Thursday, March 21, 2019

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १०० कोटींचा दंड

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

लता मंगेशकर मेडीकल फाउंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कमीत कमी दरात वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या जमीन कराराचे उल्लंघन करत रुग्णांकडून बेकायदा वसूल केलेले १०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धर्मादाय रुग्णालय आहे. तरीही रुग्णालय रुग्णांकडून बेकायदा मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे एड. रमेश धर्मावत यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी नवलकिशोऱ राम यांनी नोटीस काढली आहे.
लता मंगेशकर फाऊंडेशनला केवळ १ रुपये किंमतीने शासनाने एरंडवणा येथे ९९ एकर जमीन लीजवर दिली होती. यावेळी काही अटी शर्ती होत्या. या जमीनीवर उभ्या राहणाऱ्या रुग्णालयात वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकिय फी व भाडे निश्चित केले होते. त्यानुसार कमीत कमी दरात वैद्यकिय सुविधा दिल्या जातील असा करार करण्यात आला होता. या करारानुसार २० रुपयात वैद्यकिय तपासणी करण्यात येईल असे म्हटले होते. परंतु वास्तवात तपासणीसाठी ६०० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे ही सरकारची फसवणूक आहे. अशी तक्रार करण्यात आली होती.
त्यानंतर या सह काही अटींचा भंग रुग्णालय आणि फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे. अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फाऊंडेशनच्या नावे नोटीस काढली आहे. त्यात रुग्णांकडून बेकायदेशीरपणे वसूल केलेले १०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...