जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची आत्महत्या की मरङर?
राजकीय क्षेत्रात एकच खळबळ
औरंंगाबाद/प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान चेअरमन तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा दयाराम पाटील (वय ७८, रा.पार्वती निवासी, प्लॉट नंबर २५, समर्थनगर) यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.२५) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्या करण्यापुर्वी सुरेशदादा पाटील यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यात सदाशिव गायके व त्याच्या साथीदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसान, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असलेले सुरेशदादा पाटील सोमवारी सकाळी न्यायालयीन कामकाजानिमित्त जिल्हा न्यायालयात गेले होते. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास कालच्या प्रवासाने मला थकवा आला असल्याचे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष जयराम साळुंके यांना सांगितले. तसेच मी घरी जावून थोडावेळ आराम करतो असे सांगून ते न्यायालयातून थेट आपल्या घरी गेले होते. घरी आल्यावर सुरेशदादा पाटील याने जेवन करून आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. दुपारी बराचवेळ झाला तरी ते आपल्या खोलीतून बाहेर न आल्याने त्यांची पत्नी शवुंâतला पाटील व इतर सदस्यांनी आवाज दिला तरी त्यांचा आतून काहीच प्रतिसाद न आल्याने, नातेवाईकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी सुरेशदादा पाटील हे पलंगावर बेशुध्दावस्थेत पडून असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सुरेशदादा पाटील यांना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पाटील यांनी घाटीत दाखल करण्याचे सांगितले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुरेशदादा पाटील यांना घाटीत दाखल केले असता, घाटीतील डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. सुरेशदादा पाटील यांच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रंगनाथ काळे, माजी उपाध्यक्ष जयराम साळुंखे, माजीमंत्री राजेंद्र दर्डा, कदीर मौलाना, माजी नगरसेवक समीर राजूरकर, अभिजीत देशमुख, विनोद पाटील, बंडू ओक यांच्यासह राजकीय क्षेत्रातील पाटील यांच्या निकटवर्तीयांनी घाटी रूग्णालयासह समर्थनगरातील त्यांच्या बंगल्यावर धाव घेतली.
सुरेशदादा पाटील यांच्या पश्चात पत्नी शकुंतला सुरेश पाटील (वय ७०), मुलगी संगीता पाटील, मुलगा माजी आमदार नितीन पाटील, सचिन पाटील, जावाई डॉ. विनोद शिसोदे असा परिवार आहे. सचिन पाटील हे पुण्याला व्यवसायानिमित्त स्थायीक झाले असल्याचे सुरेशदादा पाटील यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
सुरेश पाटील यांच्याविरूध्द गायकेंची तक्रार
सुरेशदादा पाटील हे बेशुध्दावस्थेत त्यांच्या खोलीत मिळून आले. त्यांच्याजवळच एक बाटली आणि सुसाईड नोट मिळून आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुसाईड नोटमध्ये सदाशिव गायके व त्याच्या साथीदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी (दि.२५) सकाळी सुरेश पाटील यांनी माझ्या डोक्याला बंदुक लावून अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार सदाशिव गायके यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात दिली.
जिल्हा बँकेवर ३० वर्ष एकहाती सत्ता
सुरेशदादा पाटील यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले होते. ३० वर्ष त्यांनी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनपद भुषविले होते. १९८८-८९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्या निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांनी त्यांचा पराभव केला होता. पराभव जिव्हारी न लावून घेता त्यांनी राजकारणात आणि सामाजिक जीवनात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला होता.
नागद येथे आज अंत्यसंस्कार
सुरेशदादा पाटील यांच्या कन्नड तालुक्यातील नागद या गावी मंगळवारी (दि.२६) दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पुर्वी सकाळी ९ वाजता त्यांचा पार्थिवदेह दर्शनासाठी समर्थनगर येथील बंगल्यावर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.