Thursday, March 21, 2019

चिकलठाणा पोलिसांची अवैध धंद्याविरूध्द जोरदार कारवाई

६४ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त

औरंंगाबाद/प्रतिनिधी : अवैध धंद्याविरूध्द चिकलठाणा पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (दि.१९) रात्री पोलिसांनी विशेष मोहिम राबवून जुगार आणि दारू अड्यावर कारवाई करीत ६४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिसांनी अवैध होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिम राबविली. मौजे पळशी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या गोपाळ शांतीलाल जयस्वाल याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २२ हजार ४०८ रूपये किंमतीच्या देशी दारूच्या ४०८ बाटल्या जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.  तसेच चिकलठाणा पोलिसांनी मौजे गोपाळपूर येथे जुगार खेळणाऱ्या ८ जुगाऱ्यांना पत्यावर पैसे लावून जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले. जुगाऱ्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून २७ हजार ९५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान चिकलठाणा पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह जुगाऱ्यांवर कारवाई करीत ६४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंद्याविरूध्द चिकलठाणा पोलिसांनी सुरू केलेली कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...