरंगाबाद जिल्ह्यात सहकार क्षेत्र विकसित करण्यास भर दिला.  त्यांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.भगवान धांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...