तुम्हाला गुलाम व्हायचंय की ताठ मानेनं जगायचंय?
-प्रतीक पुरी
मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजप शासनाला विरोध असण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मोदी सत्तेत आल्यापासून भाजपनं गुलामीची एक नवी मूल्यव्यवस्था जाणीवपूर्वक रुजवायला सुरूवात केली आहे. ही गुलामी वरकरणी श्रमप्रतिष्ठेच्या आवरणात गुंडाळलेली आहे पण आंतून तिचं हीडीस स्वरूप स्पष्टपणे दिसून येतं. संघाची वर्णवर्चस्ववादी वृत्ती व जातीयतेचं अस्तर त्याला लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं या गुलामीचं प्रसरण होत आहे ती पाहता यापुढील काळात कोणीही तोंड वर करून काही विचारू नये, जिथे आहात तिथेच समाधान मानून घ्यावं आणि भाजपला त्यांची सत्ता निर्विवाद उपभोगू द्यावी हा यामागचा विचार आहे. याला जे विरोध करतील त्यांना सरसकट देशविरोधी, देशद्रोही घोषित करून त्याच्यावर हल्ले चढवायचे ही यांतली रणनिति आहे. गेल्या पांच वर्षांतील मोदींचा कारभार बघितला तर ते स्पष्ट होतं.
- काँग्रेसच्या सत्ताकाळात राजीव सरकार असतांना त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी संगणक आणला, अन्य आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड दिली. याच तंत्रज्ञानाचा वापर करून मोदींनी नंतर सत्ता काबीज केली. राजीव गांधींनी देशाला मोठी स्वप्नं बघायला शिकवलं. संगणकाच्या लाटेवर स्वार होऊन भारतात अर्थव्यवस्थेत क्रांति झाली. देशाबाहेर जाऊन नोकऱ्या मिळवण्याची संधी अनेकांना भेटली. ज्यांत पुन्हा उच्च वर्णियच मोठ्या संख्येत होते. पण ज्या काँग्रेसनं यासाठी त्यांना मदत केली त्यांचा मात्र या सर्वांनाच विसर पडलाय आणि आज ते विचारत आहेत की काँग्रेसनं देशासाठी काय केलं? आम्हाला काय दिलं? १९९१ साली नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे देशात उदारीकरण आलं आणि भारत आर्थिक महासत्ता बनू लागला. आज तो जगातील प्रमुख सत्ता होण्याच्या मार्गावर आहे पण त्याचं श्रेय मात्र काँग्रेसला दिलं जातं नाही. त्यांनी सत्तर वर्षांत काहीच केलं नाही असले बिनबूडाचे धादांत खोटे आरोप केले जातात.
- या विरोधात मोदींनी काय केलं? मोदी म्हणतात की मी चहावाला आहे. श्रम प्रतिष्ठा पाळायलाच हवी. पण कोणालाही विचारा की त्याला खरंच चहावाला व्हायला आवडतं? चहावाला होणं ही एखाद्याची महत्त्वाकांक्षा असू शकते? आज चहाचे जे चकचकीत व्यवसाय केले जातात ती चांगली गोष्ट आहे पण त्यांतही पुन्हा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच ते शक्य आहे. त्यामुळे इतर चहावाल्यांचा धंदा मारला जातोय हे विसरून चालणार नाही. ज्यांना इतर काही संधी नसतात अशी माणसं चहाच्या टपऱ्या टाकतात. शिकल्या सवरल्या माणसांचं हे स्वप्नं असतं का? परदेशांत जाऊन जगावर राज्य करण्याची स्वप्नं राजीव गांधींनी देशाला दाखवली व प्रत्यक्षात उतरवलीही. मोदी म्हणताहेत की तुम्ही चहा विका, चहाची टपरी टाका, वडापाव विका, भजी तळा, आता आता चौकीदार बना. या लोकांना जाऊन विचारा की हे काही त्यांचं जगण्याचं ध्येय होतं का म्हणून. त्यांनी शाळेत शिकतांना याची स्वप्नं पाहिली होती का म्हणून. आणि आज जे लाखो तरूण शिकत आहेत त्यांनाही हेच प्रश्न विचारा की त्यांना काय व्हायचं आहे? ते कशासाठी शिकत आहेत? चहावाला होण्यासाठी की चौकीदार होण्यासाठी?
- मोदी किंवा शहा असं म्हणत नाहीत की तुम्ही प्रधानमंत्री व्हा. मोठे उद्योगपती व्हा. संशोधक व्हा. शास्त्रज्ञ व्हा. ते कधीच तसं म्हणणार नाहीत. संघाला तसं वाटत नाही. श्रमप्रतिष्ठेच्या नावाखाली समाजाचा एक मोठा स्तर कायमच गुलामीत राहावा, उच्चवर्णीयांच्या किंवा उच्चवर्गीयांच्या ताब्यात राहावा ही यांची मानसिकता आहे. हे कायम सत्ताधारी राहणार आणि इतरांनी केवळ चहा विकावा, चौकीदारी करावी हेच त्यांना वाटतं. जो उच्च वर्णीय मध्यमवर्ग आज मोदींचा उदो उदो करतोय तो हे सारं करणार आहे का? नाही. कारण तो पैशाच्या बळावर सर्व मोठ्या संधी हिसकावून घेईल आणि इतरांसाठी चहाच्या टपऱ्याच ठेवणार आहे. त्यासाठी त्यांनाही मोदीच हवे आहेत.
- मोदी श्रमप्रतिष्ठा वाढवत आहेत असं काही म्हणतील. पण त्यांची ही श्रमप्रतिष्ठा राजकीय हेतूंनी प्रेरीत आहे हे अगदी उघड आहे. एरव्ही त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याकडे जास्त लक्ष दिलं असतं पण काळ्या पैशाच्या नावाखाली त्यांनी नोटाबंदीसारखा तद्दन लहरी निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलं. त्यांत नुकसान कोणाचं झालं? गरीब व्यावसायिकांचच झालं. जे काहीतरी व्यवसाय करत होते त्यांच्यावर खरोखरच चहाच्या टपऱ्या उघडण्याची वेळ आली. सारेच चहावाले झाले. आता मोदींची इच्छा आहे की सर्वांनी चौकीदार व्हावं आणि देश त्यांच्या हातात राहिलाच तर ते हेही करतीलच.
- मोदींच्या विरोधात बोललेलं त्यांना आवडत नाही की भाजपला आवडत नाही हे समजण्यासारखं आहे. पण टीका करणारा देशाच्या विरोधात बोलतोय, असं म्हणून आपल्यावरील टीकेचा रोख दरवेळी देशाविरोधात वळवण्याचा हा त्यांचा निर्लज्ज धूर्तपणा आता ओळखायला पाहिजे. मोदी किंवा भाजप म्हणजे देश नाही. लोक मोदी आणि भाजपला प्रश्न विचारत आहेत आणि त्यांनीच त्याची उत्तरं देणं अपेक्षित आहेत. पण त्यांच्याकडे ती नाहीत म्हणून मग हा धूर्तपणा केला जातोय. प्रश्न विचारले जातात म्हणून लोकशाही टिकून असते. प्रश्न विचारले जाणं जेव्हा बंद होईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल. मोदी आणि भाजपला हेच हवं आहे. प्रश्न विचारायचे नाहीत. आम्ही काय वाट्टेल ते बरळू आमच्यावर शंका उपस्थित करायची नाही. तसं केलं तर तुम्ही देशाच्या विरोधात. तुम्ही देशद्रोही. ही लोकशाही संपवण्याची भाषा आहे. आणि त्यांना हेच हवं आहे. ते जे म्हणतील ते मुकाटपणे ऐकणारे निर्बुद्ध लोक त्यांना हवे आहेत. संघात नेमकं हेच चालतं. तेच त्यांना आता देशात चालवायचं आहे. आम्ही बोलणार तुम्ही फक्त ऐकायचं. आम्ही सांगणार तेच तुम्ही करायचं. तुमची अक्कल वापरायची नाही. तो तुम्हाला अधिकार नाही. हे सारं गुलामीकडे नेणारं राजकारण आहे. समाजाचा मोठा स्तर हा कायम निम्नस्थितीतच राहावा आणि त्यामुळे पुन्हा तो सत्ताधाऱ्यांवर अवलंबून राहावा हीच यांची इच्छा आहे. हे एक नवं राजकारण आहे. मोठ्या हुशारीनं विणलेलं. धर्माच्या नावावर आता राजकारण करता येत नाही, वर्णाच्या नावाखाली उघडपणे वागता येत नाही म्हणून गरीबांचा आधार घेऊन, श्रमप्रतिष्ठेची घोंगडी पांघरून, त्यांच्या आधारानं आता ही नवी वर्गव्यवस्था मजबूत करण्याचं हे तंत्र आहे. जिथे भावनेला आवाहन केलं जातं. मुख्य प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी क्षुल्लक गोष्टींना मोठं केलं जातं आणि आपणच जगाचे तारणहार आहोत याचा देखावा निर्माण केला जातोय.
- चहावाला, भजीवाला, आता चौकीदार आणि पुढच्या काळात कदाचित झाडुवाला व्हा अशा घोषणा दिल्या गेल्या तर नवल वाटण्याचं काहीच कारण नाही. निवडणूका भाजप जिंकेल पण तेव्हाही चहावाले चहाच विकतील, चौकीदार चौकीदारीच करतील आणि भजीवाले भजीच तळतील, ते किंवा त्यांची मुलं कधीच मोठी स्वप्नं बघू शकणार नाहीत. कारण आता त्या स्वप्नांवरचाही अधिकार भाजपनं काढून घेतला आहे. तुम्हाला मोठं व्हायचं आहे की इतरांचे शिव्याशाप खात लाचारीचं जगणं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला स्वतःच्या बळावर स्वप्नं बघायची आहेत की इतरांनी सांगितलेल्या गोष्टीच करायच्या आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला गुलाम व्हायचंय की ताठ मानेनं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.

No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.