पुण्यात विकले जात आहेत हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ
एफडीएकडून पुण्यातील मॉडर्न डेअरी आणि साताऱ्यातील संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्टवर कारवाई
पुण्यात हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ विकले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ चांगल्या गुणवत्तेचे असल्याचे लेबल लावून चढया भावाने विक्री करणा-या कँपमधील प्रसिध्द मॉर्डन डेअरीतील खोटेपणा उघड केल्यानंतर आता तासवडे येथून संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट वर धाड टाकून अशाच प्रकारचं १० लाखांचं पनीर जप्त केलं आहे.
हे मिल्क प्रोडक्टस जेथे उत्पादित केले जात होते. तेथे अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) ने पुण्यातील मॉडर्न डेअरीवर कारवाई करत १ लाख २३ हजार ६९१ रूपये किेंमतीचे डेअरीतील हलक्या प्रतीचे दही, मलाई पनीर व क्रीम असे ५६१ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर हे दुग्धजन्य पदार्थ सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीमध्ये असलेल्या संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. येथे उत्पादित केले जात असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर एफडीच्या पथकाने येथे छापा टाकला. यावेळी हलक्या दर्जाचे मलाई पनीरचा १०२४.२ किलो किमंत रूपये २ लाख ४ हजार ८४० व हलक्या प्रतीची किमचा ४६८२.२ किलो किमंत रूपये ७,४९,१७२ चा साठा जप्त केला. मलई पनीच्या २४० ग्रॅमच्या पॅकेटवर मॉडर्न डेअरी, कॅम्प पुणे असे छापले होते.
प्रत्यक्षात या पनीरचे उत्पादन कर्नाटक राज्यातील महालीगपुर येथे केले जाते. परंतु हे पनीर संतोष मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. तासवडे एमआयडीसी येथे उत्पादीत झाल्याचे भासवून पुढे विक्री केले जात होते. दुध व दुग्धजन्य पदार्थ ज्या ठिकाणी उत्पादीत केले जात होते. त्या ठिकाणी भरपुर प्रमाणात अस्वच्छता व जिवंत किटकांचा वावर आढळून आला. या डेअरीत आलेल्या अन्नपदार्थ पॅक करण्याच्या लेबलवर दुध व दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटीग मॉडर्न डेअरी कॅम्प पुणे यांनी केल्याचे आढळलेले आहे. प्रत्यक्षात मे. संतोष मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. तासवडे उत्पादीत केलेल्या दुध व दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटींग करण्याकरीता मॉडर्न डेअरी पुणे यांना परवाना नसल्याचे आढळले आहे.
दरम्यान पुण्यातील कॅंप परिसरात असलेल्या मॉडर्न डेअरीकडून डेअरी मापात पाप करून व उच्च प्रतीचा माल असल्याचे सांगून ग्राहकांकडून बक्कळ पैसा उकळल्याचं उजागर झालं आहे. त्यामुळे ग्राहकांनी चाणाक्षपणे दुग्धजन्य उत्पादनांची खरेदी करावी आणि संशय आल्यास त्याची तक्रार एफडीएकडे करावी असे आवाहन एफडीएचे सह आयुक्त (अन्न विभाग) सुरेश देशमुख यांनी केले आहे.
ही कारवाई एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त (अन्न) संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, अनिल पवार, युवराज ढेबरे व राहुल खंडागळे यांच्या पथकाने केली.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.