Friday, March 1, 2019

आता आठ दिवसात कचरा प्रश्न सोडवून दाखवा सभापती वैद्य यांचे आयुक्तांना आव्हान

१३ मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना केलेली तक्रार वास्तववादी

औरंगाबाद/प्रतिनिधी :  मनपा स्थायी समिती सभापती रेणूकदास वैद्य यांनी आयुक्त निपुण विनायक यांनी आजपर्यंत एकही प्रकल्प, प्रश्न मार्गी लावला नसून मनमानी कारभार चालवला आहे यासह १३ मुद्द्यावरून  पत्र लिहून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. हे पत्र आयुक्त विनायकांना जिव्हारी लागले आणि त्यांनी शुक्रवारी पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत सर्व आरोप फेटाळून लावत उलट लोकप्रतिनिधीच्या कार्यावर संताप व्यक्त केला होता. लोकप्रतिनिधींनी साथ दिली तर आठ दिवसात कचरा प्रश्न सोडवतो असे छातीठोकपणे सांगितले. हाच धागा पकडून शनिवारी (दि.१ मार्च) परत सभापती वैद्य यांनी आयुक्तांना पत्र लिहून आठ महिन्यापासून सोबत आहोत पुढे ही सोबतच राहू, आठ दिवसात कचरा प्रश्न सोडवा तसेच समांतर किती दिवसात सोडवणार हे ही सांगा असे आव्हान दिले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सभापती वैद्य आणि आयुक्त यांच्यात कार्यपद्धतीवरून पत्र युद्ध रंगले आहे. सभापती वैद्य यांनी १३ मुद्द्यावरून आयुक्तांची कोंडी करत अकार्यक्षम असल्याचा तसेच नियमबाह्य व मनमानी कारभारामुळे मनपाचे नुकसान होत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्रांकडे केली होती. याचा आयुक्तांनी खुलासा करावा अशी मागणी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केली होती. यावेळी आयुक्तांनी अतिशय रुद्र रूप धारण करत १३ मुद्दे खोदून काढले होते. ९ महिन्यात केलेल्या कामाचा पाढाच वाचला होता. अधिकार आहेत त्याचा वापर करत असल्याचे सांगत सभागृह आणि लोकप्रतिनिधीच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळेच मराठवाडा मागास राहिला असल्याचे वादग्रस्त विधान आयुक्तांनी केले होते. औरंगाबादेत काम करायला कोणी तयार होत नाही तरी मी इथे आलो. कचरा प्रश्नावरून मला आरोपी करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले होते. यावेळी नगरसेवकांनी त्यांना प्रामाणिक असल्याचे सांगत पाठराखण केली.

दरम्यान, शनिवारी सभापती वैद्य यांनी परत आयुक्त निपुण यांना पत्र लिहले आहे. यात नमूद केल्याप्रमाणे, १३ मुद्द्यावरून दिलेले पत्र हे वास्तववादी आहे. यामुळे वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने वास्तव मांडले. सभागृहात केलेल्या निवेदनात मी पत्र दिल्याने मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले.  आयुक्तांना ताकत द्या असे सभागृहात काही नगरसेवक म्हणाले. मी तर कायम आपल्या सोबत होतो. ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना तुम्ही म्हणल्यामुळे स्थायीत सदस्यांचा विरोध असताना त्यांनी समजूत घालून प्रस्ताव मंजूर केले.विना निविदा तीन एजन्सीला जनजागरणाचे काम देणे असेल, पूढे त्यांनी काय काम केले हे सर्वश्रुत आहेच. स्थायी समितीने यांना पुन्हा मुदतवाढ देऊ नये असा सर्वानुमते निर्णय केल्यानंतर देखील अजुनही एक संस्था काम करत आहे. यासह आयुक्तांनी केलेल्या निवेदनाच्या सभापती वैद्य यांनी पत्रात चांगलाच समाचार घेतला आहे. यामुळे आता हा वाद अजून वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


कचरा कोंडी
कचरा कोंडी दरम्यान सकाळी सहा वाजे पासून लोकात जाऊन त्यांची समजूत काढली तेव्हा आम्ही आपल्या सोबतच होतोत. वादग्रस्त व्यक्तीला तज्ञ म्हणून आपणच नेमले. नेहमी आपल्या योजनांना पाठींबा दिला.
मशिन खरेदी करण्यासाठी पदाधिकारी सांगत होते असे आपले मत आहे. याबाबत कच-यावरील प्रक्रिया करण्यासाठी डी.पी.आर. तयार करण्यासाठी इंदौर येथील कंपनी आपणच निवडली आता त्यांनी कसा चुकीचा डी.पी.आर. तयार केला, याची जाणीव आपणांस होत असेलच पण त्यांनी डी.पी.आर. केला आम्ही नाही.
त्यामध्ये ज्या मशिन घ्यायला सांगितले त्या लवकर बसवून कचरामुक्ती व्हावी यासाठी पदाधिकारी पाठपुरावा करीत होते व आहेत त्यात चुकीचे काय असे असून आपण अद्यापपर्यंत त्या बसवल्या नाहीतच
त्यामुळे पदाधिका-यांना चूकीचे ठरविणे योग्य नाही. आपणांस मशिन नाही पाहीजे तर घेऊ नका पण कचरा प्रश्न सोडवा हाच आमचा आग्रह आहे व राहील.

स्मार्ट शहर बस
बसेस बाबतीत आपण बस खरेदी केली. याबाबतीत लोकप्रतिनिधींनी टाटालाच काम कसे मिळेल, यासाठीच निविदा प्रक्रियेत काही अटी टाकल्याबद्दल आक्षेप घेतले होते. त्याला दुर्लक्ष करून आपण सांगितले म्हणुन आम्ही आपला निर्णय बरोबर आहे, म्हणुन आपल्या सोबतच राहीलोत याबाबतीत साधा बसथांबा याची तयारी नसतांना हा निर्णय घेतला अद्याप ही बस थांबणार कुठे कधी येणार
भविष्यात ही सेवा अखंड चालू राहण्याचे नियोजन नाही, ते आपण करावे, हे सुचविणे चुकीचे आहे का?

भरती प्रक्रिया चुकीची
पंचवीस वर्षानी भरती केली, त्यामध्ये साधे योग्य आसन व्यवस्था नव्हती, हे कालच स्थायी समितीच्या
सदस्यांनी सांगितले, हे आक्षेप आयुक्तांना सांगा हे सांगणे चुकीचे आहे का? कचरा प्रश्न सगळे सोबत असतील, तर आठ दिवसात सोडवू असे आपण सांगितले. मागील आठ
महिन्यापासून सर्व आपल्या सोबतच होते, पूढेही राहु. आठ दिवसात आपण हा प्रश्न सोडवावा, त्या क्षणाची प्रतिक्षा आहे.

कंपनीने कामाचा मोबदला घेतला ना
कचरा प्रश्न सोडविण्यासाठी आपण एजन्सीला हात जोडून शहरात आणले. असे सांगितले, आमच्या
माहितीप्रमाणे निविदा प्रक्रीयेमध्ये या संस्था काम करण्यासाठी आल्या असून, त्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. हात जोडण्याचा काय संबंध. हे अनाकलणीय आहे. कचरा प्रक्रिया चिकलठाणा सोडून कोठेच होत नाही. त्यामुळे नगरसेवक चार नारेगाव तयार होत आहेत, हे म्हणाले तर गैर काय वास्तविकता आहे, ती स्विकारावीच लागेल व पुढे काम करावे लागेल.

मनपात कोणी येत नाही म्हणणे चुकीचे
मनपात आपण येण्याचे अगोदरही अनेक अधिकारी कार्यरत होते व चांगले काम करून दाखवुन गेले, त्यामुळे येथे कोणी येत नाही, म्हणुन शहराची बदनामी करू नये.
समांतरसाठी न्यायालयात वेळ जात असून, याबाबतीत कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतला गेला नाही, ही
वास्तविकता आहे. त्यामुळे याबाबतीत नेमका कधी हा प्रश्न सुटेल, हे आपण जसे, कचरा आठ दिवसात संपवणार तसे सांगावे. आम्ही आपले आभारी राहु.

अधिकार आहेत तर प्रश्न सोडवा
आयुक्त म्हणुन निर्णय घेण्याचा अधिकार आपला आहे, असे आपण सांगितले. आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न पत्राद्वारे केला, आपल्याला अधिकार आहे, त्याचा नियमानुसार वापर करून समस्या सोडवा हेच आमचे म्हणणे आहे. अधिकाराचा वापर करून शहरातील समस्या त्वरीत सोडवा, आम्ही आपणांस अनेकवेळा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली, शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी आम्ही प्रशासनाच्या बरोबरीने काम केले. वर्षभर झाले तरी प्रश्न जिथल्यातिथेच आहे. अनेक नगरसेवक त्यांच्या भागातील समस्या वारंवार मांडतात, वर्षानुवर्षे त्या सुटत नाही, हि वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला निदर्शनास आणले, त्यात गैर काय. शहरातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी घटनेत दिलेल्या अधिकाराचा लोकप्रतिनिधी म्हणून वापर करत राहणार यात चूकीचे काही नाही, आपणही हे समजून घ्यावे. अधिकारी या नात्याने समस्या सोडविण्यावरच भर द्यावा, शहराचा खेळखंडोबा होतांना उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही, म्हणुन हा पत्रप्रपंच आपण याकडे आरोप म्हणुन न पाहता, सूचना म्हणुन पाहावे व सकारात्मक कार्यवाही करावी.

Monday, February 25, 2019

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची आत्महत्या की मरङर?


राजकीय क्षेत्रात एकच खळबळ

औरंंगाबाद/प्रतिनिधी  : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान चेअरमन तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा दयाराम पाटील (वय ७८, रा.पार्वती निवासी, प्लॉट नंबर २५, समर्थनगर) यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.२५) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्या करण्यापुर्वी सुरेशदादा पाटील यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यात सदाशिव गायके व त्याच्या साथीदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसान, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असलेले सुरेशदादा पाटील सोमवारी सकाळी न्यायालयीन कामकाजानिमित्त जिल्हा न्यायालयात गेले होते. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास कालच्या प्रवासाने मला थकवा आला असल्याचे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष जयराम साळुंके यांना सांगितले. तसेच मी घरी जावून थोडावेळ आराम करतो असे सांगून ते न्यायालयातून थेट आपल्या घरी गेले होते. घरी आल्यावर सुरेशदादा पाटील याने जेवन करून आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. दुपारी बराचवेळ झाला तरी ते आपल्या खोलीतून बाहेर न आल्याने त्यांची पत्नी शवुंâतला पाटील व इतर सदस्यांनी आवाज दिला तरी त्यांचा आतून काहीच प्रतिसाद न आल्याने, नातेवाईकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी सुरेशदादा पाटील हे पलंगावर बेशुध्दावस्थेत पडून असल्याचे दिसून आले.


दरम्यान, सुरेशदादा पाटील यांना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पाटील यांनी घाटीत दाखल करण्याचे सांगितले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुरेशदादा पाटील यांना घाटीत दाखल केले असता, घाटीतील डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. सुरेशदादा पाटील यांच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रंगनाथ काळे, माजी उपाध्यक्ष जयराम साळुंखे, माजीमंत्री राजेंद्र दर्डा, कदीर मौलाना, माजी नगरसेवक समीर राजूरकर, अभिजीत देशमुख, विनोद पाटील, बंडू ओक यांच्यासह राजकीय क्षेत्रातील पाटील यांच्या निकटवर्तीयांनी घाटी रूग्णालयासह समर्थनगरातील त्यांच्या बंगल्यावर धाव घेतली.

सुरेशदादा पाटील यांच्या पश्चात पत्नी शकुंतला सुरेश पाटील (वय ७०), मुलगी संगीता पाटील, मुलगा माजी आमदार नितीन पाटील, सचिन पाटील, जावाई डॉ. विनोद शिसोदे असा परिवार आहे. सचिन पाटील हे पुण्याला व्यवसायानिमित्त स्थायीक झाले असल्याचे सुरेशदादा पाटील यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

सुरेश पाटील यांच्याविरूध्द गायकेंची तक्रार

सुरेशदादा पाटील हे बेशुध्दावस्थेत त्यांच्या खोलीत मिळून आले. त्यांच्याजवळच एक बाटली आणि सुसाईड नोट मिळून आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुसाईड नोटमध्ये सदाशिव गायके व त्याच्या साथीदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी (दि.२५) सकाळी सुरेश पाटील यांनी माझ्या डोक्याला बंदुक लावून अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार सदाशिव गायके यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात दिली.


जिल्हा बँकेवर ३० वर्ष एकहाती सत्ता

सुरेशदादा पाटील यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले होते. ३० वर्ष त्यांनी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनपद भुषविले होते. १९८८-८९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्या निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांनी त्यांचा पराभव केला होता. पराभव जिव्हारी न लावून घेता त्यांनी राजकारणात आणि सामाजिक जीवनात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला होता.


नागद येथे आज अंत्यसंस्कार

सुरेशदादा पाटील यांच्या कन्नड तालुक्यातील नागद या गावी मंगळवारी (दि.२६) दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पुर्वी सकाळी ९ वाजता त्यांचा पार्थिवदेह दर्शनासाठी समर्थनगर येथील बंगल्यावर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
16 साल की उम्र में भारतीय सेना के लिए विध्वंसकारी स्फोटक खोजकर destroy करने के लिए मानवविरहित ड्रोन विकसित तथा सेना को समर्पित !!

Juber  ने कर दी पाकिस्तान की हवा टाइट! टेलेंट किसी डिग्री का मोहताज नही होता, सरकार ने हर्षवर्धन से 5 करोड़ रुपये का समझौता किया है। juber  ने ऐसा ड्रोन बनाया जो लेंड माईन को या बम को डिफ्यूज कर देता है। आज देश विदेश ने juber को करोड़ों रुपये ऑफर कर दिये, पर इस छोटे साइंटिस्ट ने अपने देश की सेवा में अपना योगदान दिया। इस छोटे इंजीनियर को हमारा सलाम। और बहुत बहुत बधाई हो।
#JaiHind 🇮🇳🇮🇳
Share this post 🇮🇳

खासदार खैरेंच्या नाङी-पुङी जपवक्तव्यावरचा क्रांती चौकात तीव्र निषेध-राजीव जावळीकर-मनसे,औरंगाबाद.

खासदार खैरेंच्या नाङी-पुङी जपवक्तव्यावरचा क्रांती चौकात तीव्र निषेध-राजीव जावळीकर-मनसे,औरंगाबाद.

खासदार खैरेंच्या नाङी-पुङी जपवक्तव्यावरचा क्रांती चौकात तीव्र निषेध-राजीव जावळीकर-मनसे,औरंगाबाद.



#खासदार #खैरेंच्या #नाङी-#पुङी #जप#वक्तव्यावरचा #क्रांती #चौकात #तीव्र #निषेध-#राजीव #जावळीकर-#मनसे,#औरंगाबाद

Saturday, February 16, 2019

मुम्बई में अतंकवादी पाकिस्तान के खिलाफ जबर दस्त मोर्चा मुस्लिम समाज के लोगों ने निकाला।

दोन्ही शहिद सैनिक यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11 या दरम्यान विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर येईल.एक पार्थिव हेलिकॉप्टर द्वारे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तर दुसरे पार्थिव रस्तामार्गे लोणार येथे जाईल .


पुलावमा येथे झालेल्या हल्ल्यात जवान शहीद झालेत. त्यापैकी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी घेऊन जाण्यात येत असून औरंगाबाद, चिखलठाणा विमानतळावर अंत्यदर्शन घेण्यासाठी आज शहरातील देशभक्त त्यांच्या अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना नेते खासदार चंद्रकांतजी खैरे यांनी  सीआरपीएफच्या शहिद नितीन शिवाजी राठोड (चोरपांगरा, गोवर्धन नगर, लोणार. जि. बुलढाणा) आणि शहिद संजय (दीक्षित) राजपुत (मलकापूर जि. बुलढाणा) यांना विमानतळावर श्रद्धांजली वाहिली. व त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील दोन्ही जवानांच्या मुळ गावी त्यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे.
Special report By:-Mushtak baig
सविस्तर माहिती अशी की
काश्मीरमधल्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नितीन शिवाजी राठोड, संजय भिकमशिंह राजपूत या दोन जवानांचे पार्थिव स्पेशल विमानाने औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीतर्फे त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. दोन्ही जवानांचे पार्थिव विमानाने सकाळी औरंगाबादेत आणण्यात आले. यावेळी अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला व शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. याठिकाणी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त दीपाली घाटगे, महापौर नंदकुमार घोडले, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, किशनचंद तनवाणी, राजकुमार (आयपीएस आयजीपी सीआरपीएफ ), संजीव कुमार कमांडन्ट सीआरपीएफ, कॅप्टन पियुष सिन्हा जहाज वाहतूक मंत्रालय, यांच्यासह नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण वाहून सलामी देण्यात आली.
अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे, भारत माता कि जय, वंदे मातरम घोषणांनी विमानतळ परिसर दणाणला तर पाकिस्तान विरोधात आक्रोश व्यक्त करत पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.
पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दशहतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला. जवानांची बस त्या उभ्या असलेल्या गाडीजवळ येताच त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात चोर पांघरा (गोवर्धन नगर), ता. लोणार, जि. बुलढाणा येथील नितीन शिवाजी राठोड, मलकापूर जि. बुलढाणा येथील संजय भिकमशिंह राजपूत यांच्यासह चाळीसपेक्षा अधिक जवान शहीद झाले.
Plz Share it, comments, Subscribe-
 Yuva Samna Media.
*Medimart Generic Medical Store Aurangabad Division *
*औरंगाबाद विभाग*
*आैरंगाबाद , जालना , नगर , बीड , लातूर , परभनी, उसमानाबाद*

*व्यवसायाची सुवर्ण संधी*
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇

*जेनेरिक औषध विक्री क्षेत्रामध्ये स्वतंत्र व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी*

*जेनेरिक वैद्यकीय स्टोअर सुरू करा.*

*1) इतर कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत लाखो रुपये नफा, तुलनेत अत्यंत कमी गुंतवणूक.*
*2) अतिशय चांगला आणि प्रतिष्ठित व्यवसाय*
*3) देशाच्या गरजू व गरीब लोकांप्रति सामाजिक जाणिव जपण्याची संधी.*
*4) उत्तम मानसिक समाधान.*
*5) अधिक ग्राहक अधिक नफा*
*6) ग्राहकाने आपल्या दुकानात औषध खरेदी केल्यानंतर ते आजीवन ग्राहक असतील*
*7) जीवनभर कमाई करण्याच्या संधीचा एक आजीवन व्यवसाय.*
*8)जगात सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय*
*9)कोणालाही व्यवसाय करता यावा यासाठी लागणारे सर्व साहाय्य कंपनी मार्फत उपलब्ध*
इतकी दिवस वाया घातली आता एक दिवस कामा साठी वाया घाला

माहितीसाठी संपर्क:
*Medimart Generick (I)Pvt Ltd.*
*Siddhant Khade - 9096205204*

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...