जामगाव येथे 10 दिवसांत दुसरी आत्महत्या
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील 23 वर्षीय युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या 10दिवसातील हि दुसरी आत्महत्या आहे गेल्या 10दिवसापूर्वी देविदास राजसाहेब माने या 19वर्षीय युवकाने आत्महत्या केली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामगाव येथील रहिवाशी दिपक शिवाजी मगर वय 23 वर्षे याने 9 फेब्रुवारी रोजी शनिवारी पहाटे चार साडेचार वाजेदरम्यान राहत्या घराच्या बाजूला असलेल्या छपरामध्ये बल्लीला दोरी बांधून फाशी घेतली त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्याचे शव विच्छेदन करण्यात आले .तो पंचगंगा सिड कंपनी मधुन काम करुन पहाटे घरी आल्यावर त्याने फाशी घेतली दिपक मगरच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नाही याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हे. काँ संजय मानकर करत आहे. दुपारी जामगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे