Sunday, February 10, 2019

वाट चुकलेला 'बापू' 


 बापू सोळंके माझ्या तालुक्यातल्या मातीतला. कोलते पिंपळगावचा रहिवाशी. बापू हा लोकमतचा क्राईम रिपोर्टर. पर्यटन पंढरी असलेल्या औरंगाबाद सारख्या शहरात हल्ली गुन्हे वार्तांकन करणे सोपे राहिलेले नाही. गुन्हे वार्तांकन करणारा पत्रकार म्हणजे तो पोलिसांनाही वरचढ असावा लागतो. गुन्ह्यांची बातमी मिळवण्यासाठी अनेक हातखंडे, डावपेचही वापरावे लागतात. काही वेळा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाराजी ओढून  घ्यावी लागते. मात्र, याला बापू सोळंके हा अपवाद आहे. अत्यंत निरागस आणि निश्चल पाण्यासारखा हा बापू. त्याला आडपेच, खाचखळगे, धूर्तपणा आणि पितपत्रकारीत  अजिबात जमत नाही. त्याचा वेगळा हातखंडा म्हणजे तो झुंडवाल्या पत्रकारितेला महत्त्वदेत नाही.
 त्याचं वागणं, राहणं एखाद्या शाळेतल्या शिस्तप्रिय शिक्षका सारखं.  त्याच्या बाबतीतला एक किस्सा येथे नमूद करावासा वाटतो कठोर शिस्तीतला अधिकारी अमितेश कुमार पोलीस आयुक्त असताना एका बातमीवर ते तत्कालीन dcp  संदीप आटोळे यांच्याशी लोकमत मध्ये छापून आलेल्या एक बातमी बातमीवर चर्चा करत होते. ती बातमी बापूची बायलाईन होती. त्या बातमीच्या कात्रणावर टिप्पणी नोंदवल्यानंतर अमितेश कुमार यांनी बापू सोळंकी ची बातमी आहे ही बातमी शंभर टक्के खरी असेल असे सांगून चौकशीचे आदेश दिले होते. हा प्रकार माझ्या समक्ष आणि एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकारांसमोर घडला होता. त्यामुळे बापुची प्रमाणिकता किती आहे हे मला कळून चुकले होते. त्यानंतर अनेक वेळा बापूची परीक्षा म्हणून मी काही प्रकरणात त्याला पडताळून पाहिले. खरंच गुन्हे वार्तांकन सारख्या क्षेत्रात बापू सारखे अहिंसावादी आणि प्रामाणिक पत्रकार आहे. याच्यावर विश्वास बसत नाही. तसे औरंगाबाद शहरातील गुन्हे वार्तांकन करणारे बहुतांश पत्रकार हे कोणाची भीडभाड ठेवत नाहीत. हे देखील नमूद करावेसे वाटते. याचा अनुभव अनेक वेळा मला अनुभवता आला आहे; त्याचा मी साक्षीदार आहे.
उर तेव्हा भरून येतो, जेव्हा आपल्या मातीतला माणूस मराठवाड्याच्या राजधानीवर आपल्या अस्तित्वाचा आणि प्रमाणिकपणाचा  शिक्का उमटवतो. कधी कधी तर बापू हा गुन्हेवार्तांकन क्षेत्राकडे चुकुन आला की काय असाच प्रश्न मला पडतो.एवढा साधा आणि प्रामाणिक असलेला हा बापू माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे.
बापू खुप मोठा हो... उदंड आयुष्य जग...
मित्रा तुला वाढदिवसाच्या काळीजभरून शुभेच्छा !💐💐💐🎂🎂🎂
            -जाहेद शाह

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...