Friday, April 19, 2019

*खैरेला त्रस्थ, MIM बद्दल भीती आणि संशय, पण झाम्बड़ का हर्षवर्धन यात संभ्रम असणाऱ्या मतदारानं साठी खालील आकडेवारी उपयुक्त ठरेल*

2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघात काय होईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काय झाले हे अधिकृत आकडेवारीतून समजून घेणे आवश्यक आहे.
हि आकडेवारी Election Commission of India च्या खालील अधिकृत Website वरून घेतलेली आहे.

https://eci.gov.in/files/file/3726-maharashtra-2014/

तुम्हीही ही pdf file download करून स्वतः खात्री करू शकता.
pdf file download करून औरंगाबाद लोकसभा मतदार संघात येणाऱ्या खालील विधानसभा मतदार संघाचे निकाल खाली दिलेल्या page no. वर बघू शकता.

कन्नड विधानसभा page no. 402
औरंगाबाद मध्य विधानसभा page no. 403
औरंगाबाद पश्चिम विधानसभा page no. 404
औरंगाबाद पूर्व विधानसभा page no. 405
गंगापूर विधानसभा page no. 407
वैजापूर विधानसभा page no. 408

*आता आपण एक एक विधानसभा क्षेत्रात काय काय निकाल आले आणि त्याचा आताच्या निवडणुकीशी काय संबंध आहे ते बघू.*

2014 च्या विधानसभा निवडणुकी वेळेस औरंगाबाद (मध्य, पूर्व, पश्चिम), वैजापूर, गंगापूर, कन्नड सर्व मिळून एकूण मतदारांची संख्या 16 लाख 64 हजार इतकी होती जी आता 2019 च्या निवडणुकीत वाढून 18 लाखाच्या आसपास झाली आहे. आपण असे गृहीत धरू कि वाढलेले 2 लाख मतदार हे सर्व मतदार संघात एक सारखे वाढले असतील, आणि ते सर्व जाती-धर्माचे, सर्व पक्षाच्या विचारसरणीचे असतील आणि एक सारखे वाढले असतील. म्हणून त्याचा परिणाम एक सारखा असेल.

2014 च्या विधासभेला एकूण 16 लाख 64 हजार मतदारांपैकी 11 लाख 18 हजार लोकांनी मतदानाचा हक्क बजावला जो कि टक्केवारी मध्ये 67.22% इतका होतो.

*आता आपण मतदार संघानुसार कुठल्या पक्षाला किती मतदान मिळाले आणि नंतर सर्वांची बेरीज करून आकडेवारी नुसार लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतदान होऊ शकते हे बघू*.

  *107. औरंगाबाद मध्य (107 - Aurangabad Central)*

एकूण मतदार संख्या 286978
प्रत्येक्षात झालेलं मतदान 188469 
मतदान टक्केवारी 65.67%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

इम्तियाझ जलील AIMIM 61843
प्रदीप जैस्वाल शिवसेना 41861
किशनचंद तनवाणी भाजप 40770
विनोद पाटील राष्ट्रवादी 11842
संजय जगताप बसपा 11048
M.  M. शेख काँग्रेस 9093

*108. औरंगाबाद पश्चिम (राखीव) (108 - Aurangabad West (SC))*

एकूण मतदार संख्या 287750
प्रत्येक्षात झालेलं मतदान 185810
मतदान टक्केवारी 64 .57%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

संजय शिरसाठ शिवसेना 61282
मधुकर दामोधर सावंत भाजप 54355
गंगाधर सुखदेवराव गाडे Panthers Republican Party 35348
जितेंद्र अंकुश देहाडे काँग्रेस 14798
मिलिंद यशवंतराव दाभाडे राष्ट्रवादी 5198
दाभाडे सुगंध सीताराम बसपा 4399

*109. औरंगाबाद पूर्व (108 - Aurangabad East)*

एकूण मतदार संख्या 261887
प्रत्येक्षात झालेलं मतदान 175422
मतदान टक्केवारी 66.98%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

अतुल मोरेश्वर सावे भाजप 64528
डॉ. अब्दुल गफ्फार कादरी AIMIM 60268
दर्डा राजेंद्र काँग्रेस 21203
कला  ओझा शिवसेना 11409
कचरू सोनावणे बसपा 5364
झुबेर अमानुल्लाह मोतीवाला राष्ट्रवादी 2121

*111. गंगापूर*

एकूण मतदार संख्या 271496
प्रत्येक्षात झालेलं मतदान 184124
मतदान टक्केवारी 67.82%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

बंब  प्रशांत भाजप 55483
अंबादास  एकनाथ  दानवे शिवसेना 38205
कृष्णा साहेबराव डोणगावकर राष्ट्रवादी 33216
खोसरे शोभाबाई काँग्रेस 16826

*112. वैजापूर*

एकूण मतदार संख्या 274887
प्रत्येक्षात झालेलं मतदान 192940
मतदान टक्केवारी 70.19%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

भाऊसाहेब पाटील चिकटगावकर राष्ट्रवादी 53114
R. M. वाणी शिवसेना 48405
दिनेशभाऊ परदेशी काँग्रेस 41346
एकनाथ खंडेराव जाधव भाजप 24243

*105. कन्नड*

एकूण मतदार संख्या  281425
प्रत्येक्षात झालेलं मतदान 191781
मतदान टक्केवारी  68.15%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

जाधव हर्षवर्धन रायभान शिवसेना 62542
उदयसिंग सरदारसिंग राजपूत राष्ट्रवादी 60981
संजय गव्हाणे भाजप 28037
नामदेवराव रामराव पवार काँग्रेस 21865

*आता आपण सर्व मतदारांची पक्षानुसार बेरीज करून कुठल्या पक्षाला किती मतदान झाले ते बघू*.

🔴 शिवसेना (जैस्वाल, शिरसाठ, कला ओझा, दानवे, वाणी, हर्षवर्धन)- 263704

🔴 भाजप (तनवाणी, सावंत, सावे, बंब, जाधव, गव्हाणे)- 291578

🔴 काँग्रेस (शेख, देहाडे, दर्डा, खोसरे, परदेशी, पवार)- 125131

🔴 राष्ट्रवादी (पाटील, दाभाडे, मोतीवाला, डोणगावकर, पाटील, राजपूत)- 166472

🔴 AIMIM (जलील, कादरी)- 122111

🔴 Panthers Republican पार्टी (गंगाधर गाडे)-  35348
बसप (जगताप, दाभाडे)- 15447

*आता आपण येऊया २०१९ च्या लोकसभा निवडणुकी कडे*

 🔴 *चंद्रकांत खैरे (शिवसेना + भाजप मतांची बेरीज)- 555282*
 
कागदोपत्री शिवसेना भाजप युती आहे पण कन्नड मधून हर्षवर्धन जाधव जे कि विधानसभेला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते ते स्वतंत्र लढत आहे त्यामुळे ते मतदान (62542) ह्या वेळेस चंद्रकांत खैरे ला पडणार नाही.

चंद्रकांत खैरे (शिवसेना + भाजप - हर्षवर्धन जाधवचे स्वतःचे कन्नडचे मतदान)- 555282 - 62542 = 492740

पण गंगापूर वैजापूर कन्नड येथील भाजप चे कार्यकर्ते शिवसेनेचे काम न करता हर्षवर्धन जाधव चे काम करत आहेत म्हणून आपण गृहीत धरू या कि जे विधानसभेला भाजप चे मतदार होते (गंगापूर, वैजापूर, कन्नड भाजप = 107763) त्यातील 70% मतदार हर्षवर्धन कडे वळतील- 75434.

औरंगाबाद शहरामध्ये पण खैरे बद्दल नाराजी आहे आणि हर्षवर्धन जाधव यांनी मोदी सरकार ला पाठिंबा देणार असे घोषित केले आहे त्यामुळे तिथे ही भाजप चे मतदार हर्षवर्धन कडे वळतील. (159653)

चंद्रकांत खैरे (शिवसेना - 70 % गंगापूर, वैजापूर, कन्नड, भाजप – 100% औरंगाबाद भाजप - हर्षवर्धन जाधवचे स्वतःचे कन्नडचे मतदान) = 492740-75434-159653= 257652

*चंद्रकांत खैरे एकूण अपेक्षित मतदान- 257652*

🔴 *आता हर्षवर्धन जाधव यांचे मतदान बघूया*.

2014 च्या आमदारकीला हर्षवर्धन जाधव यांना कन्नड मधून 62542  मते मिळाली आपण असे गृहीत धरूया कि ते त्यांचे स्वतःचे हक्काचे मत आहेत आणि ते आताही मिळतील. त्यासोबत गंगापूर, वैजापूर, कन्नड भाजप च्या 107763  पैकी 70 % मतदार हर्षवर्धन कडे वळतील- 75434, औरंगाबाद शहरामध्ये पण खैरे बद्दल नाराजी आहे म्हणून तिथे हि भाजप चे मतदार हर्षवर्धन कडे वळतील (159653).

*हर्षवर्धन जाधव एकूण अपेक्षित मतदान (स्वतःच हक्कच + वैजापूर, गंगापूर, कन्नड भाजप + औरंगाबाद भाजप)= 62542 + 75434 + 159653= 297629*


🔴 *आता येऊ या काँग्रेस राष्ट्रवादी च्या सुभाष झाम्बड कडे*.

2014 चे विधानसभा election हे मोदी लाटेत झाले होते आणि सोबतच औरंगाबाद शहरामध्ये MIM चा प्रवेश झाला होता म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी साठी हि निवडणूक खूप वाईट गेली होती. पण यावरून एक निष्कर्ष निघतो कि 2014 ला जे मतदान पडले असेल ते काँग्रेस राष्ट्रवादी च निष्ठावंत मतदान आहे आणि ते कुठल्याही परिस्थिती मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच राहणार आहे.

*काँग्रेस राष्ट्रवादी औरंगाबाद (पूर्व, पश्चिम, मध्य) + गंगापूर + वैजापूर + कन्नड = 291603*

🔴 *आता येउयात सगळ्यात जास्त विवादास्पद पक्षाच्या उमेदवाराकडे*.

AIMIM इम्तियाझ जलील - इम्तियाझ जलील, अब्दुल कादरी हे AIMIM चे दोन उमेदवार औरंगाबाद मध्य आणि पूर्व मधून उभे होते आणि गंगाधर गाढे हे औरंगाबाद पश्चिम मधून जो कि राखीव मतदार संघ होता त्यातून उभे होते. आपण असे गृहीत धरूया कि गंगाधर गाढे (35348), त्यानंतर औरंगाबाद मध्य मधून बसप च्या तिकिटावर लढलेले संजय जगताप (11048) आणि समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढलेले अफसर खान (2319) हे सर्व मतदान लोकसभा निवडणुकीला इम्तियाझ जलील यांना पडेल तरी पण इम्तियाझ जलील ला 1 लाख 80 हजार च मतदान पडेल.

आता तुम्ही म्हणाल कि हे तर फक्त शहरी मतदान झालं. ग्रामीण भागाचे काय? ग्रामीण भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे आणि जो पण आहे तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या मध्ये विभागला गेला आहे. तुम्ही म्हणाल मुस्लिम समाज धर्म बघून मतदान करतो. हे पूर्ण पणे चूक पण नाहीये आणि पूर्ण पणे खरे पण नाही. कारण तुम्ही जर वैजापूर शहराचे उदाहरण घेतले तर तेथील मुस्लिम समाज हा 1995 पासून शिवसेनेला मतदान करत आलाय आणि तेथील सगळ्यात मोठा मुस्लिम नेता हा मागच्या निवडणुकीत शिवसेनेचा नगर अध्यक्ष निवडणुकीचा उमेदवार होता आणि आज ही वैजापूर मध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत आणि त्यातही जास्तीसजास्त हे मुस्लिम आहेत. ग्रामीण भागातील मुस्लिम किंवा दलित हे जात पाहून नवे तर जो आपल्याला काम येतो ते पाहून मतदान करतो. आणि मुस्लिमच नाही सर्वच समाज तसे मतदान करतो म्हणून ग्रामीण भागातील राजकारण हे जास्त प्रगल्भ आणि उत्साहाचं असत. AIMIM ला खूप तर 20% मतदान हे ग्रामीण भागातून होईल. *म्हणजे AIMIM ने किती ही प्रचार केला तरी ते 2 लाख ते 2 लाख 20  हजार मतदानाच्या पुढे जात नाही.*

🔴 *खरी लढत हि खैरे, जाम्बड़, आणि हर्षवर्धन यामध्ये च होणार आहे.*

कितीही मतविभाजन होऊ द्या *जिंकण्यासाठी ३ लाख ५० मतदान हवे असणार आहे आणि ते AIMIM कडे नाहीये.*

जर फक्त मुस्लिम आणि दलित मतदारावर औरंगाबाद लोकसभा जिंकता आली असती तर 2009 ला च खैरे पडले असते. 2009 ला तर शांतिगिरी महाराज मुळे खूप मत विभाजन झाले होते आणि काँग्रेस चा उमेदवार पण पाटील होता. मुस्लिम दलित पाटील मतावर तर आरामात काँग्रेस जिंकून यायला पाहिजे होती.

AIMIM ची फक्त भीती निर्माण केली जातेय आणि मुस्लिम दलित नवयुवक पण social media वरील चुकिच्या आकडेवारी मुळे उड्या मारतोय कि AIMIM चे seat येणार. एकतर कोणीही एकूण मतदाराची अधिकृत आकडेवारी पडताळून पाहत नाहीये आणि जुन्या औरंगाबाद च्या अर्धशिक्षित मुस्लिम लोकांना वाटतेय आपले seat निघतय. कोणी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही करत नाहीये आणि एक दोघे करत आहेत तर ते त्यांना पण वेड्यात काढत आहे. एकतर मुळातच शिक्षण कमी त्यातही राजकीय शिक्षण तर आजिबातच नाही आणि मला नाही वाटत त्यांनी कधी नागरिकशास्र च पुस्तक हि नीट वाचाल असेल.

🔴 *आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला मत द्यावे.*

खैरे तर मुळीच नको. 1988 पासून ते निवडूनच येत आहेत. आता नवीन माणूस पाहिजे.

*आता उरतात 2 च पर्याय- झाम्बड़ का हर्षवर्धन?*

मी कोणा एकाच नाव नाही सुचवणार फक्त एवढेच म्हणेल झाम्बड़ (काँग्रेस आघाडी) ला 2  लाख 91  हजार आणि हर्षवर्धन ला 2  लाख 97  हजार च्या पुढेच मतदान पडणार आहे.

आता तुम्ही त्यांचे चरित्र बघा, सार्वजनिक जीवनातील वावर बघा, त्यांनी आता पर्यंत आमदार म्हणून काय विकासाचे काम केले ते बघा. भावनिक होऊ नका. निवडून आल्यावर औरंगाबाद साठी काय करतील ते बघा.

बाहेर पडून थोडासा अंदाज घ्या कोण निवडून येऊ शकतो ते. *कृपया करून कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारू नका. प्रत्येक कार्यकर्ता हेच सांगतो कि आपले साहेबच येणार आहे. म्हणून त्यांचा सल्ला गृहीत धरू नका*.

आपले जे पाहुणे, मित्र, ओळखीचे निपक्ष लोक आहेत त्यांना विचारा आणि शेवटी स्वतःचा निर्णय घ्या. शेवटी एवढेच सांगेल *भावनिक होऊ नका.* 30 वर्षांपासून भावनिक होऊ रस्त्यावर दररोज किलोभर धूळ खातोय आपण, पाठीचे मणके ढिले झालेत. आपल्या. जवळ धरण असूनही पिण्यासाठी पाणी नाहीये आणि *Videocon बंद पडली आहे फक्त Bajaj वर MIDC टिकून आहे ती पण गेली तर मुंबई मधील लालबाग परळ सारखे आपल्यावर चोऱ्या माऱ्या करायची वेळ येईल. आणि काहीही केले तरी AIMIM चा जलील येत नाही त्याची भीती बाळगणे सोडा.*

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...