Sunday, April 14, 2019

*तो प्रवास 'सुंदर' होता...*

कविवर्य कुसुमाग्रजांची एक प्रसिद्ध कविता आहे,
' तो प्रवास सुंदर होता.
आभाळ उशाला धरती.
तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती''
  माझे शाळकरी मित्र ,पत्रकारितेतील गॉडफादर ,मार्गदर्शक 'गुरु असे बरेच काही असणाऱ्या सुंदर लटपटे यांच्याबाबत  'यांचं असं का होतं ?'  या लेखमालेत एखादा एपिसोड लिहिण्याचा प्रसंग खरेतर उदभवयाला नको होता.परंतु नाईलाजाने तो गुदरला आहे.लिहायला पाहिजे एकदा.तो आहे तो पर्यंत.तो वाचेल न वाचेल,काय रिअक्शन देईल.अदरवाईज घेईल, की मला काय म्हणायचंय ते समजून घेईल ? किंवा गैरसमज करून घेईल? रागावेल.त्याच्या जखमेवर मी मीठ चोळतोय असं त्याला वाटेल.माहित नाही.त्याला दीर्घायुष्य लाभो,पण एक चांगला शैलीदार,अभ्यासू, स्वाभिमानी, तत्वनिष्ठ, भूमीकावादी,कल्पक,खुल्या विचाराचा आणि धडाडीचा पत्रकार असूनही त्याच्या पाठीमागे त्याच्यावर कोण्या एखाद्या वृत्तपत्रात संपादकीय पानावर अग्रलेख लिहिला जाईल काय ? या बद्दल मला शंका आहे.जिथे लोक आता उगवत्या सूर्याला सुद्धा नमस्कार करायला तयार नाहीत तिथे मावळत्या सूर्याला कोण अर्ध्य देणार ? पण सुंदर काय होता,काय आहे,काय असू शकला असता,आणि अजूनही संधी मिळाली ( आणि त्याने ती त्याच्या अवयवासारख्या शरीराचा भाग बनलेल्या स्वतःबद्दलच्या अतिरेकी कल्पना आणि व्यसनाच्या प्रादुर्भावाने 'गमावली'नाही )तर तो 'काय होऊ शकतो' हे माध्यमातल्या जुन्या नव्या सर्वाना कळलं पाहिजे.केवळ सहानुभूती म्हणून नव्हे,दयाभाव उत्पन्न होण्यासाठीही नव्हे,वस्तुपाठ म्हणून,'धडा'म्हणून 'सुंदर' समजून आणि उमजून घेतला पाहिजे.त्याच्या जीवनावर एक चांगला 'बायोपिक'निघू शकतो,एकादी 'वादळी'कादंबरी निघू शकते ,एवढं त्याचं आयुष्य गुंतागुंतीच्या,थरारक आणि धक्कादायक घटना प्रसंगांनी भरलेलं आहे,पत्रकार 'कसा असावा' आणि 'कसा नसावा' असे दोन्ही 'पैलू' या अजब गजब माणसात आहेत.माणूस म्हणून मित्र म्हणून तो अत्यंत दिलदार आणि मनमोकळा आहे.उद्याची भ्रांत असली तरी आज कोणी त्याला पैसे मागितले ( आणि योगायोगाने त्याच्या खिशात किंवा जवळ असले ) तर मागचा पुढचा विचार न करता तो खिशातले सगळे पैसे समोरच्याला देऊन टाकू शकतो,त्याच्या या वृत्तीला भले कोणी 'दानत'म्हणो ; मी मात्र 'बेफिकिरी'म्हणतो.पण असा बेदरकार आहे सुंदर,त्याच्या या स्वभावाचा अनेकांनी गैरफायदा घेतला,त्याला फसवलं,गोत्यात आणलं,त्याच्या नोकऱ्या घालवल्या .तो संकटात, अडचणीत असताना त्याला कोण कोण, काय काय मदत करतात माहित नाही,पण त्याच्या जवळ गुळाची ढेप असली की मुंगळे जमतात,सुंदरच जमवतो,स्वतःला पोखरून घेतो.मुंगळेच ते. गूळ खाण्याच्या लायकीचा असे पर्यंत कुरतडत राहातात.तिथंच घाण करतात.गूळ सडत जातो.मग काय ? नवसागर टाकून भट्टीची दारू ! याला फक्त नशिबाचे भोग कसे म्हणता येईल ?

यांचं असं का होतं ?

भाग तीन : तो प्रवास 'सुंदर' होता...
       सुंदर लटपटेंनी स्वतःला थोडी शिस्त लावून घेतली असती.जरासा व्यवहारीपणा राखला असता,त्यांच्या बद्दल आस्था आत्मीयता जिव्हाळा आणि प्रेम असणाऱ्या हितचिंतकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले नसते आणि नियतीने जराशी साथ दिली असती तर सुंदर लटपटे बाबतीत 'तो प्रवास 'सुंदर' होता ' या  काव्यपंक्ती तंतोतंत खऱ्या ठरल्या असत्या.पण ते होणे नव्हते.आज घडीला सुंदर कुठे आहे,काय करतोय,कसा राहतोय , मला माहित नाही.दोन वर्षांपूर्वी औरंगाबादेतच कुठल्याश्या अपार्टमेंटमध्ये तो राहात असल्याचे कळल्यामुळे तिथं भेटायला गेलो होतो.जरासा भीत भीतच.कारण तो कसा प्रतिसाद देईल याचा अंदाज नव्हता.दैनिक लोकपत्रच्या व्यवस्थापनाने सुंदरला कार्यकारी संपादक पदावरून हटवून मला कार्यकारी संपादक केलं होतं.त्यालाही दोन वर्ष उलटून गेली होती.अर्थात त्याची नोकरी जाण्यात माझा काही रोल नव्हता.चाटे कोचिंग क्लासेसच्या पब्लिकेशन जाहिरात आणि क्रिएटिव्ह डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या मला सुंदर लटपटेनेच लोकपत्रमध्ये आणलं,आणि वर्तमानपत्र क्षेत्राचा काहीही अनुभव नसताना,जर्नालिझमची पदवी नसताना केवळ चांगला लिहू शकतो म्हणून थेट वृत्तसंपादक करून टाकलं.अर्थात सुंदरचे आणि माझे स्नेहबंध फक्त लोकपत्र पुरतेच मर्यादित नव्हते आणि नाहीत.औरंगाबादच्या 'शासकीय विद्यानिकेतन'चे आम्ही विद्यार्थी.आम्ही म्हणजे मी (रवींद्र तहकिक),सुंदर लटपटे,चाटे शिक्षण समूहाचे मछिंद्र चाटे,अर्थक्रांतीचे यमाजी मालकर,मंत्रालयाच्या माहिती आणि जनसंपर्क,तसेच 'लोकराज्य'मध्ये कार्यरत असलेले ब्रिजकिशोर झंवर,इत्यादी.एक दोन वर्ग आगे-मागे असे आम्ही तब्बल सहा वर्ष एकत्र निवासी वसतिगृहात राहिलेलो.तेही पाचवी ते दहावीच्या वयात.सुंदरचं शाळेतील नाव 'दिलीप'.मराठवाड्यातील माजलगावचे बडे राजकीय प्रस्थ आणि पुलोद सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुंदरराव सोळंके यांच्या नावावरून दिलीपच्या वडिलांनी सुंदरला 'सुंदरराव'म्हणायला सुरुवात केली आणि दिलिपचे नाव सुंदर पडले.सुंदर लटपटे ! सुंदरचे वडील प्राथमिक शिक्षक होते.आष्टी तालुक्यातील एका खेड्यागावातील कोरडवाहू अल्पभूधारक  कुटुंबातून आलेला सुंदर वि वि चिपळूणकरांसारख्या प्रेमळ शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञाच्या नवोन्मेषी दृष्टीत वाढला.दहावी नंतर त्याने कला शाखा निवडली.पदवीचे शिक्षण घेता घेता दैनिक मराठवाड्यात चिकटला.समाजवादी आणि युक्रांद चळवळीशी जोडला गेला.समाजवादी आणि युक्रांदवाल्यानी औरंगाबादेत काय सामाजिक परिवर्तन घडवून आणलं माहिती नाही,पण या चळवळीतल्या बहुतेकांनी प्रेमविवाह केले.तेही आंतरजातीय.बहुतेक प्रकरणात तरुण बहुजन आणि कन्या ब्राम्हण असाच जोड असायचा,अर्थात यालाही अपवाद होताच,पण सुंदरच्या बाबतीत कॉमन तेच घडलं.त्याची पत्नी 'वृन्दा' ; ब्राम्हण.आणि हा वंजारी.लग्न झालं तेव्हा सुंदर फार फार तर २२ वर्षांचा असावा.वृन्दा माझ्यामते अल्पवयीनच असावी.हे लग्न उन्हाळे कुटुंबाला मान्य नव्हतं.विशेषतः संजीव उन्हाळे यांना.स्वतः संजीव उन्हाळेंनी प्रेम विवाह केलेला.तोही आंतरजातीय.विशेष म्हणजे बहूजनातल्याच मुलीशी.असे असताना आपल्या बहिणीने एका बहुजनांच्या मुलाशी विवाह करणे संजीव उन्हाळेंसह संपूर्ण उन्हाळे कुटुंबाच्या पचनी पडले नाही,टोकाचा विरोध झाला.तरी वृन्दा-सुंदर विवाह झाला.उन्हाळेंनी सुंदरला कधीच आपला मानला नाही,वृन्दाशीही नातं तोडलं.त्या काळात मित्रांनी सुंदरला खूप मदत केली.मछिंद्र चाटे,सखाराम पानझडे,आता औरंगाबाद मध्य चे शिवसेना आमदार असणारे संजय सिरसाठ, असे आणखीही काही हातभार होते.सुंदरने काही काळ अक्षरशः रिक्षा चालवून संसाराचा गाडा ओढला.परिस्थिती बिकट होती,नंतर काही काळ लोकमत मध्ये आणि १९९५ च्या पहिल्या टप्प्यात लोकपत्रमध्ये उपसंपादक म्हणून काम करताना सुंदरला जेमतेम १५०० रुपये पगार होता. त्याकाळी सुंदर चारमिनार सिगारेट ओढायचा.जगणे बेधुंद तेव्हाही होतेच.सुदैवाने पत्नी वृन्दा हिला बँकेत नोकरी लागली होती.पगारही चांगला होता.त्यामुळे बरे दिवस होते.परंतु 'कोळी'जसा स्वतः भोवती जाळं विणत जातो आणि त्यात अखेर स्वतःच अडकतो तशा सुंदरच्या चाली नेहमीच त्याच्या अंगलट येतात.उदाहरणार्थ : 
सुंदरने दैनिक मराठवाडा सोडण्याचं कारण त्याचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज हे होतं.( असे हे पुरोगामी ,समाजवादी !) लोकमत सोडण्याचं कारण सुंदरचा अंगभूत दुराग्रही आणि नको त्या प्रसंगी नको तितका अणकुचीदार होणारा अवाजवी स्वाभिमान हे होतं.( खुद्द 'दर्डा'ला 'दरडावून' बोलल्यावर आणि 'केला'ची 'सालटी' काढल्यावर दुसरं काय होणार ?)   सुंदर  जवळ जेव्हा हाताला काम आणि खिशात पैसा असतो तेव्हा तर तो जग्गजेता सम्राट असतोच.पण जेव्हा त्याच्यावर उधार उसनवारी करण्याची वेळ येते तेव्हाही त्याच्या नजरेतला वागण्यातला बोलण्यातला कैफ उतरत नाही.१९९७ ते २००७ या दहा वर्षाच्या काळात 'एकलव्य स्वाध्यायमाला', 'साप्ताहिक महाराष्ट्र' आणि' एकलव्य लर्निग पॉईंट' या उद्योगसंस्थांच्या रूपात सुंदरने न भूतो न भविष्यती एवढे वैभव पहिले,उपभोगले.अक्षरशः कोरोडोची उलाढाल.याच काळात त्याने वृन्दाला बॅंकेतली नोकरी सोडायला लावली.दोघे मिळून व्यवसाय बघू लागले.औरंगाबादेत स्वतःची भव्य पाच माजली इमारत.बंगला.छापखाना,चार पाच फोरव्हीलर,मुंबईत  दादर सारख्या मोक्याच्या ठिकाणी मोठं कार्पोरेट ऑफिस.राज्यभर दीड दोन हजार कर्मचारी आणि डीलर एजन्सीधारक. व्यवसायासाठी २०-२५ ओमिनी गाड्या.असं सगळं जमून आलं होतं.मेहनती पेक्षाही नशिबाने.सुंदरचं 'दैव'त्याच्यावर मेहरबान झालं होतं.पण म्हणतात ना दैव देते आणि कर्म नेते.तसंच झालं.अचानक आणि एकदम मिळालेलं अवाढव्य यश सुंदरला पचवता आलं नाही बहुतेक.पहिली काही वर्षे सोडली तर सुंदर रेंगाळत गेला.अवाजवी आणि अवास्तव इगो त्याला जात्याच होताच,अचानक आलेल्या श्रीमंतीने त्याला फाटे ( खरे तर काटे ) फुटत गेले.त्यात त्याची व्यसने ; ड्रिंक्स,स्मोकिंग,हॉटेलिंग वगैरे.त्याला धरबंध राहिला नाही. राजाचे  तारतम्य आणि ताळतंत्र सुटल्यावर साम्राज्य गडगडायला वेळ लागत नाही.सुंदरचं तर भान देखील सुटलं होतं.म्हणजे त्याने दारू कितीही पिली असती,चेन स्मोकिंग केलं असतं ( करतच होता : करतच असतो म्हणा ) जगभर विमानाने फिरला असता,कायम पंचतारांकित हॉटेलात राहिला असता,वाटेल ती ऐश केली असती तरी काही बिघडलं नसतं.तेवढा पैसा कमवतच होताच  तो.किंबहुना त्याच्या शौक-ऐय्याशीसाठी खर्च होणाऱ्या पैशापेक्षा कितीतरी पटीने अधिक.त्याच्या अपयशाचं त्याने स्वतः काही आत्मपरीक्षण किंवा विश्लेषण केलेय  की नाही माहित नाही,बहुदा नसावे.असले तरी ते तटस्थ नसेल.सुंदरला कोणी त्याच्याकडे बोट दाखवलेलं अजिबात सहन होत नाही,तिथं स्वतःचं बोट कसं खपणार ? परंतु
व्यवसायाच्या ऐन भरभराटीच्या वृन्दाची कर्मचाऱ्यांशी वाढत गेलेली आरोगन्सी आणि सुंदरचे व्यवसायाच्या व्यवस्थान तसेच  आर्थिक उलाढालीकडे झालेले पूर्णतः दुर्लक्ष.या मुळे अत्यंत नेटक्या आखीव रेखीव संरचनेचा अक्षरशः मोहोंजदाडो-हडप्पा झाला.सावरणं शक्यच नव्हतं.आभाळ फाटल्यावर ठिगळ कसं जोडणार,आणि कुठं कुठं.धरण फुटल्यावर काहीही करता येत नसतं,काय काय आणि कुठं कुठं बुजवणार.भगदाडं अनेक,एक बुजवायला जावं तर दुसरं पडलंच समजा.यात सुंदर एकटा पडला.काही त्याने स्वतः दुरावून घेतले होते,काही त्याची अवस्था पाहून पळाले.अक्षरशः वाताहत झाली.सगळं वाहून गेलं .कोणातरी नात्यातल्या पोरावर डोळे झाकून टाकलेला विश्वास नडला ,हे सगळं इतकं अंगलट आलं की कर्ज आणि देणी फेडता फेडता सुंदर अक्षरशः कफल्लक झाला.रस्त्यावर आला.बंगला,ऑफिस,गाड्या,फर्निचर,छापखाना, सगळ्या वस्तू ,साहित्य सगळं अक्षरशः भंगाराच्या भावात फुंकावं लागलं.डायबेटिसचा आजार जडला,पेरिलीसीसचा झटका आला .त्या नंतर सुंदर सात वर्ष  भूमिगत होता.या काळात पुन्हा चाटे ,पानझडे,या मित्रांनी,गोपीनाथ मुडेंनी त्याला आर्थिक मदत केली.काही काळ विश्वनाथ कराड यांच्या एमआयटी संस्थेतही सुंदरने काम केलं,पण करोडोच्या नोटात खेळलेला सुंदर आता मानसिक दृष्ट्या खचला होता,शारीरिक दृष्ट्या कोसळला होता.नावाप्रमाणेच लटपटला होता.लटपटला नव्हता तो त्याचा दुराग्रह ! गाठीच्या खोडासारखा त्याचा इगो  कधीच कोणत्याच प्रसंगात भावनिक किंवा हतबल होत नाही.अनेकांसाठी स्ट्रॉंग पॉईंट असणारा व्यक्तिमत्वाचा हा पैलू सुंदरसाठी मात्र कायम पदोपदी आणि वेळोवेळी घातक ठरला आहे ,
----------------------
मध्यंतर
---------------------

--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र
माझी संपादक सुंदर लटपटे यांची आत्महत्या


पत्रकारितेत आपले नाव गाजवुण महाराष्ट्रात वेगळाच ठसा यांनी निर्माण केला होता.
औरंगाबाद:येथील ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी आज सकाळी त्यांच्या पुंडलिकनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सुंदर लटपटे यांच्या आत्महत्येमुळे मराठवाड्यात माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘लोकपत्र’, ‘पुण्यनगरी’, ‘पुढारी’ आदी वृत्तपत्रात संपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते. पत्रकारितेत सक्रिय राहून त्यांनी ‘एकलव्य प्रकाशन’ची सुरूवात केली होती. शिवाय प्रकाशन संस्थेचा राज्यभर विस्तार केला होता. परंतु या व्यवसायात नंतर तोटा झाल्यामुळे गेल्या काही वर्षापासून ते आर्थिक विंवचनेत होते. त्यातूनच त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. यात त्यांनी त्यांच्या मेव्हण्यास आपल्या मृत्यूस जबाबदार ठरवले आहे. लटपटे आणि त्यांच्या पत्नीत वाद सुरू होता. त्यातून त्या माहेरी गेल्या होत्या. या प्रकरणी पोलीस तर्फे तपास सुरू आहे.

सुसाईड नोट-



      युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,औरंगाबाद.




Saturday, April 13, 2019

लोकसभेला आमच्या सोबत नसले तरी विधानसभेला ‘राज’सोबत चर्चा होणार : पवार
'मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते,असे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांची पवार यांनी स्तुती केली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले.
बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शब्दाला किंमत होती, पण आज ज्यांच्याकडे पक्षाचा कारभार आहे, ते दर १५ दिवसांनी हवामान बदलेल, त्यानुसार धोरण बदलतात असा जोरदार टोला पवारांनी उद्धव ठाकरे यांनी मारला.
भाजपने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली, लोकांनी संधी दिली, पण पाच वर्षांत त्याचे सोने करता आले नाही, त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातही जनता सत्ता बदल करण्याच्या मानसिकतेत आहे, राज्यात तर आघाडीचीच हवा आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार चार वेळा राज्याच्या दौऱ्यावर यावे लागत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला.
*उध्दव ठाकरे व ओमराजे निंबाळकर यांचे नाव चिठ्ठीत लिहून शेतकऱ्याची आत्महत्या*

उस्मानाबाद : उस्मानाबाद मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिलीप ढवळे 59 वर्षांचे होते. शेतातल्या झाडाला गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये ढवळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे.दिलीप ढवळे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे पत्र सापडले आहे. ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या दोघांनी जी फसवणूक केली त्याचमुळे आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देवूनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.दिलीप ढवळे यांच्यासारखेच फसवणुकीला बळी पडलेले श्रीमंत तांबोरे हे शेतकरीही मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. मात्र भेट होऊ शकली नाही, उद्धव ठाकरेंची भेट झाली असती तर काहीतरी मार्ग निघाला असता आणि ढवळेंनी जे पाऊल उचललं ते त्यांनी उचललं नसतं अशी खंत तांबोरे यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर उद्या आमच्यावरही अशीच वेळ येणार आहे जमीन विकून कर्ज फेडण्याची वेळ येणार आहे. अन्यथा आमच्यासमोरही आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असे तांबोरे यांनी म्हटले आहे.दरम्यान कसबे तडवळे येथील शेतकर्‍याने फसवणुकीतून आत्महत्या केली असल्याची माहिती प्राप्त होताच कर्मचार्‍यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. त्यांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांच्या समक्ष ताब्यात घेतल्या आहेत. कुटुंबीयांचा जबाब नोंदवून प्रकरणाची खातरजमा केली जाईल. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांनी सांगितले.

Tuesday, April 9, 2019

वालुज येथे कचऱ्याचा वापर करून बायोगॅस निर्मिती करण्यात आले यासाठी बि.एस.खोसरे,उद्योजक यांनी विशेष मेहेनत घेतली आणि असे माॅङेल देशात राबविण्यात यावे असे आवाहन केले.

Monday, April 8, 2019

पाण्याच्या टँकरखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार
दौलताबाद टी पॉईंट चौकातील अपघात


औरंगाबाद- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टँकरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास दौलताबाद टी पाईंटजवळ झाला. सुजीत विलास सातदिवे (२0, रा. कार्तिकनगर, शरणापुर फाटा) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थावरून फरार झाला असून, पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहे.

खुलताबादेतील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा देण्यासाठी सुजीत सकाळी दुचाकीने (एमएच-२0-डीआर-१२५0) गेला होता. दुपारी एकच्या सुमारास परीक्षा संपल्यानंतर तो शरणापुरच्या दिशेने येत होता. दौलताबाद टी पॉईंटवरील चौकाकडे येताना त्याच्या दुचाकीसमोर ट्रक होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रत्यनात समोरुन येणा-या पाण्याच्या टँकरच्या (एमएच-१२-क्युए-९८७३) पाठीमागील चाकाखाली सुजीत सापडला. या भीषण अपघातात सुजीतच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यावर दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक संजय मांटे, ज्ञानेश्वर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात घडताच टँकर चालकाने धुम ठोकली. यानंतर सुजीतचा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेला. तसेच दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निरीक्षक सराफ यांनी सांगितले. एक ते दिड वर्षांपुर्वीच सातदिवे कुटुंब शरणापुर फाटा येथील कार्तिकनगरात राहायला आले आहे. सुजीतचे वडिल एसटी महामंडळात चालक आहेत. सुजीतच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. 
UPSC GAUIDENCE BY ADITYA MIRKHELKAR:-

All India rank-155(AIR)
My strategy
1. Learn the syllabus by heart
2. Read all the previous year question papers ( Pre and Mains)
3. Basics of Polity, Economy, Geography and History needs to be strong ( for that NCERT books needs to be read frequently )
3. Prepare atleast 2 page note on each topic mentioned in the syllabus.
4. Select the optional based on these criteria
a. Area of Interest ( personal choice)
b. Scoring pattern ( Right now scoring subjects are political science, Anthropology, Maths, engineering subjects )
c. Overlap with General studies papers ( Political science, History, Geography)
d. Guidance Available
5. Current affairs needs to be thoroughly prepared ( newspapers - The Hindu, Rajya Sabha Tv big picture program )
6. Proper Revision is must ( I prefer revision after a day and after a week)
7. For prelims Good Amount of MCQs needs to be solved (vision IAS test series or insights test series)
8. For mains writing practice ( Download toppers copy from ForumIAS website or VisionIAS website) and follow their approach
9. Consistency is the key you are competing with others
10. There is no shortcut to Success, work hard.
11. There is always scope for improvement ( Now I am targeting single digit rank )
12. I will send the booklist in other message


Aditya:
Prelims booklist
1. Geography 6th to 12th NCERT
2. Modern History Rajiv Ahir
3. Ancient History NCERT (old or new)
4. Art and culture Singhania book
5. Economics 11th macroeconomics NCERT and year long current affairs from vision IAS PT 365
6. Polity - M Laxmikant
7. Environment - Shankar IAS book
8. International organisations from Wikipedia




For Mains in addition to Prelims booklist
1. Any good material for society, world history and world physical geography
2. Vajiram printed notes for governance issues
3. GS 3 paper -
a. Agriculture issues through Yojana and newspaper articles of Ashok Gulati
b. For security related issues - Vajiram printed notes
c. For Government schemes related questions read Yojana magzine regularly.
4. For Ethics Lexicon publication book is sufficient but we need to develop personal examples, important quotes related to topics mentioned in GS paper 4 syllabus and need to think like an officer



General Tips
1. Take interest in studies or whatever you are doing
2. Time management is the key ( Follow Brian Tracy channel on youtube and learn to manage time effectively)
3. Nobody can avoid failures, setbacks and negativity - for that take some break, make new friends, follow your hobby, do some physical exercise and talk about your mental state with others
4. Practice Practice and Practice
5. Your priorities, habbits and time management needs to be inlined with your goals.

For more details do connect with us will update you.


Link to listen interview
https://youtu.be/yUv3qRziZuw
Collectorआदित्यची विशेष मुलाखत
शेअर,कमेन्ट्स,सब्सक्राइब
🎤✒Yuva Samna Media

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...