Saturday, February 16, 2019

जे म्हणतायत ना, सैन्यावर झालेल्या हमल्याचं राजकारण करू नका, तर त्यांनी असलेली - नसलेली अक्कल वापरून हे लक्षात घ्यायला हवं की सैन्यावर होणारं आक्रमण हा एका मोठ्या नी व्यापक राजकारणाचा भाग असतो। जशी सैनिकांची देश रक्षणाची जबाबदारी असते तशीच त्यांच्या  रक्षणाची जबाबदारी सरकारची असते। हे लक्षात घ्यायची गरज सैनिकांच्या नावाने गळेकाढू लोकांना वाटत नाही। भारतीय इंटेलिजन्स एजन्सी इतक्या झोपा काढणारी आहे का? एक आख्खा ट्रक भरून विस्फोटके कसे काय सहज भारतात घुसतात? बरं 2500 सैनिकांची तुकडी या या मार्गाने जाणार आहे, हे त्या फियादीनला कसं काय समजतं? काश्मिरात प्रत्येक वाहनाची कडेकोट तपासणी होत असते असे असताना विस्फोटकांनी भरलेला एक ट्रक सुटतोच कसा? पुलवामा येथील हल्ला गेल्या 30 वर्षात झालेला सर्वात मोठा हल्ला आहे। सरकारच्या हलगर्जीपणामुळेच केवळ असे दहशतवादी हल्ले होतात, त्याची जबाबदारी सरकार घेणार आहे की नाही?
सैनिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं राजकारण करायचं नाही म्हणजे काय करायचं नाही? प्रश्न विचारायचे नाही? हल्ल्याचं राजकारण करू नका हे म्हणणं सगळ्यात मोठं राजकारण असतं। जर देशाचा सैनिकच सुरक्षीत नसेल तर देशातली जनता कशी सुरक्षीत असणार? सरकार कुणाचंही असो सैनिकांवर या पद्धतीने होणाऱ्या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी त्या देशाच्या सरकारचीच असते।

असे मोठे हल्ले जेव्हा होतात, त्याआधी देशातले 'काही' पक्ष, काही विशिष्ट लोकं घेरल्या गेलेली असतात, असं का होतं? हेमंत करकरे देशात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या घातक शक्तींचा पर्दाफाश करणार होते, तेव्हाच अचानक 26/11 घडतं आणि कुणाला काय घडलंय ते कळायच्या आत करकरे शहीद होतात? भारतात आजवर झालेलं सर्वात मोठं विमान खरेदी भ्रष्टाचार प्रकरण टिपेवर असताना आतंकी हल्ला होतो? या ज्या टायमिंग आहेत त्या मला अजिबात नैसर्गिक वाटत नाही। हे जे काही आहे ते देशाला सर्वनाशाकडे नेणारं आहे।

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...