Thursday, April 25, 2019

 अब्दुल समीर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
प्रतिनिधी(दि.24):औरंगाबाद जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पाठवला आहे,या राजीनाम्यात स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आला आहेकी पक्षात निष्ठावंत व अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची किंमत राहिलेली नसुन हुजरेगीरी करनारयाची  भरती झालेली असून अश्या पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा नसल्याचे सांगत युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे

Tuesday, April 23, 2019

✅ मतदानासाठी पोलिंग बूथ वर गेले असता जर
तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत सापडले नाही तर कलम 49 अंतर्गत तुम्ही तुमचा आधार कार्ड किँवा मतदान ओळखपत्र दाखूऊन  Challenge Vote  ची मागणी करू शकता
✅ जर तुमचे मतदान कोणी दुसऱ्याने अगोदरच केले आहे हे लक्षात आल्यावर तुम्ही Tender Vote ची मागणी करा
✅ज्या पोलिँग बूथ वर 14% पेक्षा जास्त Tender Vote झाले असतील तेथे निवडणूक पुन्हा घ्यावी लागते .
आपल्या मतदानाचा अधिकार सोडू नका.

उठा युवांनो निर्णय घ्या,चला मिळुन सारे बदल घडवूया.
हा देश आपला आम्हा अभिमान तुझे,मग सारे मिळुन देश घङवुया.
आमचा नेटवर्क,तुमची ताकद म्हणून आम्ही आहोत एक विशाल समुह,आम्ही आहोत युवा-सामना मिङीया न्युज नेटवर्क,दिल्ली.
तर असेल हिम्मत तर करा युवा-सामना.

For more and information be connect with ✒🎤👉YUVA SAMNA MEDIA
Please share it Others
And Subscribe Free to get more information by our network.
अंदाजित महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील हे असतील खासदार
Exit poll by-  YUVA SAMNA MEDIA GROUP

1. नंदुरबार
काँग्रेस – के.सी. पडवी

2. धुळे
काँग्रेस – कुणाल पाटील

3. जळगाव
राष्ट्रवादी – गुलाबराव देवकर

4. रावेर
भाजप – रक्षा खडसे

5. बुलडाणा
राष्ट्रवादी – डॉ. राजेंद्र शिंगणे

6. अकोला
भाजप – संजय धोत्रे

7. अमरावती
यु.आ.(राष्ट्रवादी)– नवनीत कौर राणा

8. वर्धा
भाजप – रामदास तडस

9. रामटेक
काँग्रेस – किशोर उत्तमराव गजभिये

10. नागपूर
भाजप – नितीन गडकरी

11. भंडारा-गोंदिया
राष्ट्रवादी – नाना पंचबुद्धे

12. गडचिरोली- चिमूर
काँग्रेस – डॉ. नामदेव उसेंडी

13. चंद्रपूर
भाजप – हंसराज अहिर

14. यवतमाळ- वाशीम
शिवसेना – भावना गवळी

15. हिंगोली
काँग्रेस – सुभाष वानखेडे

16. नांदेड
काँग्रेस – अशोकराव चव्हाण

17. परभणी
राष्ट्रवादी – राजेश विटेकर

18. जालना
भाजपा- रावसाहेब दानवे

19. औरंगाबाद
एमआयएम – इम्तियाज जलील

20. दिंडोरी
राष्ट्रवादी – धनराज महाले

21. नाशिक
राष्ट्रवादी – समीर भुजबळ

22. पालघर
बहुजन विकास आघाडी – विष्णू ठाकूर

23. भिवंडी
भाजप –कपिल  पाटील

24. कल्याण
शिवसेना – श्रीकांत शिंदे

25. ठाणे
शिवसेना – राजन विचारे

26. मुंबई उत्तर
भाजप – गोपाळ शेट्टी

27. मुंबई उत्तर पश्चिम
शिवसेना – गजानन कीर्तिकर

28. मुंबई उत्तर पूर्व
राष्ट्रवादी- संजय दिना पाटील

29. मुंबई उत्तर मध्य
 कांग्रेस- प्रिया दत्त

30. मुंबई दक्षिण मध्य
काँग्रेस – एकनाथ गायकवाड

31. मुंबई दक्षिण
शिवसेना – अरविंद सावंत

32. रायगड
राष्ट्रवादी – सुनील तटकरे

33. मावळ
राष्ट्रवादी – पार्थ पवार

34. पुणे
भाजप – गिरीश बापट

35. बारामती
राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे

36. शिरूर
राष्ट्रवादी – डाॅ.अमोल कोल्हे

37. अहमदनगर
राष्ट्रवादी – संग्राम जगताप

38. शिर्डी
काँग्रेस – भाऊसाहेब कांबळे

39. बीड
राष्ट्रवादी – बजरंग सोनवणे

40. उस्मानाबाद
राष्ट्रवादी – राणा जगजितसिंह पाटील

41. लातूर
काँग्रेस – मच्छिंद्र कामंत

42. सोलापूर
काँग्रेस- सुशीलकुमार शिंदे

43. माढा
राष्ट्रवादी – संजयमामा शिंदे

44. सांगली
स्वा.शे.सं.– विशाल पाटील

45. सातारा
राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले

46. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
म.स्वा.प.- निलेश नारायण राणे

47. कोल्हापूर
राष्ट्रवादी- धनंजय महाडिक

48. हातकनंगले
स्वा.शे.सं - राजु शेट्टी

*महाआघाडी*
    कांग्रेस- 11
  राष्ट्रवादी-18
  बविआ  -01
स्वा.शे.सं.-02
           _______
              32
   *युती*
शिवसेना-05
  भाजपा-09
          ______
             14

म.स्वा.प.-01
एमआयएम +वं.ब.आ.-01
_______________
एकूण----48
                 
(स्क्रिनशाॅट काडून ठेवा 23 मे. ला लागेल)

Monday, April 22, 2019

सुभाष झांबड यांनी मांडला व्हिजन औरंगाबाद
म्हटले मी जाती पातीवर मागितले नाही मत पण बदल घडवणार
औरंगाबाद : २१ एप्रिल ( डि 24 न्यूज)
मी लोकसभा निवडणुकीत व्हिजन औरंगाबाद असा विकासाचा संकल्प केला आहे. विजय माझाच होणार आहे. या निवडणुकीत मी असा एकच उमेदवार आहे ज्याने जाती पातीच्या नावावर मत मागितले. मी खासदार झालो तर खासदार निधी खर्च करण्यासाठी समिती बणवणार आहे. जनसामान्यांना निधीचा पुरेपुर फायदा होईल असा माझा प्रयत्न असणार आहे. विद्यमान खासदाराने गावागावात विकास कामे न करता बोगस बीले उचलल्याचे प्रकार समोर आली. शहर व जिल्यातील लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध २० वर्षात खासदाराने केल्या नाही. यासाठी मतदारांनी ठाम निश्चय केला यावेळी बदल घडणार व कॉग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला मतदार निवडून देतील असा विश्वास आहे. मी निवडणूक जिंकल्यास तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्प लाईन नंबर सुरू करणार आहे. अल्पवयीन व मागासवर्गीय विकासासाठी निर्णय घेण्यात येईल. स्मार्ट सिटि व सेफ सिटि बणवण्याचा प्रयत्न करणार, दुष्काळ मुक्त जिल्हा बणवणार, सिडको आणि एएमआरडीए विकास, आरोग्य सुविधा, रिंगरोड उभारणे, रेल्वे व विमान विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे व्हिजन कॉग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांनी प्रचार समाप्त होण्याच्या अगोदर जाहीर केला. आम आदमी पार्टी, जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र बंजारा समाजाने पाठिंबा दिल्याची घोषणा झांबड यांनी केली.
यावेळी शहर अध्यक्ष नामदेव पवार, माजी शहर अध्यक्ष एड सय्यद अक्रम, डॉ. पवन डोंगरे, फयाज कुरेशी, धोंडिराम राठोड, हाशिम उस्मानी, अजीज खोकर आदी उपस्थित होते.

Friday, April 19, 2019

*खैरेला त्रस्थ, MIM बद्दल भीती आणि संशय, पण झाम्बड़ का हर्षवर्धन यात संभ्रम असणाऱ्या मतदारानं साठी खालील आकडेवारी उपयुक्त ठरेल*

2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघात काय होईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काय झाले हे अधिकृत आकडेवारीतून समजून घेणे आवश्यक आहे.
हि आकडेवारी Election Commission of India च्या खालील अधिकृत Website वरून घेतलेली आहे.

https://eci.gov.in/files/file/3726-maharashtra-2014/

तुम्हीही ही pdf file download करून स्वतः खात्री करू शकता.
pdf file download करून औरंगाबाद लोकसभा मतदार संघात येणाऱ्या खालील विधानसभा मतदार संघाचे निकाल खाली दिलेल्या page no. वर बघू शकता.

कन्नड विधानसभा page no. 402
औरंगाबाद मध्य विधानसभा page no. 403
औरंगाबाद पश्चिम विधानसभा page no. 404
औरंगाबाद पूर्व विधानसभा page no. 405
गंगापूर विधानसभा page no. 407
वैजापूर विधानसभा page no. 408

*आता आपण एक एक विधानसभा क्षेत्रात काय काय निकाल आले आणि त्याचा आताच्या निवडणुकीशी काय संबंध आहे ते बघू.*

2014 च्या विधानसभा निवडणुकी वेळेस औरंगाबाद (मध्य, पूर्व, पश्चिम), वैजापूर, गंगापूर, कन्नड सर्व मिळून एकूण मतदारांची संख्या 16 लाख 64 हजार इतकी होती जी आता 2019 च्या निवडणुकीत वाढून 18 लाखाच्या आसपास झाली आहे. आपण असे गृहीत धरू कि वाढलेले 2 लाख मतदार हे सर्व मतदार संघात एक सारखे वाढले असतील, आणि ते सर्व जाती-धर्माचे, सर्व पक्षाच्या विचारसरणीचे असतील आणि एक सारखे वाढले असतील. म्हणून त्याचा परिणाम एक सारखा असेल.

2014 च्या विधासभेला एकूण 16 लाख 64 हजार मतदारांपैकी 11 लाख 18 हजार लोकांनी मतदानाचा हक्क बजावला जो कि टक्केवारी मध्ये 67.22% इतका होतो.

*आता आपण मतदार संघानुसार कुठल्या पक्षाला किती मतदान मिळाले आणि नंतर सर्वांची बेरीज करून आकडेवारी नुसार लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतदान होऊ शकते हे बघू*.

  *107. औरंगाबाद मध्य (107 - Aurangabad Central)*

एकूण मतदार संख्या 286978
प्रत्येक्षात झालेलं मतदान 188469 
मतदान टक्केवारी 65.67%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

इम्तियाझ जलील AIMIM 61843
प्रदीप जैस्वाल शिवसेना 41861
किशनचंद तनवाणी भाजप 40770
विनोद पाटील राष्ट्रवादी 11842
संजय जगताप बसपा 11048
M.  M. शेख काँग्रेस 9093

*108. औरंगाबाद पश्चिम (राखीव) (108 - Aurangabad West (SC))*

एकूण मतदार संख्या 287750
प्रत्येक्षात झालेलं मतदान 185810
मतदान टक्केवारी 64 .57%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

संजय शिरसाठ शिवसेना 61282
मधुकर दामोधर सावंत भाजप 54355
गंगाधर सुखदेवराव गाडे Panthers Republican Party 35348
जितेंद्र अंकुश देहाडे काँग्रेस 14798
मिलिंद यशवंतराव दाभाडे राष्ट्रवादी 5198
दाभाडे सुगंध सीताराम बसपा 4399

*109. औरंगाबाद पूर्व (108 - Aurangabad East)*

एकूण मतदार संख्या 261887
प्रत्येक्षात झालेलं मतदान 175422
मतदान टक्केवारी 66.98%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

अतुल मोरेश्वर सावे भाजप 64528
डॉ. अब्दुल गफ्फार कादरी AIMIM 60268
दर्डा राजेंद्र काँग्रेस 21203
कला  ओझा शिवसेना 11409
कचरू सोनावणे बसपा 5364
झुबेर अमानुल्लाह मोतीवाला राष्ट्रवादी 2121

*111. गंगापूर*

एकूण मतदार संख्या 271496
प्रत्येक्षात झालेलं मतदान 184124
मतदान टक्केवारी 67.82%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

बंब  प्रशांत भाजप 55483
अंबादास  एकनाथ  दानवे शिवसेना 38205
कृष्णा साहेबराव डोणगावकर राष्ट्रवादी 33216
खोसरे शोभाबाई काँग्रेस 16826

*112. वैजापूर*

एकूण मतदार संख्या 274887
प्रत्येक्षात झालेलं मतदान 192940
मतदान टक्केवारी 70.19%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

भाऊसाहेब पाटील चिकटगावकर राष्ट्रवादी 53114
R. M. वाणी शिवसेना 48405
दिनेशभाऊ परदेशी काँग्रेस 41346
एकनाथ खंडेराव जाधव भाजप 24243

*105. कन्नड*

एकूण मतदार संख्या  281425
प्रत्येक्षात झालेलं मतदान 191781
मतदान टक्केवारी  68.15%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

जाधव हर्षवर्धन रायभान शिवसेना 62542
उदयसिंग सरदारसिंग राजपूत राष्ट्रवादी 60981
संजय गव्हाणे भाजप 28037
नामदेवराव रामराव पवार काँग्रेस 21865

*आता आपण सर्व मतदारांची पक्षानुसार बेरीज करून कुठल्या पक्षाला किती मतदान झाले ते बघू*.

🔴 शिवसेना (जैस्वाल, शिरसाठ, कला ओझा, दानवे, वाणी, हर्षवर्धन)- 263704

🔴 भाजप (तनवाणी, सावंत, सावे, बंब, जाधव, गव्हाणे)- 291578

🔴 काँग्रेस (शेख, देहाडे, दर्डा, खोसरे, परदेशी, पवार)- 125131

🔴 राष्ट्रवादी (पाटील, दाभाडे, मोतीवाला, डोणगावकर, पाटील, राजपूत)- 166472

🔴 AIMIM (जलील, कादरी)- 122111

🔴 Panthers Republican पार्टी (गंगाधर गाडे)-  35348
बसप (जगताप, दाभाडे)- 15447

*आता आपण येऊया २०१९ च्या लोकसभा निवडणुकी कडे*

 🔴 *चंद्रकांत खैरे (शिवसेना + भाजप मतांची बेरीज)- 555282*
 
कागदोपत्री शिवसेना भाजप युती आहे पण कन्नड मधून हर्षवर्धन जाधव जे कि विधानसभेला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते ते स्वतंत्र लढत आहे त्यामुळे ते मतदान (62542) ह्या वेळेस चंद्रकांत खैरे ला पडणार नाही.

चंद्रकांत खैरे (शिवसेना + भाजप - हर्षवर्धन जाधवचे स्वतःचे कन्नडचे मतदान)- 555282 - 62542 = 492740

पण गंगापूर वैजापूर कन्नड येथील भाजप चे कार्यकर्ते शिवसेनेचे काम न करता हर्षवर्धन जाधव चे काम करत आहेत म्हणून आपण गृहीत धरू या कि जे विधानसभेला भाजप चे मतदार होते (गंगापूर, वैजापूर, कन्नड भाजप = 107763) त्यातील 70% मतदार हर्षवर्धन कडे वळतील- 75434.

औरंगाबाद शहरामध्ये पण खैरे बद्दल नाराजी आहे आणि हर्षवर्धन जाधव यांनी मोदी सरकार ला पाठिंबा देणार असे घोषित केले आहे त्यामुळे तिथे ही भाजप चे मतदार हर्षवर्धन कडे वळतील. (159653)

चंद्रकांत खैरे (शिवसेना - 70 % गंगापूर, वैजापूर, कन्नड, भाजप – 100% औरंगाबाद भाजप - हर्षवर्धन जाधवचे स्वतःचे कन्नडचे मतदान) = 492740-75434-159653= 257652

*चंद्रकांत खैरे एकूण अपेक्षित मतदान- 257652*

🔴 *आता हर्षवर्धन जाधव यांचे मतदान बघूया*.

2014 च्या आमदारकीला हर्षवर्धन जाधव यांना कन्नड मधून 62542  मते मिळाली आपण असे गृहीत धरूया कि ते त्यांचे स्वतःचे हक्काचे मत आहेत आणि ते आताही मिळतील. त्यासोबत गंगापूर, वैजापूर, कन्नड भाजप च्या 107763  पैकी 70 % मतदार हर्षवर्धन कडे वळतील- 75434, औरंगाबाद शहरामध्ये पण खैरे बद्दल नाराजी आहे म्हणून तिथे हि भाजप चे मतदार हर्षवर्धन कडे वळतील (159653).

*हर्षवर्धन जाधव एकूण अपेक्षित मतदान (स्वतःच हक्कच + वैजापूर, गंगापूर, कन्नड भाजप + औरंगाबाद भाजप)= 62542 + 75434 + 159653= 297629*


🔴 *आता येऊ या काँग्रेस राष्ट्रवादी च्या सुभाष झाम्बड कडे*.

2014 चे विधानसभा election हे मोदी लाटेत झाले होते आणि सोबतच औरंगाबाद शहरामध्ये MIM चा प्रवेश झाला होता म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी साठी हि निवडणूक खूप वाईट गेली होती. पण यावरून एक निष्कर्ष निघतो कि 2014 ला जे मतदान पडले असेल ते काँग्रेस राष्ट्रवादी च निष्ठावंत मतदान आहे आणि ते कुठल्याही परिस्थिती मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच राहणार आहे.

*काँग्रेस राष्ट्रवादी औरंगाबाद (पूर्व, पश्चिम, मध्य) + गंगापूर + वैजापूर + कन्नड = 291603*

🔴 *आता येउयात सगळ्यात जास्त विवादास्पद पक्षाच्या उमेदवाराकडे*.

AIMIM इम्तियाझ जलील - इम्तियाझ जलील, अब्दुल कादरी हे AIMIM चे दोन उमेदवार औरंगाबाद मध्य आणि पूर्व मधून उभे होते आणि गंगाधर गाढे हे औरंगाबाद पश्चिम मधून जो कि राखीव मतदार संघ होता त्यातून उभे होते. आपण असे गृहीत धरूया कि गंगाधर गाढे (35348), त्यानंतर औरंगाबाद मध्य मधून बसप च्या तिकिटावर लढलेले संजय जगताप (11048) आणि समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढलेले अफसर खान (2319) हे सर्व मतदान लोकसभा निवडणुकीला इम्तियाझ जलील यांना पडेल तरी पण इम्तियाझ जलील ला 1 लाख 80 हजार च मतदान पडेल.

आता तुम्ही म्हणाल कि हे तर फक्त शहरी मतदान झालं. ग्रामीण भागाचे काय? ग्रामीण भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे आणि जो पण आहे तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या मध्ये विभागला गेला आहे. तुम्ही म्हणाल मुस्लिम समाज धर्म बघून मतदान करतो. हे पूर्ण पणे चूक पण नाहीये आणि पूर्ण पणे खरे पण नाही. कारण तुम्ही जर वैजापूर शहराचे उदाहरण घेतले तर तेथील मुस्लिम समाज हा 1995 पासून शिवसेनेला मतदान करत आलाय आणि तेथील सगळ्यात मोठा मुस्लिम नेता हा मागच्या निवडणुकीत शिवसेनेचा नगर अध्यक्ष निवडणुकीचा उमेदवार होता आणि आज ही वैजापूर मध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत आणि त्यातही जास्तीसजास्त हे मुस्लिम आहेत. ग्रामीण भागातील मुस्लिम किंवा दलित हे जात पाहून नवे तर जो आपल्याला काम येतो ते पाहून मतदान करतो. आणि मुस्लिमच नाही सर्वच समाज तसे मतदान करतो म्हणून ग्रामीण भागातील राजकारण हे जास्त प्रगल्भ आणि उत्साहाचं असत. AIMIM ला खूप तर 20% मतदान हे ग्रामीण भागातून होईल. *म्हणजे AIMIM ने किती ही प्रचार केला तरी ते 2 लाख ते 2 लाख 20  हजार मतदानाच्या पुढे जात नाही.*

🔴 *खरी लढत हि खैरे, जाम्बड़, आणि हर्षवर्धन यामध्ये च होणार आहे.*

कितीही मतविभाजन होऊ द्या *जिंकण्यासाठी ३ लाख ५० मतदान हवे असणार आहे आणि ते AIMIM कडे नाहीये.*

जर फक्त मुस्लिम आणि दलित मतदारावर औरंगाबाद लोकसभा जिंकता आली असती तर 2009 ला च खैरे पडले असते. 2009 ला तर शांतिगिरी महाराज मुळे खूप मत विभाजन झाले होते आणि काँग्रेस चा उमेदवार पण पाटील होता. मुस्लिम दलित पाटील मतावर तर आरामात काँग्रेस जिंकून यायला पाहिजे होती.

AIMIM ची फक्त भीती निर्माण केली जातेय आणि मुस्लिम दलित नवयुवक पण social media वरील चुकिच्या आकडेवारी मुळे उड्या मारतोय कि AIMIM चे seat येणार. एकतर कोणीही एकूण मतदाराची अधिकृत आकडेवारी पडताळून पाहत नाहीये आणि जुन्या औरंगाबाद च्या अर्धशिक्षित मुस्लिम लोकांना वाटतेय आपले seat निघतय. कोणी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही करत नाहीये आणि एक दोघे करत आहेत तर ते त्यांना पण वेड्यात काढत आहे. एकतर मुळातच शिक्षण कमी त्यातही राजकीय शिक्षण तर आजिबातच नाही आणि मला नाही वाटत त्यांनी कधी नागरिकशास्र च पुस्तक हि नीट वाचाल असेल.

🔴 *आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला मत द्यावे.*

खैरे तर मुळीच नको. 1988 पासून ते निवडूनच येत आहेत. आता नवीन माणूस पाहिजे.

*आता उरतात 2 च पर्याय- झाम्बड़ का हर्षवर्धन?*

मी कोणा एकाच नाव नाही सुचवणार फक्त एवढेच म्हणेल झाम्बड़ (काँग्रेस आघाडी) ला 2  लाख 91  हजार आणि हर्षवर्धन ला 2  लाख 97  हजार च्या पुढेच मतदान पडणार आहे.

आता तुम्ही त्यांचे चरित्र बघा, सार्वजनिक जीवनातील वावर बघा, त्यांनी आता पर्यंत आमदार म्हणून काय विकासाचे काम केले ते बघा. भावनिक होऊ नका. निवडून आल्यावर औरंगाबाद साठी काय करतील ते बघा.

बाहेर पडून थोडासा अंदाज घ्या कोण निवडून येऊ शकतो ते. *कृपया करून कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारू नका. प्रत्येक कार्यकर्ता हेच सांगतो कि आपले साहेबच येणार आहे. म्हणून त्यांचा सल्ला गृहीत धरू नका*.

आपले जे पाहुणे, मित्र, ओळखीचे निपक्ष लोक आहेत त्यांना विचारा आणि शेवटी स्वतःचा निर्णय घ्या. शेवटी एवढेच सांगेल *भावनिक होऊ नका.* 30 वर्षांपासून भावनिक होऊ रस्त्यावर दररोज किलोभर धूळ खातोय आपण, पाठीचे मणके ढिले झालेत. आपल्या. जवळ धरण असूनही पिण्यासाठी पाणी नाहीये आणि *Videocon बंद पडली आहे फक्त Bajaj वर MIDC टिकून आहे ती पण गेली तर मुंबई मधील लालबाग परळ सारखे आपल्यावर चोऱ्या माऱ्या करायची वेळ येईल. आणि काहीही केले तरी AIMIM चा जलील येत नाही त्याची भीती बाळगणे सोडा.*

Monday, April 15, 2019

जज लोया खुन प्रकरणात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मुख्यमंत्री?

 नाव, सतीश उकेंनी समोर आणलं “ते” निकालपत्र..








मुंबई: सोहराबुद्दीन खून प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या जज लोया यांच्याकडे ते जिवंत असताना एक तयार निकालपत्र पोहचवण्यात आल्याची चर्चा अधूनमधून होत असते, सोहराबुद्दीन खून खटल्यात अमित शहांना निर्दोष सोडावं म्हणून एक तयार निकालपत्र जज लोया यांच्यापर्यंत पोहचवण्यात आलं होतं अशी चर्चा सुरू होती. आज ते निकालपत्र समोर आलेलं आहे. हे निकालपत्र त्यांच्यापर्यंत पोहचल्यावर जज लोया अत्यंत चिंताग्रस्त होते व त्यानी आपल्या मित्रांशी या मुद्द्यावर चर्चाही केली होती. वकील सतीश उके यांनी मुंबई हायकोर्टात ही कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
हे निकालपत्र मी लोया प्रकरणाची तपासणी करणाऱ्या तपासयंत्रणेलाच देईल अशी भूमिका ऍड. उके यांनी घेतली आहे.
ऑक्टोबर 2014 रोजी आपल्यात आणि जज लोयांमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण झाले होते, ऍडव्होकेट खांडेलकर आणि जज ठोंबरे यांच्यासोबत अजून एक अज्ञात व्यक्ती तिथे होते, या अज्ञाताला मी ओळखत नसलो तरी ठोंबरे व खांडेलकर ओळखत होते, पण ते दोघेही संशयास्पदरित्या मृत्यू पावले आहेत, या कॉल मध्ये जज लोयांनी आपल्यावर दबाव कोण आणतं आहे याच्याबद्दल खुलासा केला, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं, शिवाय ज्यांच्याकडे लाच म्हणून घ्यायची रक्कम पोहोचणार होती त्या सुभांशु जोशी यांचंही नाव जज लोयांनी घेतलं, मी अमित शहांना निर्दोष सोडावं म्हणून माझ्याकडे एक (रेडिमेड) तयार निकालपत्र पोहचवण्यात आलं असल्याचं ते बोलले, मी ठोंबरे आणि खांडेलकर यांच्यामार्फत तुमच्याकडे हे निकालपत्र पोहचवतो असंही त्यांनी (जज लोया यांनी) उकेंना (याचिकाकर्ते) सांगितलं होतं.
पुढे उकेंनी असं म्हटलं आहे की हे निकालपत्र एक पुरावा म्हणून घेऊन आपण विधीज्ञ प्रशांत भूषण यांना भेटावं असा निर्णय करण्यात आला. प्रशांत भूषण यांच्याशी व्यक्तिगत ओळख नसल्याने त्यांना भेटायला वेळ लागला, भूषण यांनी हा पुरावा पुरेसा नाही असं सांगितल्याने आम्ही सर्वांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र जज लोया यांच्या मृत्यूनंतर आपल्याला “ज्याची भीती होती तेच झालं” असं खांडेलकर म्हणाले, (1 डिसेंम्बर 2014 रोजी, नागपूरच्या रवी भवन येथे जज लोयांची हत्या झाली होती) वकील खांडेलकर यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं खांडेलकरांनी याचिकाकर्ते उके यांना सांगितलं होतं. ज्यात त्यांनी एडव्होकेट श्रीमती केतकी जोशी/जयश्री उत्तमणी यांचं नाव घेतलं होतं.
या निकालपत्राची एक प्रत आपल्याजवळ असून एक प्रत खांडेलकरांजवळ होती असं सतीश उके यांनी म्हटलं आहे. खांडेलकरांच्या ऑफिस स्टाफ जवळ या प्रकरणाशी संबंधित फाईल्स असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही सतीश उकेंनी केली आहे, माझ्यावर पाळत ठेवली जाते. खांडेलकर, लोया व ठोंबरे या तिघांनी ज्यांची नावे घेतली त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, ही सर्व लोकं सत्तारूढ पक्षाशी संबंधित आहेत, माझ्यावर खोटे खटले दाखल केले असून मला फसवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
माझ्यावर जे हल्ले झालेत त्यातून ईश्वरीकृपेने मी जिवंत राहिलो आहे, कोर्टातील खटल्यात जर मी या निकालपत्राचा उल्लेख केला तर नियमानुसार मला एक प्रत प्रतिपक्षाला द्यावी लागेल, त्यातूनही माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, मात्र भविष्यात जर जज लोया प्रकरणाची चौकशी कुठली तपासयंत्रणा करणार असेल आणि तेव्हा मी जिवंत असेल तर मी नक्कीच हे निकालपत्र त्यांना देईल असं उकेंनी म्हटलं आहे.
काय आहे या निकालपत्रात
सोहराबुद्दीन खटल्यात अमित शहांना निर्दोष मुक्त करावे म्हणून जज लोयांवर दबाव बनवण्यात येत होता, मात्र या प्रकरणाची चार्जशीट 22,000 पेजेस ची असल्याने तिचा अभ्यास करायला वेळ लागेल असं जज लोयांनी सांगितलं होतं, म्हणून त्यांना हे रेडिमेड निकालपत्र तयार करून पाठवण्यात आलं होतं, महेंद्रसिंग धोनीच्या भारतातील स्वागताच्या दिवशीच हे निकालपत्र वापरून निर्णय द्यावा असं त्यांना सुचवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी याला नकार दिला होता, नंतर त्यांची हत्या झाली, विशेष म्हणजे अमित शहांना निर्दोष सिद्ध करणारा निर्णय लोयांच्या मृत्यूनंतर आलेल्या जजने बरोबर त्याच दिवशी म्हणजे 30 डिसेंम्बर 2014 रोजी दिला होता.

Sunday, April 14, 2019

*तुमच्यात उर्जा, प्रेरणा, धाडस, आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्ये....*

*१)* "शिका...!
संघटीत व्हा...!
संघर्ष करा....!"
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२)* "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*३)* "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*४)* "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*५)* "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."
      *-डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*६)* "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*७)* "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."
        *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*८)* "जेथे एकता~
तेथेच सुरक्षितता"
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*९)* "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१०)* "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*११)* "आत्मोद्धार हा दुसर्‍याच्या कृपेने होत नसतो,
तो ज्याचा त्याने करायचा असतो..."
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१२)* "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही.
आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१३)* " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१४)* "सेवा जवळून, आदर दुरून, व ज्ञान आतून असावे..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१५)* "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१६)* "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात,
ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात,
देणगी म्हणून ते लाभत नसतात..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१७)* "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्‍या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्‍या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१८)* "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१९)* "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*२०)* "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२१)* "माणसाने खावे जगण्या साठी,
पण जगावे समाजासाठी...."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*२२)* "दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*२३)* "पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रांसारखे असावेत..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२४)* नाचुन मोठे होऊ नका तर,
वाचून मोठे व्हा.......!!
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२५)* माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा.....-
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२६)* जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर.एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या...भाकर तुम्हाला जगविल..तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल...
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२७)* "जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार होता है"!
   *— डॉ. बाबासाहेब आंबेडकर*


भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...