Monday, April 15, 2019

जज लोया खुन प्रकरणात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मुख्यमंत्री?

 नाव, सतीश उकेंनी समोर आणलं “ते” निकालपत्र..








मुंबई: सोहराबुद्दीन खून प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या जज लोया यांच्याकडे ते जिवंत असताना एक तयार निकालपत्र पोहचवण्यात आल्याची चर्चा अधूनमधून होत असते, सोहराबुद्दीन खून खटल्यात अमित शहांना निर्दोष सोडावं म्हणून एक तयार निकालपत्र जज लोया यांच्यापर्यंत पोहचवण्यात आलं होतं अशी चर्चा सुरू होती. आज ते निकालपत्र समोर आलेलं आहे. हे निकालपत्र त्यांच्यापर्यंत पोहचल्यावर जज लोया अत्यंत चिंताग्रस्त होते व त्यानी आपल्या मित्रांशी या मुद्द्यावर चर्चाही केली होती. वकील सतीश उके यांनी मुंबई हायकोर्टात ही कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
हे निकालपत्र मी लोया प्रकरणाची तपासणी करणाऱ्या तपासयंत्रणेलाच देईल अशी भूमिका ऍड. उके यांनी घेतली आहे.
ऑक्टोबर 2014 रोजी आपल्यात आणि जज लोयांमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण झाले होते, ऍडव्होकेट खांडेलकर आणि जज ठोंबरे यांच्यासोबत अजून एक अज्ञात व्यक्ती तिथे होते, या अज्ञाताला मी ओळखत नसलो तरी ठोंबरे व खांडेलकर ओळखत होते, पण ते दोघेही संशयास्पदरित्या मृत्यू पावले आहेत, या कॉल मध्ये जज लोयांनी आपल्यावर दबाव कोण आणतं आहे याच्याबद्दल खुलासा केला, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं, शिवाय ज्यांच्याकडे लाच म्हणून घ्यायची रक्कम पोहोचणार होती त्या सुभांशु जोशी यांचंही नाव जज लोयांनी घेतलं, मी अमित शहांना निर्दोष सोडावं म्हणून माझ्याकडे एक (रेडिमेड) तयार निकालपत्र पोहचवण्यात आलं असल्याचं ते बोलले, मी ठोंबरे आणि खांडेलकर यांच्यामार्फत तुमच्याकडे हे निकालपत्र पोहचवतो असंही त्यांनी (जज लोया यांनी) उकेंना (याचिकाकर्ते) सांगितलं होतं.
पुढे उकेंनी असं म्हटलं आहे की हे निकालपत्र एक पुरावा म्हणून घेऊन आपण विधीज्ञ प्रशांत भूषण यांना भेटावं असा निर्णय करण्यात आला. प्रशांत भूषण यांच्याशी व्यक्तिगत ओळख नसल्याने त्यांना भेटायला वेळ लागला, भूषण यांनी हा पुरावा पुरेसा नाही असं सांगितल्याने आम्ही सर्वांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र जज लोया यांच्या मृत्यूनंतर आपल्याला “ज्याची भीती होती तेच झालं” असं खांडेलकर म्हणाले, (1 डिसेंम्बर 2014 रोजी, नागपूरच्या रवी भवन येथे जज लोयांची हत्या झाली होती) वकील खांडेलकर यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं खांडेलकरांनी याचिकाकर्ते उके यांना सांगितलं होतं. ज्यात त्यांनी एडव्होकेट श्रीमती केतकी जोशी/जयश्री उत्तमणी यांचं नाव घेतलं होतं.
या निकालपत्राची एक प्रत आपल्याजवळ असून एक प्रत खांडेलकरांजवळ होती असं सतीश उके यांनी म्हटलं आहे. खांडेलकरांच्या ऑफिस स्टाफ जवळ या प्रकरणाशी संबंधित फाईल्स असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही सतीश उकेंनी केली आहे, माझ्यावर पाळत ठेवली जाते. खांडेलकर, लोया व ठोंबरे या तिघांनी ज्यांची नावे घेतली त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, ही सर्व लोकं सत्तारूढ पक्षाशी संबंधित आहेत, माझ्यावर खोटे खटले दाखल केले असून मला फसवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
माझ्यावर जे हल्ले झालेत त्यातून ईश्वरीकृपेने मी जिवंत राहिलो आहे, कोर्टातील खटल्यात जर मी या निकालपत्राचा उल्लेख केला तर नियमानुसार मला एक प्रत प्रतिपक्षाला द्यावी लागेल, त्यातूनही माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, मात्र भविष्यात जर जज लोया प्रकरणाची चौकशी कुठली तपासयंत्रणा करणार असेल आणि तेव्हा मी जिवंत असेल तर मी नक्कीच हे निकालपत्र त्यांना देईल असं उकेंनी म्हटलं आहे.
काय आहे या निकालपत्रात
सोहराबुद्दीन खटल्यात अमित शहांना निर्दोष मुक्त करावे म्हणून जज लोयांवर दबाव बनवण्यात येत होता, मात्र या प्रकरणाची चार्जशीट 22,000 पेजेस ची असल्याने तिचा अभ्यास करायला वेळ लागेल असं जज लोयांनी सांगितलं होतं, म्हणून त्यांना हे रेडिमेड निकालपत्र तयार करून पाठवण्यात आलं होतं, महेंद्रसिंग धोनीच्या भारतातील स्वागताच्या दिवशीच हे निकालपत्र वापरून निर्णय द्यावा असं त्यांना सुचवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी याला नकार दिला होता, नंतर त्यांची हत्या झाली, विशेष म्हणजे अमित शहांना निर्दोष सिद्ध करणारा निर्णय लोयांच्या मृत्यूनंतर आलेल्या जजने बरोबर त्याच दिवशी म्हणजे 30 डिसेंम्बर 2014 रोजी दिला होता.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...