पाण्याच्या टँकरखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार
दौलताबाद टी पॉईंट चौकातील अपघात
औरंगाबाद- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टँकरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास दौलताबाद टी पाईंटजवळ झाला. सुजीत विलास सातदिवे (२0, रा. कार्तिकनगर, शरणापुर फाटा) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थावरून फरार झाला असून, पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहे.
खुलताबादेतील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा देण्यासाठी सुजीत सकाळी दुचाकीने (एमएच-२0-डीआर-१२५0) गेला होता. दुपारी एकच्या सुमारास परीक्षा संपल्यानंतर तो शरणापुरच्या दिशेने येत होता. दौलताबाद टी पॉईंटवरील चौकाकडे येताना त्याच्या दुचाकीसमोर ट्रक होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रत्यनात समोरुन येणा-या पाण्याच्या टँकरच्या (एमएच-१२-क्युए-९८७३) पाठीमागील चाकाखाली सुजीत सापडला. या भीषण अपघातात सुजीतच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यावर दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक संजय मांटे, ज्ञानेश्वर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात घडताच टँकर चालकाने धुम ठोकली. यानंतर सुजीतचा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेला. तसेच दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निरीक्षक सराफ यांनी सांगितले. एक ते दिड वर्षांपुर्वीच सातदिवे कुटुंब शरणापुर फाटा येथील कार्तिकनगरात राहायला आले आहे. सुजीतचे वडिल एसटी महामंडळात चालक आहेत. सुजीतच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.