Saturday, February 16, 2019

दोन्ही शहिद सैनिक यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11 या दरम्यान विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर येईल.एक पार्थिव हेलिकॉप्टर द्वारे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तर दुसरे पार्थिव रस्तामार्गे लोणार येथे जाईल .


पुलावमा येथे झालेल्या हल्ल्यात जवान शहीद झालेत. त्यापैकी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी घेऊन जाण्यात येत असून औरंगाबाद, चिखलठाणा विमानतळावर अंत्यदर्शन घेण्यासाठी आज शहरातील देशभक्त त्यांच्या अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना नेते खासदार चंद्रकांतजी खैरे यांनी  सीआरपीएफच्या शहिद नितीन शिवाजी राठोड (चोरपांगरा, गोवर्धन नगर, लोणार. जि. बुलढाणा) आणि शहिद संजय (दीक्षित) राजपुत (मलकापूर जि. बुलढाणा) यांना विमानतळावर श्रद्धांजली वाहिली. व त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील दोन्ही जवानांच्या मुळ गावी त्यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे.
Special report By:-Mushtak baig
सविस्तर माहिती अशी की
काश्मीरमधल्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नितीन शिवाजी राठोड, संजय भिकमशिंह राजपूत या दोन जवानांचे पार्थिव स्पेशल विमानाने औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीतर्फे त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. दोन्ही जवानांचे पार्थिव विमानाने सकाळी औरंगाबादेत आणण्यात आले. यावेळी अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला व शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. याठिकाणी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त दीपाली घाटगे, महापौर नंदकुमार घोडले, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, किशनचंद तनवाणी, राजकुमार (आयपीएस आयजीपी सीआरपीएफ ), संजीव कुमार कमांडन्ट सीआरपीएफ, कॅप्टन पियुष सिन्हा जहाज वाहतूक मंत्रालय, यांच्यासह नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण वाहून सलामी देण्यात आली.
अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे, भारत माता कि जय, वंदे मातरम घोषणांनी विमानतळ परिसर दणाणला तर पाकिस्तान विरोधात आक्रोश व्यक्त करत पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.
पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दशहतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला. जवानांची बस त्या उभ्या असलेल्या गाडीजवळ येताच त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात चोर पांघरा (गोवर्धन नगर), ता. लोणार, जि. बुलढाणा येथील नितीन शिवाजी राठोड, मलकापूर जि. बुलढाणा येथील संजय भिकमशिंह राजपूत यांच्यासह चाळीसपेक्षा अधिक जवान शहीद झाले.
Plz Share it, comments, Subscribe-
 Yuva Samna Media.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...